Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

0

Age for marriage: लग्नाला आपल्याकडे विशेष महत्व आहे. दोघांमध्ये नवीन नाते जोडण्याचा सोहळा म्हणून लग्नाकडे पाहिले जाते. परंतू लग्नाला घेऊन काही गोष्टींचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा लग्न झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामुळे वैवाहिक जीवनाचा (married life) पुरेसा आनंद घेण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. बर्‍याचदा लग्न ठरवताना विविध गोष्टींना विचारात घेतले जाते. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लग्न हे योग्य वय? अनेकांना लग्न नेमकं कोणत्या वयामध्ये केले पाहिजे याविषयी अचूक माहिती नसल्याचं पाहायला मिळते. (What is the right age to get married)

कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे होते. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुलीच्या लग्नाचे वय १८ वरुन २१ वर्षे करण्यात आले आहे. तसेच कायद्यानुसार लग्नासाठी मुलाचे वय सुद्धा २१ वर्षेच ठरवण्यात आले आहे. कायद्यानुसार मुला-मुलीचे लग्नाचे वय ठरवून दिले असले तरी लग्न करण्याचे हे योग्य नाही. योग्य वयामध्ये लग्न होणे दोघांसाठी फायदेशीर असते. मात्र नेमक्या कोणत्या वयात मुला-मुलीने लग्न करावे? तज्ज्ञांकडून प्रसारित केलेल्या या अहवालाविषयी जाणून घेऊया सविस्तर.

तज्ज्ञांच्या मते लग्न करण्याअगोदर शारीरिक मानसिक आणि आर्थिक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी सक्षम असताना लग्न करायला हरकत नाही. अन्यथा लग्नानंतर अनेक समस्या निर्माण होतात. लग्नानंतर दोघांच्याही जीवनात काही महत्वाचे बदल होतात. नव्याने जवाबदार्‍या येतात. अशावेळी मानसिककदृष्ट्या सक्षम असणे फार गरजेचे आहे. अन्यथा अचानक नव्याने आलेल्या काही जवाबदार्‍यांमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे नात्यावर त्याचा परिणाम जाणवू शकतो.

लग्नाअगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे सुद्धा फार गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नानंतर सुद्धा तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायी ठरु शकते. नव्याने निर्माण झालेल्या तुमच्या नात्यावर त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागतो. तसेच लग्नानंतर लगेच भविष्यातील फॅमिली प्लॅनिंग केले जाते. त्यामुळे काही नव्या जवाबदार्‍यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. अशावेळी आर्थिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे दोघ‍ांनी सुद्धा लग्नाअगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याबाबतचा विचार करावा.

योग्य वयात लग्न होणे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. करिअरच्या मागे धावताना अनेकांचे लग्न करण्याचे योग्य वय निघून जाते. वय वाढल्यानंतर लग्न करण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. तज्ज्ञांच्या मते, उशिरा लग्न झाल्यास होणार्‍या बाळ‍ावर त्याचा परिणाम जाणवू शकतो. तसेच उशिरा लग्न केल्याने भविष्याला घेऊन काही समस्या सुद्धा निर्माण होतात. तसेच लग्न होणार्‍या मुला-मुलीमध्ये वयाचे जास्त अंतर नसायला हवं. वयाचे जास्त अंतर असल्यास सुद्धा त्याचा नात्यावर परिणाम जाणवू शकतो.

तज्ज्ञांनी सांगितलेल्या या वयामध्ये मुलं-मुली सर्वच बाबींवर सक्षम ठरतात. त्यामुळे लग्न करण्याचे हे योग्य वय ठरु शकते. २४ किंवा २५ वर्ष हे मुलीसाठीचे लग्न करण्याचे योग्य वय आहे. तसेच २७ किंवा २८ हे मुलासाठी लग्न करण्याचे योग्य वय सांगण्यात आले आहे. या वयादरम्यान लग्न झाल्यास वैवाहिक जीवन आनंदात आणि समाधानात जाते.

हे देखील वाचा Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..

Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

digital voter ID: आता घरबसल्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार डिजिटल मतदार ओळखपत्र; जाणून घ्या प्रोसेस .. 

Ramdev Baba: कपडे नाही घातले तरी महिला सुदंर दिसतात, फडणवीसांच्या पत्नी समोरच रामदेव बाबा बरळले; अमृता फडणवीस यांची रिएक्शन पाहून म्हणाल..

Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.