Electric bike: केवळ इतक्या पैशात आता पेट्रोलच्या टू-व्हीलरला करता येणार ईलेट्रीक बाईक; जाणून घ्या सविस्तर..

0

Electric bike: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे. सतत पेट्रोल-डिझेलमध्ये होणार्‍या भाववाढीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर होतो. चारचाकी आणि दुचाकी वाहन वापरणार्‍यांची देखील फारच वाईटअवस्था झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे खिशावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय नागरिक आता ईलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देताना दिसतात. अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भविष्यात देखील इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पेट्रोलच्या बाईक घेण्याऐवजी लोकांकडून या ईलेक्ट्रीक स्कूटरला प्राधान्य मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक बाईकच्या किंमती खूप जास्त आहेत. मात्र आता तुम्ही यावर उत्तम पर्याय म्हणून तुमच्याकडे असणाऱ्या पेट्रोलवरच्या टू-व्हीलरलाच आपली इलेक्ट्रिक बाईक बनवू शकता. आता पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतरित करण्याचे नविन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अगोदर या नविन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या.

GoGoA1 या भारतीय फर्मने हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत इलेक्ट्रिक कन्वर्जंट किट निर्माण करण्यात आले आहे. या उपकरणाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये रुपांतरीत करु शकता. विशेष म्हणजे GoGoA1 कंपनीला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून सुद्धा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या किट्स आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार झाल्या आहेत. सुरुवातीला कंपनीकडून हीरो स्प्लेंडर बाईकसाठीच ही किट निर्माण करण्यात आलेली आहे.

GoGoA1 या कंपनीने निर्माण केलेल्या या किटमध्ये 2 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि 2.8 kWh क्षमतेची बॅटरी आहे. तसेच यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमचाही समावेश करण्यात आलेला आहे. या कीटच्या सेटअपमध्ये DC-DC कनवर्टर, नवीन एक्सीलरेटर वायरिंग, की स्विचसह कंट्रोलर बॉक्स आणि एक नवीन स्विंगआर्म असणार आहे. एकदा पूर्ण बॅटरी चार्ज केल्यांनतर १५१ किमीपर्यंत तुमची गाडी धावू शकेल, असा दावा GoGoA1 कंपनीकडून करण्यात आलेला आहे.

GoGoA1 च्या देशातील ३६ RTO ठिकाणांवरील कार्यशाळेत हे रुपांतर केले जाईल. पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये रुपांतरीत करायला स्थानिक आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मात्र किरकोळ कागदपत्रांसह अगदी सहजरीत्या याकरिता आरटीओतून परवानगी मिळणार आहे. इलेक्ट्रिक बाईकमध्ये रुपांतर झाल्यानंतर आरटीओकडून हिरवी नंबर प्लेट जारी करण्यात येणार आहे. नंबर प्लेटवरील नंबर मात्र जुनाच राहणार आहे.

पेट्रोल बाईकचे ईलेक्ट्रीक बाईकमध्ये रुपांतर करण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेतल्यानंतर यासाठी खर्च किती येणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र चिंता करण्याची गरज नाही. त्याबाबत सुद्धा आपण येथे जाणून घेणार आहोत. एकुण ३५००० रुपयात तुम्हाला हे किट्स मिळणार आहे. मात्र यावर जीएसटी सुद्धा भरावा लागेल. त्यासोबतच बॅटरीसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. एकुण ९५,००० रुपयांत तुम्ही तुमची गाडी इलेक्ट्रिक करू शकता.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Driving licence: आता घरबसल्या काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या सविस्तर प्रोसेस..

Chanakya Niti: चाणक्यांच्या या मार्गाचा अवलंब केल्यास झटक्यात मिळेल यश..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..,’; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.