Women Facts: सून आणि सासूचं का पटत नाही? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

0

Women Facts: सासू (mother in law) आणि सुनेचा (daughter in law)  नेहमी 36 चा आकडा असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या कारणांवरूनही या दोघी एकमेकांना भिडल्याचं आपण नेहमी पाहिलं असेल. सुन आणि सासू दोघीही एकमेकांविषयी नेहमी वाईटच बोलल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र या दोघींचं न पटण्याचं काय कारण आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका संशोधनानुसार,या दोघींचं न पटण्याची काही कारणे समोर आली आहेत, जाणून घेऊया सविस्तर.

घरातल्या पुरुषांना आई आणि नवरा म्हणून दोघींनाही समजून घेणं फार अवघड गोष्ट आहे. समजून सांगून दोघेही ऐकतील असं फारसं क्वचित होतं. आई आणि बायकोच्या भांडणामुळे अनेक जण घरात फार वेळ थांबत नसल्याचे देखील निदर्शनास येते. मात्र हा भांडण मिटवण्याचा योग्य मार्ग नाही. वारंवार समजावून सांगून देखील पुन्हा पुन्हा वाद का होतात? हे जाणून घेणे जरुरी आहे. सासू आणि सूनेमध्ये नेमक्या कुठल्या कारणांवरुन वाद होतात, याबद्दल माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

मुलावर आणि नवर्‍यावर हक्क सांगणे

सासू आणि सूनेत भांडण होण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे दोघीही घरातल्या पुरुषावर समान हक्क सांगतात. आईला कायम असे वाटत असते, माझ्या मुलाने माझ्याच मनासारखे वागावे. त्याची बायको योग्यरीत्या काळजी घेत नाही आणि मुलाला कायम माझ्या विरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करते. यावरुन सासू कायम सूनेला काही ना काही बोलत राहते. सूनेला मात्र सासूने बोललेले सहन होत नाही. त्यामुळे ती सुद्धा उलटे ऊत्तर देते. दुसरीकडे बायकोला देखील नवर्‍याने आईचं न ऐकता, सगळं काही माझेच ऐकावं असं वाटत असतं. दोघींच्या या विचारावर ज्याला तोडगा काढता येतो, तो उत्तम कुटुंब प्रमुख होऊ शकतो.

आईला देखील आपल्या मुलाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याची सवय असते. लग्न झाल्यानंतर पती-पत्नी विविध गोष्टींचे प्लॅनींग करतात. एकमेकांना वेळ देण्यासाठी विकेंडचा वेळ एकमेकांबरोबर घालवण्याचं ठरवतात. त्यातूनच बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलं जातं. मात्र सासूला हे बिल्कुल आवडत नसते. त्यामुळे आई म्हणून ती दोघांच्या संसारातील बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असते. सुनेला मात्र हा प्रकार मुळीच आवडत नाही. आणि त्यावरुनच मग दोघींमध्ये वाद होतो.

सासू आणि सून एकमेकांशी फार प्रेमाने आणि आदराने वागत असल्याचे क्वचितच बघायला मिळते. सासू कडून वारंवार सूनेचा जाहीर अपमान करण्यात येतो. त्यामुळे सूनेच्या मनातील सासू बद्दलचा आदर देखील आपोआप कमी होऊन जातो. सून सुद्धा सासूच्या चुकांचे प्रदर्शन मांडून सासूबाई कशा मुर्खासारख्या वागतात हे सर्वत्र सांगत फिरतात. त्यामुळे दोघींमध्ये एकमेकींविरुद्धचा तिरस्कार वाढत जातो. शेवटी त्याचे रुपांतर वादात होते.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

Health tips: उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित; जाणून घ्या हरभरे खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.