Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ‘ब्रा’ घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

0

Wearing Bra While Sleeping: पुरुषांपेक्षा महिलांना (women) आपल्या शरीराची आणि सौंदर्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जवळपास सर्वच महिला ‘ब्रा’चा वापर करत असतात. मात्र तुम्हाला या संदर्भात जाणून घेणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ‘ब्रा’ चा वापर कसा कायायचा, हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र तरीसुद्धा अनेकजण रात्री झोपताना ब्रा घालून झोपतात. आज आपण रात्री झोपताना ब्रा घालून झोपण्याचे काय दुष्परिणाम आहेत ते सविस्तर जाणून घेणार आहोत. (Health tips)

एका रिसर्चनुसार रात्री ‘ब्रा’ घालून झोपण्याचे अनेक दुष्परिणाम असल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही, तर महिला कर्करोगाला देखील या चुकीमुळे निमंत्रण देऊ शकतात. अशी देखील माहिती समोर आली आहे. ब्रा ही तुमच्या स्तनांना घट्ट बसत असते. साहजिकच स्तनांना ब्रा घट्ट बसल्यामुळे, याचे मोठ्या प्रमाणात घर्षण होतं. तुम्ही रात्रभर ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरची गाठ निर्माण होण्याच्या शक्यता असल्याचं देखील समोर आले आहे. ब्रा घालून झोपणाऱ्या महिलांचा एक रिसर्च करण्यात आला, यामध्ये अशा महिलांना स्तनांचा कर्करोग असल्याचं देखील समोर आलं.

रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा

जर तुम्ही रात्री झोपताना ब्रा घालून झोपाल, तर तुमच्या रक्ताभिसरण प्रक्रियामध्ये अडथळा निर्माण होतो. आपले शरीर आणि अवयव निरोगी राहण्यासाठी तुमची रक्तभिसरण प्रक्रिया उत्तम असणे आवश्यक असतं. मात्र रात्री झोपताना ब्रा घालून झोपल्यामुळे, तुमच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. एक गोष्ट निदर्शनात आणली तर तुमच्या लक्षात येईल, ब्रा काढून झोपल्यानंतर, तुम्हाला खूप मोकळं मोकळं फील होतं. तणाव नसल्याचं जाणवतं. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया देखील उत्तम राहते. साहजिकच यामुळे तज्ञ ब्रा काढून झोपण्याचा सल्ला देतात.

झोपेत अडथळा

रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे तुमच्या झोपेत मोठा अडथळा निर्माण होतो. कदाचित तुम्हाला हे पटणार नाही, मात्र संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. तुम्ही ज्यावेळी ब्रा घालून झोपत असता त्यावेळी तुम्हाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. साहजिकच श्वास घ्यायला त्रास झाल्याने तुमची झोपमोड होते. रात्री एखाद्या वेळेस जर झोपमोड झाली, तर पुन्हा झोप लागणं फार अवघड असतं. त्यामुळे संपूर्ण रात्र तुमची खराब जाऊ शकते. अशा अनेक समस्येमुळे नेहमी ब्रा काढून झोपण्याचा सल्ला दिला जातो.

महिला कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे बहुतांशी महिला ब्राचा वापर करतात. दिवसभर कामात असल्याने आपल्या स्तनांचं आणि ब्राचं घर्षण होत असतं. घाम देखील येत असतो. घर्षण, घाम यामुळे ब्रा घातलेली जागा लालसर झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळत असेल. साहजिकच अशा समस्येमुळे किमान रात्री तरी तुम्ही काढून टाकणं आवश्यक असतं. अन्यथा रात्रभर जर तुम्ही ब्रा घातली, तर खाज येण्याचा देखील मोठा धोका निर्माण होतो.

कपड्यांशिवाय झोपणं फायदेशीर

एका संशोधनानुसार जगामध्ये फक्त 30 टक्केच लोक हे कपड्याविना झोपतात. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, कपड्याशिवाय झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जी लोकं कपड्याशिवाय झोपतात, अशा लोकांना उत्तम झोप लागते. त्याचं कारण म्हणजे, शरीराचे तापमान कपड्यांमुळे वाढत असतं. कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराचे तापमान खूप कमी होतं. अर्थात तापमान कमी झाल्यामुळे, लगेच झोप लागते.

एका रिसर्चनुसार काही लोक केवळ अंडरवेअरवर झोपतात. काहीजण मोकळे ठाकळे कपडे परिधान करून झोपतात. मात्र असेही काही लोक आहेत, जे घट्ट कपडे घालून झोपतात. मात्र घट्ट कपडे घालून झोपल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित काम करत नाही. अर्थात याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

हे देखील वाचाPM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

IND vs SL: केएल राहुलचा व्हाईट बॉलमधून सुपडा साप; हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय टीमचा बदलला चेहरा मोहरा..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.