IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (INDIAvsBANGLADESH) यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (2ndtest) सामन्यांत आता भारत पराभवाच्या छायेत आहे. फिरकीपट्टूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर काल तिसऱ्या दिवशी भारतीय प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे दिसून आलं. (Indian batting top order) पुन्हा एकदा भारतीय प्रमुख फलंदाजाला फिरकीपटूंनी आपल्या तालावर नाचवल्याने भारत 145 धावांचा पाठलाग करताना देखील आता अडचणी सापडला आहे. आज चौथ्या दिवसाच्या खेळात ऋषभ पंत (Rishabh pant) लवकर बाद झाला, तर भारताला पराभवापासून कोणीही वाचवू शकणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Virat Kohli fight on Bangladesh players)
पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेऊन देखील आता दुसरा कसोटी सामना गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. पहिल्या डावात देखील भारतीय प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर, ऋषभ पंत (Rishabh pant) आणि श्रेयस अय्यर (shreyash Iyer) यांनी डाव सावरत भारताला मजबूज स्थितीत आणून ठेवले. मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या डावात देखील भारतीय प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने आता भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. दुसऱ्या डावामध्ये बांगलादेश संघाने ठीकठाक फलंदाजी केली. त्याला भारतीय क्षेत्ररक्षकांनी देखील साथ दिल्याने बांगलादेश 231 धावा करू शकला.
बांगलादेश संघाच्या फलंदाजांचे विराट कोहलीने (Virat Kohli) तब्बल चार कॅच सोडल्याने विराट अगोदरच अस्वस्थ पाहायला मिळत होता. विराट कोहलीचा हा अस्वस्थपणा फलंदाजी करताना देखील दिसून आला. तत्पूर्वी पुन्हा एकदा कर्णधार केएल राहूनने (KL Rahul) आपल्या अप्रोचवर अनेकांना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी दिली. केएल राहुल (2) शुभमन गिल (subhaman Gil) (6) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) (7) विराट कोहली (Virat Kohli ) (1) या चार प्रमुख फलंदाजांनी 145 धावांचा पाठलाग करताना देखील आपल्या नांग्या टाकल्याने भारताची अवस्था 4 बाद 45 अशी झाली आहे.
145 धावांचा पाठलाग करताना प्रमुख फलंदाज अपयशी ठरलेण्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजूनही भारताला विजयासाठी 100 धावांची आवश्यकता असून, भारताची मदार ऋषभ पंत आणि श्रेयश अय्यरवर अवलंबून आहे. पहिल्या डावामध्ये श्रेयस अय्यरने 87 धावांची खेळी केली होती. मात्र त्याला अनेक जीवदान मिळाले. साहजिकच यामुळे आता दुसरी कसोटी जिंकायची असेल, तर ऋषभ पंतच शेवटची आशा आहे.
एकीकडे भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची चर्चा होत असतानाच, दुसरीकडे विराट कोहली आऊट झाल्यानंतर, बांगलादेश खेळाडूंसोबत केलेल्या बाचाबाचीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मोनीमूल हसनने मेहंदी हसन याच्या गोलंदाजीवर विराट कोहलीचा झेल टिपल्यानंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीला आऊट केल्यानंतर, बांगलादेश खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. विराट कोहलीला हे सहन न झाल्याने, विराट कोहली चक्क गोलंदाजाला शिव्या देताना देखील दिसून आला.
Virat Kohli and Taijul Islam's few words exchange. revenge time very soon coming😏👑 pic.twitter.com/EPTkQGEw1p
— Chakri_ VKohli👑 (@Chakri05224357) December 24, 2022
विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, अनेकांनी विराट जुन्या रंगात आला असल्याचं म्हटलं आहे. मात्र काहींनी यावर टीका देखील केले. बाद झाल्यानंतर, विराटला सहन न होणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र जर बॅटमधून धावा निघत नसतील, तर हे कोणालाही आवडणार नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. विराट कोहली बाद झाल्यानंतर, यापूर्वी देखील अनेकांशी हुज्जत घालताना दिसून आला आहे. भारताचा माजी सलामिवीर गंभीर बरोबर देखील आयपीएलमध्ये विराट कोहलीचा चांगलाच वाद झाला होता.
हे देखील वाचाFIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..
Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम