Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा  ‘ब्लॅकबर्ड’ बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

0

Tata Blackbird SUV: आपल्याकडे मध्यम आकाराची स्पोर्ट यूटीलिटी व्हेईकल (SUV) खूप पसंत केली जाते. या एसयूव्ही दिसायला देखील खूप देखण्या दिसतात. मध्यम आकाराच्या एसयूव्ही ह्या खूपच लोकप्रिय आहेत, कारण कमी बजेटमध्ये देखील एसयुव्ही खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या कार सेगमेंटमध्ये Hyundai Creta ला खूपच मागणी आहे. मध्यम आकाराची SUV घ्यायची म्हटले की ह्युंदाई क्रेटाकडे लोकांचा कल पाहायला मिळतो.

 

त्यानंतर Kia Seltos ही सर्वाधिक विकली गेलेली मध्यम आकाराची SUV आहे. ग्राहकांच्या मनातील याच गोष्टीचा विचार करून बऱ्याच कंपन्या नवनवीन SUV लाँच करत असतात. गेल्या बऱ्याच दिवसांपासून टाटा कंपनीच्या SUV ची देखील चर्चा खूपच होत आहे. ती म्हणजे टाटा ब्लॅकबर्ड (Tata Blackbird). कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून Tata Blackbird ची चर्चा चालू आहे. ही कार बाजारात आल्यावर ह्युंदाई क्रेटाला (Hyundai Creta) जोरदार टक्कर देणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, Tata Blackbird SUV आत्ताच्या नेक्सनवर (Nexon) आधारित असणार असल्याचे बोलले जात आहे. Nexon ची लांबी साधारणपणे ४ मीटर आहे. तर आगामी टाटा ब्लॅकबर्डची (Tata Blackbird SUV) ची लांबी 4.3 मीटर एवढी असणार आहे. अर्थात ही गाडी नेक्सनपेक्षा लांबीला अधिक असेल.

 

आगामी Blackbird ही सध्याच्या नेक्सनपेक्षा लांबीला अधिक असल्यामुळे बैठक व्यवस्था ऐसपैस मिळणार यात काही शंका नाही. तसेच बूटस्पेस नेक्सनपेक्षा अधिक मिळेल. नेक्सन आणि हॅरिएर यांच्यामध्ये लांबीचा विचार केल्यास बरेच अंतर आहे. तो गॅप भरून काढण्याचे काम आगामी ब्लॅकबर्ड एसयुव्ही (Tata Blackbird SUV) करेल.

 

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. या इंजिनची 160 hp एवढी पॉवर (Power) जनरेट करण्याची क्षमता असेल. तसेच डिझेल इंजिनमध्ये देखील ही कार असणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता ही कार इलेक्ट्रिक वर्जनमध्ये देखील उपलब्ध होऊ शकेल.

 

सध्या, टाटा नेक्सनची (Nexon) किंमत 7.70 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टाटा हॅरियर (Tata Harrier) ची किंमत 14.80 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही कारच्या किंमतीत जवळपास 7 लाख रुपयांचा फरक आहे. आगामी Blackbird या दोन्ही कार मधील किंमतीची तफावत भरून काढू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या कारची अंदाजित किंमत 10 ते 13 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

टाटाच्या या आगामी एसयुव्हीला कंपनी Blackbird असे नाव देणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु ‘ब्लॅकबर्ड’ (Blackbird) हे TATA कंपनी तयार करत असलेल्या एसयूव्हीचे (SUV) कोडनेम नाव आहे. सध्या कंपनी यावर काम करत आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्लॅकबर्डचे वारंवार चर्चेत आहे. अद्याप कंपनीने या कारबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केले नाही. परंतु नव्या वर्षात जानेवारी 2023 मध्ये या कार बाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

टाटा मोटर्सने ब्लॅकबर्ड या कार बाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले हे सर्व फोटो कंपनीने प्रकाशित केलेले नाहीत. या गाडीबाबत कंपनीने कुठलीही माहिती दिली नाही.

हेही वाचा: Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार..

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..

Bajaj ने आणली 70 पैशांवर 1 किमी चालणारी जबरदस्त बाईक, दिसायला देखणी आणि जबरदस्त वैशिष्ट्यांसह 

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर.. 

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.