UPI Payment करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी..
UPI Payment : नोटाबंदी नंतर ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळाली. त्यावेळी ऑनलाईन व्यवहार करण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. त्यामुळे आपोआपच ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळाली. त्यानंतरच्या काळात फोन पे (Phone Pay), गूगल पे (Google Pay) हे ॲप आल्यानंतर ऑनलाइन व्यवहारांमध्ये (UPI Payment) वाढ झाली. ऑनलाईन पेमेंटमुळे (UPI Payment) लोकांना खिशात पैसे घेऊन फिरण्याची गरज राहिलेली नाही, खिशात रोख रक्कम घेऊन फिरणे तसे जोखमीचे देखील होते.
UPI Payment मुळे ऑनलाईन व्यवहार होत असल्याने बँकांमध्ये होणारी गर्दी देखील खूप कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी जर आपण बँकेत गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळत असायची. सध्या एटीएमचा (ATM Card) वापर देखील खूप कमी झाला आहे. लोकांना काही सेकंदात आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) काही सेकंदामध्ये होत आहे.
परंतु प्रत्येक वेळी UPI Payment करणे आता ग्राहकांना महागात पडणार आहे. कारण बऱ्याच लोकांना दहा रुपये देखील ऑनलाईन पेमेंट करताना आपण पाहिलेच असेल. खास करून अशीच सवय असणाऱ्या ग्राहकांना UPI Payment महागात पडणार आहे. कारण ऑनलाईन पेमेंटवर (UPI Payment) काही बंधने येण्याची शक्यता आहे.
युपीआय पेमेंट सिस्टममध्ये (UPI Payment System) येत्या काही दिवसांत एक मोठा बदल होणार आहे. त्याचा फटका बऱ्याच ऑनलाईन पेमेंटचा (UPI Payment) वापर करणाऱ्या लोकांना बसणार आहे. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोक UPI Payment चा वापर करतात. त्यामुळे या पेमेंटच्या नियमांमध्ये कुठलाही बदल केल्यास त्याचा थेट परिणाम त्याच्या वापरकर्त्यांवर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर बंधने आली तर त्याचा तोटा वापरकर्त्यांना होणार आहे.
UPI ही रिअल टाइम पेमेंट करण्याची एक सिस्टम आहे. या सिस्टीमद्वारे मोबाईल एप्लिकेशनचा वापर करून बँक खात्यात पैसे एकमेकांना पाठवता येतात. तसेच कुठलाही युजर अनेक UPI ॲप्ससोबत आपले बँक खाते लिंक करू शकतो. UPI पेमेंट सर्विस देणाऱ्या ॲप्ससाठी व्यवहार मर्यादा सेट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हेही वाचा: Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..
नेमक काय होणार? युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारे ॲप्स लवकरच दररोज होणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांवर मर्यादा घालण्याच्या तयारीत आहेत. जसे की फोन पे (Phone Pay), गूगल पे (Google Pay), पेटीएम (Pay TM) यासारख्या ॲप्सने लवकरच ऑनलाईन व्यवहारांवर बंधने आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशातील थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरची व्हॉल्यूम कॅप 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. व्हॉल्यूम कॅप ( Volume Cap ) म्हणजे विशिष्ठ प्रकारच्या खाजगी कंपन्यांसाठी कर-सवलत (Tax Concession) आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेशी (RBI) त्यांची चर्चा सुरू आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतरच फोन पे (Phone pay), गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या कंपन्या व्यवहाराची मर्यादा ठरवू शकणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात UPI Payment वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे.
यावर कधी होणार निर्णय?
UPI Payment ची एका दिवसाची लिमिट बँकेने निश्चित केली आहे. यावेळी SBI ने UPI Payment ची एक दिवसाची मर्यादा 1 लाख रुपये एवढी असणार आहे, म्हणजे जर तुम्ही स्टेट बँक इंडियाचे ग्राहक असाल तर तुम्हाला एका दिवसाला एक लाख रुपये इतर खात्यांवर पाठवता येतील. तर प्रायव्हेट क्षेत्रातील असणारी ICICI बँकेची दररोजची मर्यादा 10 हजार रुपये आहे. त्या तुलनेने स्टेट बँक ऑफ इंडियाची दैनिक मर्यादा अधिक आहे.
2020 मध्ये नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन इंडिया (NPCI) ने ट्रान्झॅक्शन शेअर मर्यादित करणारा नियम लागू केला. 1 जानेवारी 2021 पासून हा नियम लागू झाला. त्यामुळे UPI पेमेंटची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत थर्ड पार्टी अप्लिकेशनला मर्यादित करता येऊ शकेल. सध्या नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन इंडिया (NPCI) सर्व प्रकारचे मूल्यांकन करत आहे, त्यानंतरच UPI Payment ची मर्यादा ठरवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत यावर निर्णय होऊ शकतो.
हेही वाचा: Google Search: असं नेमक झालं तरी काय? गूगलवरून कस्टमर केअरचा घेतला नंबर आणि पीएफमधून १.२३ लाख गायब
Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..
Bollywood: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने उरकला लग्नसोहळा, चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल..
Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम