Instagram Earn Money: Instagram वरून पैसे कमावणे झालं आता अधिक सोप्पं; फॉलो करा ‘या’ स्टेप्स अन् दररोज कमवा हजारो रूपये..

0

Instagram Earn Money: सोशल मीडियाच्या (social media) अवतीभवती हे जग फिरत असल्याने, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप काही साध्य करता येत आहे. महत्वाचं म्हणजे, अनेकांचा रोजगार (employment) देखील सोशल मीडियामुळे निर्माण झाला आहे. जगभरात सोशल मीडियाच्या अनेक माध्यमांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये इंस्टाग्राम (Instagram) वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळते. इंस्टाग्राम ॲपवर (Instagram app) मोठ्या प्रमाणात लोकं सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आता इंस्टाग्राम हे फक्त मनोरंजनाचे साधन राहिले आहे, असं नाही. तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून पैसे देखील कमवण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.

इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर (social media app) दररोज तब्बल ६०० दशलक्ष पेक्षा जास्त लोक सक्रिय असल्याचं पाहायला मिळते. विशेष म्हणजे, ही संख्या 25 ते 32 वयोगटातील असल्याचं देखील सर्वेतून समोर आलं आहे. Instragram च्या माध्यमातून असंख्य तरुण दररोज हजारो रुपये कमावतात. हे तुमच्यापैकी अनेक तरुणांना माहीत असेल. मात्र अजूनही तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून कसे पैसे कमवायचे? हे माहिती नसेल तर, आम्ही तुम्हाला या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

इन्फ्लुएंसर मार्केटिंगची अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्या अनेक युजर्सने इन्फ्लुएंसर मार्केटिंगला खूप मोठा व्यवसाय बनवला आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी विविध प्रोडक्ट निर्माण करणाऱ्या अनेक बड्या कंपन्या ‘इन्फ्लुएंसर मार्केटिंगचा’ पर्याय निवताना दिसतात. कंपनीचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं माध्यम अलीकडच्या काळात इन्फ्लुएंसर बनले आहे. साधारणतः वीस ते पस्तीस वर्षाचे तरुण आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ ‘इंस्टाग्राम’ या माध्यमावर घालवत असल्याचं पाहायला मिळते.

इंस्टाग्रामवर तरुण सगळ्यात जास्त वेळ घालवत असल्याने साहजिकच आपल्या प्रोडक्टची जाहिरात करण्याचं हे खूप मोठे साधन आहे. हे अनेक बड्या कंपनीच्या देखील लक्षात आले आहे. इन्फ्लुएंसरचा या माध्यमावर खूप मोठा प्रभाव आहे. अनेक तरुण इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरला फॉलो करत असतात. बरोबर हीच संधी पकडून, आपल्या प्रोडक्टची जाहिरात इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर कंटेंटच्या माध्यमातून कंपन्या करतात. आता तुम्हाला देखील या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही देखील घेऊ शकता. आणि दररोज हजारो रुपये कमावू देखील शकता.

एका पोस्टला किती रक्कम मिळते.

इंस्टाग्रामवर विविध प्रकारचे अनेक इन्फ्लुएंसर्स आहेत. यात नॅनो, मिडल-टियर, मायक्रो, टॉप-टियर, मेगा इन्फ्लुएंसर्स इत्यादी प्रकारचे इन्फ्लुएंसर्स आहेत. प्रत्येक इन्फ्लुएंसर्सची एका पोस्टसाठीची रक्कम वेगवेगळी आहे. इन्फ्लुएंसर्सला एका पोस्टची रक्कम किती मिळते हे त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सवर अवलंबून असते. जर तुमच्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स दोन ते नऊ हजार दरम्यान असतील, तर तुम्हाला एका पोस्टसाठी चार पासून पंधरा हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात. जर 10 हजारा पासून पन्नास हजारांपर्यंत फॉलोवर्स असतील, तर त्याला मायक्रो इन्फ्लुएंसर्स म्हणतात.

या इन्फ्लुएंसर्सला 16 हजारापासून 30,000 पर्यंत पैसे मिळतात. जर तुमच्याकडे साठ हजार ते एक लाख दरम्यान फॉलोवर्स असतील, तर तुम्हाला टियर इन्फ्लुएंसर्स असं म्हणतात. टियर इन्फ्लुएंसर्सला एका पोस्टसाठी 35 हजारापासून 60 हजारापर्यंत पैसे मिळतात. जर तुमच्याकडे एक लाख पासून 5 लाखापर्यंत फॉलोअर्स असतील, तर तुम्हाला एका पोस्टसाठी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.

पैसे मिळवण्यासाठी इतके फॉलोअर्स आवश्यक

जर तुम्ही देखील इंस्टाग्रामवर पैसे कमवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. इंस्टाग्रामवर पैसे कमवण्यासाठी तुमचा फॉलोवर्स कोणत्या प्रकारचा आहे, त्याचे वय काय आहे? यावर तुमच्या इन्कमच्या काही गोष्टी अवलंबून असणार आहेत. याबरोबरच तुमच्या कंटेंटला किती व्ह्यूज मिळतात, यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही फिटनेस किंवा फुड ब्लॉगर असाल, तर तुम्हाला कमी फॉलोवर्स असताना देखील चांगले पैसे कमवण्याची संधी मिळते. दीड दोन हजार फॉलोवर्स असतील, तरी देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही दर्जेदार कंटेंट बनवून, जास्त व्ह्यूज मिळवणे गरजेचे आहे.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकता, या सगळ्यात सोपा आणि अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रिय झालेला मार्ग म्हणजे, प्रोडक्ट मार्केटींग. या माध्यमातून तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता. त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या ब्रँडची मार्केटिंग करून एजन्सीद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी प्रभावशाली पोस्ट तयार करून आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो. या शिवाय अनेक व्यावसायिक देखील त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला निमंत्रण देत असतात. याद्वारे देखील तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

Maharashtra Police Bharti: पोलिस भरती नियमात पुन्हा मोठा बदल; उद्या पासून पोलिस भरती अर्ज प्रक्रिया होणार सुरू पण..

Talathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.