Vidai video: लग्नानंतर सासरी नांदायला न जाणाऱ्या नवरीला नेले फरफटत; व्हिडिओ पाहून बसेल धक्का..
Vidai video: लग्न (marriage) हे प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र लग्न झाल्यानंतर, जेव्हा नवरी मुलीची लग्न मंडपातून सासरी पाठवणी होत असते, तेव्हा मात्र हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला लग्न नक्की का केलं जातं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आई-वडिलांना सोडून कायमचं आपल्या नवऱ्याच्या घरी राहायला जावं लागत असल्याने, नवरी धाय मोकलून रडते. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकांचा काहीही संबंध नसताना देखील हे दृश्य पाहताना डोळ्यात पाणी उभा राहते. हे तुम्ही देखील अनेकदा पाहिले असेल.
लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवणीच्या वेळेस प्रत्येक मुलगी धाय मोकलून रडते, हे नवीन नाही. आपल्या आई-वडिलांनी, भावाने सुखात सांभाळलेले प्रत्यक्ष मुलीला यावेळी आठवतं. लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही, या सगळ्या गोष्टीची आठवण साहजिकच मुलीला नांदायला जाताना होत असते. आतापर्यंत आपल्या आई-वडिलांनी, भावाने आपला जो काही हट्ट होता, तो मोठ्या आनंदाने पूर्ण केला. इतकं सगळं असताना देखील मी आता त्यांना मी नकोशी झाली आहे का? कदाचित हा विचार मुलीच्या मनात येऊन मुली रडत असतील.
एकीकडे हे सगळं वास्तव असलं, तरी दुसरीकडे मात्र मुलीला नांदायला जावेच लागते. या सगळ्यांमधून स्वतःला सावरत मुलगी अखेर नांदायला आपल्या सासरी जातेच. मात्र सोशल मीडियावर वायरल (social media) झालेल्या एका व्हिडिओत (viral video) भलतंच घडलं आहे. लग्नानंतर, मुलगी सासरी नांदायला जाताना मोठ मोठ्याने हंबरडा फोडताना पाहायला मिळत आहे. नवरीला सासरी घेऊन जाण्यासाठी सासरची अनेक मंडळी वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवरा देखील आपल्या चार चाकीमध्ये बसल्याचं तुम्ही पाहू शकता.
सासरची सगळी मंडळी चार चाकीमध्ये नवरीला बसण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहेत. मात्र नवरी सासरी नांदायला जायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी विनवणी करून देखील नवरी आपलं रडणं थांबवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर नवरी सासरी नांदायला स्वतःहून जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नवरीच्या माहेर कडील मंडळींनी नवरीला दोन्ही हात आणि दोन्ही पाय धरून फडफडत सासरकडील मंडळींच्या चार चाकी गाडीत बसवलं.
आपल्या माहेरची मंडळी आपले दोन्हीं हात पाय पकडून फडफडत सासरी पाठवत असताना, देखील नवरी मुलगी रडणे थांबवत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड मजेशीर असून, तुफान वायरल देखील झाला आहे. अनेकांनी या प्रकरणाला सासरी पाठवत नाहीत, हे एक प्रकारचं अपहरण असल्याचं म्हंटले आहे. काहींनी नवरीच्या कदाचित मनाविरुद्ध लग्न झालेलं असावं, यामुळेच नवरी नांदायला जाण्यासाठी तयार नाही. असं देखील म्हटलं आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओला 50 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हे देखील वाचाTalathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम