Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Ration Card new update: गरीब आणि गरजू नागरिक उपाशी राहू नयेत, म्हणून केंद्र सरकारने (central government) शिधापत्रिकेची (shidha Patrika) स्थापना केली. रेशन कार्ड (ration card) हे आता फक्त स्वस्त धान्य मिळवण्यापुरतेच मर्यादित राहिले नसून, आवश्यक ओळखपत्र देखील बनले आहे. अनेक नागरिकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड अनिवार्य आहे. केंद्र सरकारने को रो ना च्या माहामारीमध्ये रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र आता रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून, रेशन कार्डमध्ये काही त्रुटी आढळणाऱ्या कार्डधारकांचे कार्ड रद्द देखील करण्यात येणार आहे.

काय आहे सरकारचा नियम?

शिधापत्रिका असणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी असून, सरकारच्या नवीन अपडेट विषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. एवढेच नाही, तर रेशन कार्ड अपडेट करण्याची सर्व प्रक्रिया देखील आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण रेशन कार्ड चालू राहण्यासंदर्भातला सरकारी नियम काय आहे? हे जाणून घेऊ. केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटप करण्यासंदर्भातील काही नियम आणि अटी देखील आहेत. रेशन कार्डधारकांना ह्या अति पूर्ण कराव्या लागतात, तरच त्यांना मोफत रेशनचा लाभ दिला जातो.

सरकारच्या मोफत रेशन नियमावली जाणून घ्यायची झाल्यास, तुमचे घर हे शंभर मीटरच असणं आवश्यक आहे. १०० मीटर पेक्षा मोठं घर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच तुमच्याकडे चार चाकी, ट्रॅक्टर, त्याचबरोबर शस्त्राचा परवाना नसणे देखील आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला गावामध्ये आणि शहरात दोन त्याचबरोबर तीन लाख रुपये पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे 100 मीटर पेक्षा मोठं घर आणि ट्रॅक्टर (tractor) किंवा टू व्हीलर (two wheeler) देखील राहत असेल, तर तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महाराष्ट्र राज्यात या संदर्भातला अजून सर्वे करण्यात आलेला नाही. मात्र उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात पाऊले उचलली आहेत.

सरकार काय म्हणतंय?

रेशन रेशन कार्ड लच्या माध्यमातून मोफत धान्य मिळत असणाऱ्या या योजनेचा गैरफायदा घेणार्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळली आहे. या योजनेसाठी पात्र नसून, देखील अनेक शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आले आहे आणि म्हणून सरकारने काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पात्र नसून देखील जे नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा देखील विचार सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने पात्र असणाऱ्या रेशन कार्ड धारकांची यादी देखील जाहीर करायला सुरुवात केली असून, लवकरच हा नियम देशभरातील राज्यांना देखील लागू होणार असल्यासची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र सरकारने देखील रेशन कार्डधारकांसाठी एक नवीन अपडेट केली आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, आणि नियमितपणे तुम्हाला अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे रेशन कार्ड हे मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांचा मोबाईल नंबर (mobile number) हा चुकीचा लिंक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आणि म्हणून रेशन कार्ड धारकांना आपल्या योजनांचा लाभ घेण्यामध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे रेशन कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला अपडेट झालेलं नसेल, तर तुम्ही ते घरबसल्या अपडेट करू शकता. रेशन कार्डला मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? जाणून घेऊया सविस्तर.

असं करा अपडेट 

तुमच्या रेशन कार्डला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://nfsa.gov.in/state/mh असं सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्हाला आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक त्याचबरोबर रेशन कार्ड मधील कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला कॅपच्या कोड टाकून ‘save’ या बटणावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा नवीन मोबाईल क्रमांक टाकून, तुम्ही तुमची शिधापत्रिका अपडेट करू शकता.

हे देखील वाचा Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..

Agricultural exports: तुमचा शेतमाल निर्यात करायचाय? आता सरकार उचलणार निर्यातीचा खर्च; जाणून घ्या प्रक्रिया..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offer’s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.