SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
SBI Recruitment 2022: वाढत्या महागाईने (inflation) सगळ्यांचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड निराशा आहे. नुकताच कोरोनाचा कहर कमी झाला असल्यामुळे काही क्षेत्र नव्याने उभारी घेत आहेत. परंतू अद्यापही अनेक क्षेत्रांवर मंदीसदृष्य परिस्थिती आहे. अशा वातावरणात नोकरी मिळवणे मात्र फार कठिण झाले आहे. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा घरी बसणार्यांची संख्या पुष्कळ आहे. खाजगी नोकरी बेभरवशाची झाली आहे. कधी हातची नोकरी जाईल, याचा काही नेम नाही. अशावेळी विद्यार्थी सरकारी नोकरीचा पर्याय शोधतात. परंतू दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा अनेकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. मात्र सरकारी नोकरीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर ही संधी तुम्ही सोडता कामा नये. नुकतीच एसबीआयने (sbi) काही पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. (SBI PO Vacancy)
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (state Bank of India) नुकतीच एक अधिसुचना जारी केली आहे. ज्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही पदवीधर असाल आणि तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरु शकते. एकुण तब्बल 1673 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. सगळ्याच दृष्टीने सोयीस्कर असणार्या स्टेट बॅंक ऑफ इंडियात उत्तम पगाराची नोकरी मिळवण्याची ही संधी आहे. कारण पीओ हे बॅंकेतील महत्वाचे पद आहे. एसबीआयने जाहीर केलेल्या अधिसुचनेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊया या भरती विषयी सविस्तर.
एसबीआयमधील पीओ पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे. सुरुवातीला याकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे. २२ सप्टेंबरपासूनच अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. १२ ऑक्टोंबर २०२२ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे जर एसबीआयमध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल, तर पटापट अर्ज करा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवर किंवा ब्राउजर वर जाउन एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. sbi.co.in ही एसबीआयची अधिकृत वेबसाईट आहे. यावर तुम्हाला या पदभरतीसाठीची संपूर्ण अधिसूचना बघायला मिळेल. एसबीआयच्या वेबसाइटच्या होम पेजवर जाताच, तुम्हाला त्याठिकाणी Whats New असे दिसेल. Whats New च्या लिंकवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला थेट पदभरतीसाठीची लिंक दिसेल. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 फॉर 1673 पोस्ट’ या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तेथे क्लिक हिअर टु अप्लाय असा पर्याय दिसेल. या पर्यायावर जायचे आहे, त्यानंतर पुढील पेज तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागेल. या पेजवर विचारलेले सर्व तपशील काळजीपूर्वक भरुन नोंदनी प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही नोंदनी क्रमांकाद्वारे सुद्धा अर्ज भरु शकता. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.
पात्रतेचे निकष
एसबीआय पीओ पदासाठी काही पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आलेले आहे. पदवीधरांना या भरतीप्रक्रियेत प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्ज करणार्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असणे अनिवार्य आहे. कुठल्याही शाखेचे बंधन यामध्ये नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल, तरी सुद्धा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु शकता. उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असावे. तसेच ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. एसबीआयने जाहीर केलेल्या अधिसुचने नुसार या भरतीसाठी प्राथमिक परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेचा कालावधी १७ डिसेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२ सांगण्यात आलेला आहे.
किती असेल पगार?
नोकरी म्हटले, की पगार हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. कारण मिळणार्या पगारावर त्या नोकरीकडे बघितले जाते. एसबीआय आपल्या कर्मचार्यांची विशेष काळजी घेते. महिन्याच्या वेतनाशिवाय विविध भत्ते एसबीआयच्या कर्मचार्यांना मिळत असतात. जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार पीओ या पदासाठी ६३,८४० रुपते प्रतीमहिना वेतन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, त्याकरिता स्पर्धा परिक्षांची तयारी करत असाल, तर एसबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची ही संधी तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.
हे देखील वाचा Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..
Menstrual cycle: मासिक पाळी येणं नेमकं केव्हा थांबतं? मासिक पाळीत होणारे बदल जाणून बसेल धक्का.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम