Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..
Health tips: बाहेरून थकून घरात आल्यानंतर, तुम्हाला प्रचंड जोराची तहाण लागलेली आहे. त्यामुळे घरात शिरताच हात धुतल्याबरोबर लगेच तुमचे पाय पाण्याच्या माठाकडे वळतात. आणि तुम्ही ऊभ्या-ऊभ्याच गटागट पाणी पिऊन तुमची तहान भागवता. मात्र हेच घरातल्या कुणा मोठ्या व्यक्तीने बघितले की, ते तुम्हाला रागावतात आणि बसुन पाणी पिण्यास सांगतात. असे बर्याचदा तुमच्यासोबत सुद्धा झाले असेल. मात्र हे बसुन पाणी पिण्याचाच आग्रह का केला जातो? पाणी हे शेवटी पाणीच तर आहे. बसुन पिले काय आणि ऊभे राहून पिले काय शेवटी तहान भागवणे ऐवढेच काय पाण्याचे काम आहे. मात्र असा विचार जर तुमच्या डोक्यात असेल, तर तुम्ही चुकीचा विचार करता आहात. कारण पाणी आपल्या शरीरात फार महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे तुम्ही पाणी बसुन पिता की ऊभे राहून पिता याचा शरीरावर खुप मोठा परिणाम होतो. (Proper method of drinking water)
रोजच्या धावपळीच्या जिवनात आपण बर्याचशा बारीक-सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मात्र या बारीक-सारीक गोष्टी कधी गंभीर स्वरुप धारण करतात, आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घेणे जरुरी आहे. ऊभ्याने पाणी पिल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. पाणी हे जरी सामान्य वाटत असले, तरी ते शरीरासाठी फार मोठी भूमिका बजावत असतात. शरीरातील पाण्याचे असंतुलन तुमच्या शरीरातील सर्व सुरळीत क्रिया क्षणार्धात बिघडवू शकते. त्यामुळे गंभीर आजार ऊद्भवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणूनच तुम्ही पाणी कसे पिता हे सुद्धा महत्वाचे आहे. आज या लेखात आपण ऊभ्याने पाणी पिण्याचे नुकसान आणि त्याउलट बसून पाणी पिण्याचे फायदे हे जाणुन घेणार आहोत.
ऊभ्याने पाणी पिण्याचे नुकसान
अपचनाची समस्या: ऊभ्याने पाणी पिल्याने एकाचवेळी सर्व स्नायुंवर ताण येतो. तसेच ज्या अवयवांपर्यंत पाण्याची गरज आहे, तीथपर्यंत पाणी पोहचतच नाही. ऊभ्याने पाणी पिल्यास ते थेट अन्न नलीकेद्वारे पोटात जाते. त्यामुळे अन्ननलिकेच्या स्नायुंवर दाब निर्माण होतो. परिणामी तुम्हाला अपचनाच्या समस्या ऊद्भवु शकतात. ऊभ्याने पाणी पिल्यास ते शरीरातील ईतर कुठल्याही अवयवाच्या विशेष ऊपयोगात येत नाही. याशिवाय पचनप्रक्रियेत पाण्याचा सहभाग कमी होऊन जातो. त्यामुळे पचन्यास सुद्धा जड जाते आणि ऍसीडिटीचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता अधिक असते.
किडनीचे विकार
ऊभे राहुन पाणी पिण्यास सामान्य बाब समजणे हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायी आहे. कारण ऊभ्याने पाणी पिल्याने सर्व पाणी थेट शरीरातून वाहून जाते. किडनी आणि मुत्राशयात शरीरातली काही घाण साचलेली असते. जी पाण्याच्या सहाय्याने शरीराबाहेर फेकली जाणे अपेक्षित असते. मात्र ऊभ्याने पाणी पिल्यास किडनी आणि मुत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे किडनीवर त्याचा परिणाम होऊन किडनी संबंधीत विकार होण्याची शक्यता बळावते. किडनी संबंधीत आजार झाल्यास ते दीर्घकाळ शरीरावर अपाय करु शकतात.
बसून पाणी पिण्याचे फायदे
रक्त शुद्ध होते: ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऊभ्याने पाणी पिण्याचे दुष्परिणाम सांगितले, व त्याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला बसून पाणी पिण्याचे काही फायदे सुद्धा सांगणार आहोत. त्यापैकीच एक फायदा म्हणजे, बसुन पाणी पिल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. पाण्याचे आपल्या शरीरात एक विशेष महत्व आहे. पाणी शरीरातील सर्व क्रिया सुरळीत सुरु ठेवण्यास मदत करते. बसुन पाणी पिल्याने ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवते. तसेच रक्त शुद्ध करण्यात सुद्धा पाण्याचा ऊपयोग होतो. त्यामुळे पाणी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील करते.
मुत्रपिंड स्वच्छ करते व मुतखड्यावर प्रभावी
पाणी एकप्रकारे शरीराला स्वच्छ ठेवण्याचे काम सुद्धा करते. शरीराला काही आवश्यक गोष्टी पाण्यामधून मिळतात. ऊर्वरीत पाणी आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांना समाविष्ट करुन मुत्रपिंडाद्वारे शरीराच्या बाहेर नेऊन टाकते. पंरतू ऊभ्याने पाणी पिल्यास ही प्रक्रिया सुरळीतपणे होत नाही. याउलट बसून पाणी पिल्यास मुत्रपिंडापर्यंत पाणी पोहचते व मुत्रपिंडातील विषारी घटकांना सामावून घेत शरीराच्या बाहेर पडते. एकंदरीतच बसुन पाणी पिण्याने मुत्रपिंड स्वच्छ होते.
उभा राहून पाणी पिल्यास मुतखडा देखील होण्याची शक्यता असते. मात्र बसून शांतते जास्तीत जास्त पाणी पित राहिल्यास मुतखड्याचा त्रास नाहीसा होतो.
ऊर्जा मिळते
आपण बर्याचदा बघतो, की एखादे काम जास्त झाल्यास आपल्याला पाण्याची गरज भासू लागते. अशावेळी पाणी पिल्यास आपल्याला आरामदायी वाटते. नव्याने ऊर्जा आल्यासारखी जाणवते. मात्र ऊभ्याने पाणी पिल्यास असे होणे थोडे कठीण आहे. याऊलट बसून पाणी पिल्यास शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाणी पोहचते. त्यामुळे स्नायुंमधील थकवा नाहीसा होतो. याशिवाय बसून एक-एक घोट पाणी पिल्यास शरीराला आर्द्रता मिळते. त्यामुळे त्वचा चमकदार राहते. परिणामी पाणी पिल्याने आपला थकवा नाहीसा होतो. आणि आपल्याला ताजेतवाने वाटायला लागते.
पचनक्रिया सुधारते
बसुन शांततेत पाणी पिल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनक्रियेदरम्यान शरीरातील काही द्रव्यांचा वापर होतो. त्यादरम्यानच पाण्याचा सुद्धा वापर होतो. बसुन पाणी पिल्यास शरीरात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात राहतो. त्यामुळे शरीराला ते पाणी विविध कार्यांसाठी ऊपयोगी पडते. पचनक्रियेत सुद्धा पाण्याचा मुबलक वापर होणे अपेक्षित असते. अन्यथा शरीरातील द्रव्यांचे असंतुलन झाल्यास पित्त आणि ऍसीडिटीच्या समस्या ऊद्भवतात. त्यामुळे बसुन शांततेतच पाणी पिले पाहिजे. तसेच बसुन पाणी पिल्यास मेंदुला तहान भागल्याच्या सुचना होतात. याऊलट ऊभ्याने पाणी पिल्यास असे होत नाही. त्यामुळे कितीही पाणी पिले तरी तहान भागल्यासारखे जाणवत नाही. मात्र बसुन शांततेत पाणी पिल्यास मेंदुला तहान भागल्याच्या सुचना जातात आणि त्यानुसार मेंदु पुढील कार्य करतो.
हे देखील वाचा Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..
clean shave benefit: आठवड्यातून किती वेळा दाढी केली पाहिजे; जाणून घ्या clean shave करण्याचे फायदे..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम