clean shave benefit: आठवड्यातून किती वेळा दाढी केली पाहिजे; जाणून घ्या clean shave करण्याचे फायदे..
clean shave benefit: सध्या दाढी ठेवण्याचा नवा ट्रेंन्ड आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणांना वाटतं, की आपल्या चेहर्यावर भलीमोठी दाढी असावी. आजकाल मुली सुद्धा दाढी असणार्या मुलांना बघूनच ईम्प्रेस होतात किंवा त्यांनाच भाव देतात. असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्याही चेहर्यावर मोठी दाढी असावी असे वाटत असते. परंतू काही हार्मोनल्स बदलांमुळे सर्वांनाच दाट आणि विरळ दाढी येते असे नाही. दाढीमुळे पुरुष रुबाबदार दिसतात, असा पुरुषांबरोबरच महिलांचा देखील समज आहे. साहजिकच यामुळे अनेकजण दाढी ठेवताना पाहायला मिळतात. मात्र दाढी ठेवण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
अनेकांना ट्रेन्डनुसार जगण्याची सवय असते. साहजिकच यामुळे दाट आणि विरळ दाढीने सध्या तरुणाईवर प्रचंड भुरळ घातली असल्यामुळे, ज्यांना दाट दाढी येत नाही, असे तरुण त्यासाठी औषधांचा ऊपयोग करतात. बरीच मुलं डॉक्टरांकडे सुद्धा जातात. मात्र काहीजण कुणाच्यातरी सांगण्यावरुन डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी बाजारात ऊपलब्ध असलेले प्रॉडक्ट घेतात, आणि त्याचा वापर करतात. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागल्याच्या घटना आपण नेहमी पाहतो.
भलीमोठी दाढी ठेवण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात? याची कल्पना दाट दाढी ठेवणार्यांना कधीच नसते. दाट दाढी ठेवणे आरोग्यासाठी काही लाभदायी आहे का? किंवा आरोग्यावर त्याचा काय अपाय होऊ शकतो? याबद्दल थोडेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. मात्र दाढी ठेवल्याने तुम्हाला काही दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. याऊलट रोज दाढी करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तुम्ही सुद्धा रोज दाढी करण्याचे हे फायदे जाणुन घेतले पाहिजे. कारण हे प्रत्येकासाठीच फायद्याचे आहे.
ताजेतवाने वाटते
रोज दाढी केल्याचे अनेक फायदे आहेत. दाढी केल्याने त्वचा सुंदर दिसते. तसेच चेहर्यावरील केस स्वच्छ होतात. यासोबतच दाढी जास्त वाढवलेली असल्याने चेहर्याच्या पृष्ठभागावर मृत त्वचा निर्माण होते. जी रोज दाढी केल्याने नाहीशी होते. रोज दाढी करणारे जास्त प्रोडक्टीव असतात. त्यांना ताजेतवाने आणि ऊत्साहवर्धक वाटते. त्यामुळे नवनविन कल्पनांना ते साकार करण्याच्या प्रयत्नांत असतात. एका अभ्यासानुसार, रोज सकाळी दाढी करणारा व्यक्ती प्रॉडक्टीव्ह तर असतेच, पण त्यासोबतच त्याचा दिवसही अतिशय छान आणि आनंदी जातो. याउलट दाढी वाढल्याने नेहमी शरीरावर काही ना काही ओझे असल्यासारखे जाणवते. त्यामुळे मोकळं व ताजतवान वाटण्याच फिल घ्यायचं असेल, तर रोज व्यवस्थित दाढी करायला हवी.
जंतूंपासून संरक्षण
मोठी दाढी असल्यास दाढीमध्ये जीवजंतू बसण्याची शक्यता असते. दाढीच्या केसांमध्ये हे जीवजंतू राहत असल्याने, चेहर्यावर काळे डाग पडतात. त्यासोबतच चेहर्यावरील त्वचा खराब होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. त्यामुळे रोज दाढी केल्यास तुम्ही या समस्यांपासून वाचू शकता. रोज दाढी केल्याने या जीवजंतूना तुमच्या चेहर्यावर बसण्यास जागा राहत नाही. याशिवाय शेव्हींग दरम्यान वारण्यात आलेले क्रीम आणि जेल तुमच्या चेहर्यावरील पी-एच लेव्हल संतुलीत ठेवण्यास मदत करते.
तरुण दिसण्यास मदत.
चेहर्यावर जास्त दाढी असल्याने तुम्ही सुंदर दिसत असला, तरी रोज दाढी केल्यास तुम्ही त्यापेक्षा सुंदर दिसू शकता. रोज दाढीचा परिणाम थेट तुमच्या चेहर्याच्या त्वचेवर होतो. शेव्हींगमुळे तेथील त्वचेची एक प्रकारे मसाज होते. परिणामी तेथील पेशींना काही स्वरुपात चालना मिळते. अणि त्या टवटवीत राहतात. त्यामुळे तुमची त्वचा सुद्धा टवटवीत जाणवते. रोज शेव्हींगने चेहर्यावरील मृत त्वचा निघुन जाते. तसेच चेहर्यावरील त्वचेत मेलेनिन आणि केराटिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे नविन येणारी त्वचा ताजी आणि टवटवीत दिसते. त्यामुळे तुम्ही तरुण दिसु लागता.
शेव्हींग नंतर या गोष्टी लावणे फायद्याचे
रोज शेव्हींग करण्याचे किती महत्व आहे. हे तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल. पण रोज शेव्हींग करण्याबरोबरच चेहर्यावरील त्वचेची विशेष काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. शेव्हींगदरम्यान किंवा शेव्हींग नंतर नैसर्गिक गोष्टी त्वचेवर लावल्यास त्याचा तुम्हाला अधिक लाभ होऊ शकतो. अनेक त्वचा तज्ज्ञ असे सांगत असतात. यामध्ये विशेषत: थंड दुध, सफरचंद, पपई, कोरफड यांचा समावेश ठेवायला हवा. शेव्हींग नंतर या रोज करण्यापेक्षा आठवड्यातून ठराविक वेळेस तुम्ही या गोष्टी चेहर्यास लावल्यास चेहर्यावरील त्वचेला आराम मिळतो. त्वचेवर पुरळ ऊठणे, त्वचेचा भाग खाजवण्यासारख्या बाबींपासून तुम्ही सुटका मिळवू शकता.
हे देखील वाचाbalance between wife and mother: पत्नी आणि आईचे भांडण होत असेल तर करा हे काम; आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही भांडण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम