women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
women notice about men: पुरुषांचे व्यक्तीमत्व त्यांच्या सवयीवरुन ठरत असते. त्यामुळे आपण कायम चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत. कारण व्यक्तीमत्व विकासास आज प्रचंड मागनी वाढली आहे. चांगल्या गुणांनी संपन्न आणि इतरांना समजावुन घेत व्यवस्थितरीत्या परिस्थिती हाताळता येणार्या व्यक्ती सगळ्यांना हव्याशा वाटतात. चांगल्या सवयी तुमच्यामध्ये अनेक चांगले बदल घडवुन आणु शकतात. चांगल्या सवयी चांगला व्यक्ती म्हणून तुमची ओळख समाजात प्रस्थापित करु शकतात. समाजात ज्यांना मान व प्रतिष्ठा आहे. अशांकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात. त्यामुळे काही सवयी तुम्हाला मान व प्रतिष्ठेपर्यंत पोहचवू शकतात. तसेच समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण करु शकतात. यासाठी बर्याचदा पैसे घेऊन मार्गदर्शन शिबीर सुद्धा घेतले जातात. परंतू तुम्ही जर चाणाक्य यांचे विचार वाचत असाल, तर तुम्हाला कशाचीही गरज भासणार नाही. (Chanakya niti)
समाजाप्रमाणाचे स्त्रिया सुद्धा चांगल्या व्यक्तीमत्वाच्या शोधात असतात. जिवनसाथी म्हणून ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे, अशा पुरुषाची निवड करतांना स्त्रिया पुष्कळ विचार करतात. तसेच पुरुषांच्या सवयींकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे परिचयातल्या एखाद्या ‘स्त्री’वर अथवा तुम्ही जिच्यावर प्रेम करता अशा महिलेवर तुम्हाला तुमचा प्रभाव पाडायचा असेल, तर काही गुण तुमच्यात असणे अनिवार्य आहे. चाणाक्य यांनी याबाबत सांगून ठेवलेले आहे. आजच्या या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत. स्त्रिया नेमक्या पुरुषांच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष देतात? पुरुषाचे कुठले गुण त्यांना सर्वात जास्त आवडतात?
प्रामाणिक असणे
प्रामाणिकतेवर चाणाक्य यांनी पुष्कळ भाष्य केले आहे. माणसाने नेहमि प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकता हे नैतिकतेचे लक्षण आहे. नातेसंबंधात प्रामाणिक असल्यास सर्वत्र त्या व्यक्तीचे कौतूक केले जाते तसेच आदर सुद्धा केला जातो. प्रामाणिकता अंगी असणारा माणुस कुणालाही फसवण्याअगोदर दहा वेळा विचार करतो. स्त्रियांना पुरुषांचा हा गुण खुप आवडतो. प्रामाणिक माणुस कधीच त्याच्या पत्नीस किंवा प्रेमिकेस फसवत नाही. आपल्या पत्नीशी खोटे बोलणे टाळतो, कधीच दोघांमधील विश्वासाला तडा जाणार नाही, याची विशेष काळजी घेतो. त्यामुळे स्त्रियांना पुरुषांचा प्रामाणिकपणा हा गुण विशेष आवडतो.
ऐकुण घेणारा
एखाद्या व्यक्तीस कायम बडबड करण्याची सवय असते. त्याचा ऊल्लेख समाजात वाचळवीर म्हणून केला जातो. याऊलट जो शांतपणे ऐकुण घेण्याच्या भुमिकेत असतो त्यास शांत व संयमी संबोधले जाते. एका चांगल्या माणसात ऐकुण घेण्याचा गुण असलाच पाहिजे. असे चाणाक्य म्हणतात. समोरच्याचे ऐकुण घेतल्याने त्यास आदर दिल्याची जाणीव होते. बर्याचदा गैरसमजातून निर्माण झालेले दुरावे केवळ ऐकुण घेतल्यामुळे कायमचे कमी होऊन जातात. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा पुरुषांमधला ऐकुण घेण्याचा गुण विशेष भावतो. आपल्या साथीदाराने आपले ऐकुण घ्यावे अशी महिलांची ईच्छा असते. त्यामुळे जे पुरुष महिलांच्या बोलण्याकडे लक्ष देतात, त्यांच्या बोलण्यास मनावर घेतात व त्यांचे बोलणे शांतपणे ऐकुण घेतात असे पुरुष महिलांना आवडत असतात.
चांगली वागणुक
आपण एखाद्याला देत असणार्या वागणुकीवरुन सुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरवला जातो. आपण लोकांशी नेमके कसे वागतो? तुसडेपणाने वागतो की आदरपुर्वक वागतो? कायम स्वार्थी भावनेने वागतो की दुसर्यांची मदत करण्याच्या भावनेने वागतो यावरुन आपले समाजातील स्थान ठरत असते. त्यामुळे तुमची वागणूक तुमच्या आयुष्यात महत्वाची भूमिका निभावते. चाणाक्य यांनी वागणूकीवर पुष्कळ भाष्य केले आहे. ईतरांना चांगली वागणूक देणारे पुरुष महिलांना आवडत असतात. सोबत वावरत असतांना आपला सन्मान ठेवला पाहिजे, वेळप्रसंगी आपले कौतुक केले पाहिजे, कधी आदारही दाखवला पाहिजे अशी स्त्रियांची ईच्छा असते. त्यामुळे स्त्रियांशी आपण योग्यरितीने वागल्यास त्या तुम्हाला प्रतिसाद देतात.
मृदु स्वभाव
पुरुष म्हणलं की तापट आणि कडक स्वभाव आपल्या डोळ्यांसमोरे येतो. परंतू महिलांना तापट स्वभावाचे पुरुष बिल्कुल आवडत नाही. त्यांना कायम मृदु आणि कोमल स्वभावाचे पुरुष आवडता. चाणाक्य यांनी सुद्धा मृदु आणि कोमल स्वभावाचे महत्व अधोरेखीत केले आहे. त्यांच्यामते पुरुषाने वेळप्रसंगी तापट आणि कठोर झालेच पाहिजे.
मात्र सामान्यत: पुरुषाचा स्वभाव सुद्धा मृदु असावा. सर्वांप्रथी आस्था व प्रेमाची भावना त्याच्या मनात असावी. महिलांना सुद्धा अशाच स्वभावाची पुरुषे आवडतात. काही चुकीचे घडल्यासही शांततेने आपली बाजु ऐकुण घेणारे, कायम आपल्यावर प्रेम करणारे पुरुष स्त्रियांना आवडतात. याऊलट तापट स्वभाव असणार्या व्यक्तींच्या दुरच राहण्याचा प्रयत्न त्या करतात.
हे देखील वाचा Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..
Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..
NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम