Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

Indian Army NCC Recruitment 2022: बेरोजगारीचा (unemployment) दर दिवसेंदिवस वाढत चाललेला तर आहेच. मात्र बेरोजगारी बरोबर महागाई (inflation) देखील गगनाला भिडत आहे. अशा परिस्थितीत कुठेतरी चार पैशाची नोकरी (Job) मिळवणं खूप आवश्यक बनलं आहे. खास करून सर्वसामान्य कुटुंबातला एखादा तरुण कमावता असला तरच त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अलीकडच्या काळात नोकरी शोधणे ही खूप आव्हानात्मक गोष्ट असली तरी, काही विभागात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. ही देखील वस्तूस्थिती आहे. मात्र अनेकांना या संदर्भात माहिती नसल्याने, चांगल्या नोकरीला अनेक होतकरु तरूण मुकतात. आणि म्हणून आम्ही गोष्ट लक्षात घेऊन, नोकरीच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देत असतो. Indian Army NCC Recruitment 2022

भारतीय सैन्यमध्ये आता एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत 23 53 या कोर्स पदांसाठी भरती निघाली असून, यासंदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी आता अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून, याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर देण्यात आलेली आहे. भारतीय सैन्य एनसीसी पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत 23 53 या कोर्ससाठी एकूण 55 रिक्त पदांची भरती होणार आहे. जाणून घेऊया भरती संदर्भातली सविस्तर प्रक्रिया. Indian Army NCC Recruitment 2022 :

पदाचे नाव तसेच शैक्षणिक पात्रता.

NCC स्पेशल एंट्री (पुरुष) पदासाठी 50 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 50 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे 50 टक्के होऊन अधिक गुण असणे आवश्यक आहे. या गुणांसह उमेदवारांचे पदवीधर शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच एनसीसीमध्ये दोन वर्ष सेवा केल्याचे प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे. NCC स्पेशल एंट्री (महिला) 05: या पाच रिक्त जागांसाठी महिलांची निवड करण्यात येणार आहे. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा असल्यास 50% गुणांसह पदवीधर उमेदवार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/ फी/ ठिकाण

भारतीय सैन्यमध्ये एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत 23 53 या कोर्स पदांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या वयाचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचा जन्म हा दोन जानेवारी 1998 नंतर होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 2004 या कालावधीत जन्म असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही‌. त्याचबरोबर या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. आता आपण या भरती अंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वेतनाविषयी जाणून घेऊ.

वेतन आणि अर्ज प्रक्रिया

भारतीय सैन्यमध्ये एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत 23 53 या कोर्स पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वेतनाविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, उमेदवारांना 56 हजार 100 ते दोन लाख 50 हजार रुपये पर्यंत वेतन असणार आहे. आपण या भरती प्रक्रियासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेऊ. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx असं सर्च करायचं आहे.

https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx असं सर्च केल्यानंतर त्यांच्यासमोर एक चार्ट ओपन होईल. त्या चार्टमध्ये कॅप्चा टाकायचा आहे. कॅपच्या टाकल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. उजव्या साईटला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, ऑनलाईन अर्ज करू शकता. या नोकरी संदर्भातली अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

Lata Koli News: बिबट्या झडप टाकणार इतक्यात वयोवृद्ध महिलेने टाकली पुर आलेल्याया तापी  नदीत ऊडी; पुढे पुरात जे घडले ते पाहून..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Law For Women भांडण सोडा, पत्नीला फक्त हे जरी म्हणाला, तरी खावी लागेल जेलची हवा; कायदा वाचून लग्न करायलाही घाबराल

Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.