Cotton candy business: 8 हजार गुंतवून ‘कॉटन कॅन्डी’चा व्यवसाय सुरू करा; दरमहा होईल लाखोंची उलाढाल..
Cotton candy business: दिवसेंदिवस बेरोजगारीचा (unemployment) दर वाढत चालला असल्याने, आता नोकरी मिळवणं जवळजवळ अशक्य झालं आहे. एकीकडे बेरोजगारीचा दर वाढत आहे, तर दुसरीकडे महागाई (inflation) देखील गगनाला भिडत चालली आहे. अशा परिस्थितीत कुठेतरी चार पैशाची नोकरी करणं फार गरजेचं बनतं. मात्र प्रचंड महागाई असल्याने कमी पगाराची नोकरी केल्याने उदरनिर्वाह करणं देखील शक्य होत नाही. अशा परिस्थितीत छोटा मोठा व्यवसाय करणं हाच तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरतो. जर तुम्ही देखील नोकरी शोधून थकला असाल, किंवा नोकरीला कंटाळला असाल, आणि काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसल्याने, अनेक जण नोकरीचा पर्याय निवडतात. नोकरी करत असताना अनेकांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य गहाण ठेवावं लागतं. नोकरी करत असणाऱ्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात देखील येईल. नोकरीला जर तुम्ही कंटाळला असाल, आणि तुमच्याकडे भांडवल देखील खूप कमी असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये देखील जबरदस्त नफा मिळवण्याचा व्यवसाय टाकू शकता. कोणता आहे तो व्यवसाय? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.
कमी गुंतवूकित जास्त नफा मिळवून देणारा ‘कॉटन कॅन्डी’ हा व्यवसाय अलीकडच्या काळात कमालीचा लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे. ‘कॉटन कँडी’ या व्यवसाविषयी अनेकांना माहिती देखील असेल. जर तुम्ही खेडेगावात राहत असाल, तर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही याला ‘लालीलाल’ म्हणत होता. लालीलाल म्हणजेच ‘कॉटन कँडी’ एक रुपयाला एक पाकीट विकला जायचं, आता याची किंमत तब्बल दहा रुपयांपर्यंत आहे. अनेकांना हे कशापासून बनतं आणि कुठे मिळतं? हे देखील माहिती नसेल. मात्र तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, हे तुम्ही घरगुतीही बनवू शकता. जर तुम्ही मोठा व्यवसाय करू इच्छित असाल, तर कॉटन कँडी बनवण्याची मशीन केवळ पाच ते दहा हजार रुपयांच्या आसपास मिळते. हा व्यवसाय करण्यासाठी मशीन व्यतिरिक्त कुठल्याही मोठ्या साधनांची आवश्यकता नाही.
कॉटन कँडी बनवण्यासाठी या वस्तूंची गरज
कुठलाही व्यवसाय करायचा झाल्यास, त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे फार आवश्यक असतं. उत्पादन पासून ते कच्चामाल, त्याचबरोबर तो बनवण्याची प्रोसेस आणि मार्केटमध्ये त्याला किती मागणी आहे? यावर तुमच्या यशस्वी व्यवसायाचे गमक अवलंबून असते. ‘कॉटन कॅन्डी’ हा असा एक व्यवसाय आहे. यासाठी मॅन वर्क देखील खूप कमी लागते. ‘कॉटन कँडी’ म्हणजेच तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर लालीलाल. हे बनवण्यासाठी फक्त साखर, फ्लेवर आणि फूड कलरची गरज आहे. तीन वस्तूंबरोबर तुम्हाला कॉटन कँडी बनवण्यासाठी एक मशीनची आवश्यकता असणार आहे. मशीनची निवड कशी करायची? याविषयी देखील आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वरील तीन वस्तू तुम्हाला मशीनमध्ये टाकाव्या लागणार आहेत. हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर केसासारख्या रेषा असणारा पदार्थ तयार होतो. हे तयार झालेला मटेरियल म्हणजेच, आपण त्याला ‘कॉटन कँडी’ म्हणतो. आता तुम्हाला साखर फ्लेवर आणि फूड कलर हे तीन पदार्थ मशीनमध्ये टाकायचे आहेत. ही मशीन केवळ बाजारामध्ये आठ ते दहा हजार रुपयांच्या किंमतीमध्ये मिळते. म्हणजेच दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि लाखो रुपये दरमहा मिळवू शकता.
कुठे विकायचा हा माल
बिजनेसचे यश हे मागणीवर अवलंबून असते. कॉटन कँडी या पदार्थाला खास करून शाळा, त्याचबरोबर कॉलेज, मॉलसमोर किंवा यात्रेच्या ठिकाणी याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता तुम्हालाही ‘कॉटन कॅन्डी’ विकण्यासाठी अशीच ठिकाणांची निवड करायची आहे, जेणेकरून तुम्ही काढलेला माल लगेच खपला जाईल. यासाठी तुम्ही काही जणांची टीम देखील निवडू शकता. कॉटन कॅन्डी हा पदार्थ विकण्याची तुमच्याकडे कला आणि टीम असेल, तर तुम्ही या या व्यवसायातून लाखों रुपये कमवू शकता. आपण या ‘कॉटन कँडी’ कशी तयार करायची? आणि या निर्मितीतून नफा कसा मिळवायचा? हे देखील विस्तृतपणे जाणून घेऊ.
मशनीची निवड
तुम्हाला तुमचा व्यवसाय किती मोठा करायचा आहे, यावर तुम्ही मशीनची निवड करणं आवश्यक आहे. जर तुम्ही दोन-तीन लोकं कामासाठी ठेवणार असाल, तर तुम्ही छोट्या मशीनची निवड केली तरी देखील चालू शकतं. कॉटन कँडी बनवण्यासाठी मशीन कोणत्याही संबंधित दुकानावर मिळू शकते. जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या इ कॉमर्स वेबसाईट देखील या मशीन उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर तुम्हाला मशीन खरेदीवर सूट देखील मिळेल.
खर्च आणि पॅकेट
जर तुम्हाला या व्यवसायाविषयी काही शंका असतील, तर तुम्ही सुरुवातीला छोटी मशीन देखील खरेदी करू शकता. या मशीनच्या माध्यमातून दररोज तुम्ही पाचशे ते सहाशे कॉटन कॅंडीचे पॅकेट दिवसभरात तयार करू शकता. पाचशे ते सहाशे कॉटन कॅन्डी पॅकेट तयार करणाऱ्या मशीनची किंमत केवळ पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत आहे. आता आपण कॉटन कॅन्डी हा पदार्थ कसा बनवायचा? हे देखील विस्तृतमध्ये जाणून घेऊ.
कॉटन कॅन्डी कशी बनवायची?
कॉटन कॅन्डी हा पदार्थ साखरेपासून बनवला जातो. त्यामध्ये 99 टक्के साखर असते. तर एक टक्के फूड कलर आणि या कॉटन कॅन्डीचा फ्लेवर मिसळला जातो. या तीन पदार्थांचे मिश्रण या मशीनमध्ये ठेवलं जातं. तीनही पदार्थ मशीनमध्ये ठेवल्यानंतर मशीन वाऱ्याच्या वेगाने या पदार्थांना फिरवते. या तीनही पदार्थांचे मिश्रण हे पाण्यासारखं होऊन, नंतर केसाच्या रेषा सारखा पदार्थ कपावर जाऊन तयार होतो. मशीनमधून पदार्थ लाकडाच्या सहाय्याने गोळा करून बाहेर काढला जातो. आणि एका प्लास्टिकचा बॅगेत पॅक केला जातो.
हार्ट, प्राण्यांच्या आकाराचे कॉटन कॅन्डी बनवण्याचे फायदे
कोणत्याही व्यवसायामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन करणं आवश्यक असतं. या व्यवसायत देखील हाच नियम लागू होतो. जर तुम्ही प्राण्यांच्या आकाराचे कॉटन कँडी बनवले, त्याचबरोबर हृदयाच्या आकाराचे कॉटन कँडी बनवले, तर अशा ‘कॉटन कॅन्डी’ कडे लोक आकर्षित होतात. जर तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असेल, तर तुमच्याकडे ग्राहक अधिक आकर्षित होतात. त्यामुळे अशा क्रिएटिव्हिटीमुळे व्यवसायात यश मिळवण्याला अधिक चालना मिळू शकते.
ही गोष्ट लक्षात ठेवा
कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही सर्वप्रथम सर्वेक्षण करणं आवश्यक आहे. ‘कॉटन कँडी’ हा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त गर्दी असेल, अशी ठिकाणे शोधावी लागणार आहेत. तुम्हाला मॉल कुठे आहे? हे शोधायचं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, याशिवाय तुम्ही मोठमोठ्या किराणा स्टोअर्सला भेट देऊन देखील तुम्ही ‘कॉटन कॅन्डी’ विकू शकता. ज्या ठिकाणी पर्यटनस्थळे असतील, त्याचबरोबर समुद्रकिनारी, यात्रेमध्ये देखील तुम्ही कॉटन कँडी अधिक मोठ्या प्रमाणात विकू शकता.
पगाराऐवजी कमिशन दया
कॉटन कॅन्डी बनवल्यानंतर तुम्ही विकण्यासाठी जी टीम निवडणार आहात, त्यांना पगार ऐवजी तुम्ही कमिशन देऊन ठेवणं अधिक सोयीस्कर आणि नफ्याचं होऊ शकतं. जर तुमच्याकडे घरात सदस्य असतील, तर तुम्ही घराच्या सदस्यांना देखील विकण्यासाठी पाठवू शकता. तुम्ही कामगार निवडणार असाल, तर त्यांना पगाराऐवजी कमिशन देऊन नेमल्यास अधीक काळजीने काम करतील. याशिवाय तुम्हाला दिलेल्या वस्तूंवर अधिक लक्ष देखील ठेवण्याच्या गरज पडणार नाही.
हे देखील वाचा Marriage Tips: एका वर्षानंतर मॅरेज लाईफ का होते बोरिंग? वैवाहिक जीवनात प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स..
snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.