Income Certificate: घरबसल्या मोबाइलवर उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत..
Income Certificate: केंद्र तसेच राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास, उत्पन्नाचा दाखला खूप आवश्यक असतो. याबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी देखील उत्पन्नाचा दाखला खूप महत्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थांना सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक आहे. याशिवाय नोकरीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी देखील उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असतो. आज आपण उत्पन्नाचा दाखला घरबसल्या मोबाईल वरून कसा काढायचा? यासंदर्भात सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. How to get income certificate from Aaple Sarkar
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पूर्वी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागत होते. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी असणारी सविस्तर प्रोसेस पूर्ण करून देखील, अनेक महिने उत्पन्नाचा दाखला सेतूमधून मिळत नसल्याच्या घटना देखील आपण पहिल्या असतील. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. तहसील कार्यालयामधील सेतू विभागात उत्पन्नाचा दाखला काढणे, ही प्रक्रिया अनेकांना खूप किचकट वाटते. अनेकांच्या घरापासून हे कार्यालय बरचसं लांब असल्यामुळे या सेतूच्या भानगडीत पडत नाहीत. शेतातली काम सोडून अनेकांना उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी एक दोन दिवस सेतूमध्ये हेलपाटे घालावे लागत असायचे पाहायला मिळायचे.
सर्वसामान्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे काढण्यासाठी तहसीलमध्ये जावे लागत आहे. अनेकांचे घर सेतु पासून खूप लांब आहे. ही बाब लक्षात घेण्यात आली. आणि मग कॉमन सर्विस सेंटरमध्ये अनेक कागदपत्रे काढता येऊ लागली. मात्र या सेंटरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सामन्यांची लूटमार होऊ लागली. अनेकजण याला कंटाळून आता अनेक कागदपत्रे घरच्या घरीच मोबाइलवर काढू लागली. कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन आपल्या वेळेबरोबरच पैसा देखील खर्च होत असल्याने अनेकजण घरच्या घरीच अनेक कागदपत्रे काढू लागली. तुम्हालाही नेहमी लागणारा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सर्वप्रथम आपण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जाणून घेऊ.
उत्पन्नाचा काढण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
पॅन कार्ड, (pan card)आधारकार्ड, (Aadhar card) मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, driving licence) इत्यादी ओळखपत्रांपैकी एक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा फोटो, रहिवाशी दाखला किंवा पत्ता सांगणार पुरावा. उदा, पासपोर्ट, रेशन कार्ड, (ration card) या पैकी एक असणे आवश्यक. तलठ्याचा उत्पन्नाचा दाखला. सोबतच सातबारा, इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक आहेत.
जर तुम्ही टॅक्स होल्डर असाल, तर प्राप्तिकर परतावा भरला असल्याचा पुरावा, जर तुम्ही निवृत्त पेन्शनधारक असाल तर बँक प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर 7/12 आणि 8 अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सोबतच स्वयंघोषणापत्र जोडणे देखील सर्वांसाठी अनिवार्य आहे. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हे जाणून घेऊ.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ असं सर्च करायचं आहे. या नंतर आपले सरकार नावाचे अधिकृत पोर्टल ओपन झालेलं असेल. अधिकृत पोर्टल ओपन झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर, ईमेल आयडी टाकून लॉगिन करावं लागणार आहे.
मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून लॉगिन केल्यानंतर, तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. ओपन झालेल्या डॅशबोर्डवर तुम्हाला अनेक विभाग पाहायला मिळतील. या विभागातून तुम्हाला ‘महसूल seva’ हा विभाग निवडायचा आहे. ‘महसूल seva’ हा पर्याय निवडल्यानंतर, पुन्हा एकदा तुमच्या समोर अनेक पर्याय दिसतील. मात्र या पर्यायातून तुम्हाला ‘मिळकतीचे प्रमाणपत्र’ हा पर्याय निवडायचा आहे.
मिळकतीचे प्रमाणपत्र’ हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल, या लिस्टमध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे तुम्ही वाचून ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावी लागणार आहेत. तुम्ही वाचलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला नंतर, या पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत. पोर्टलवर तुम्हाला तुमच्या बाबत असणारी सर्व माहिती भरायची आहे. पत्ता देखील टाकायचा आहे. संबंधित पत्त्यावर किती वर्ष राहत आहात, हे देखील तुम्हाला टाकावं लागणार आहे.
वरील सर्व माहिती टाकून झाल्यानंतर, तुम्हाला संबंधित सर्व कागदपत्रे ७५ ते ४५० केबीमध्येच अपलोड करावी लागणार आहेत. कागदपत्रांबरोबरच तुम्हाला तुमचा फोटो आणि सही देखील अपलोड करावी लागणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्ही भरलेला अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल, ही पावती तुम्ही जपून ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर, पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला घरपोच उत्पन्नाचा दाखला मिळेल. तुम्हाला पंधरा दिवसानंतरही उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही, तर तुम्ही या पोर्टलवर जाऊन अपील देखील करू शकता.
हे देखील वाचा Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..
Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Breakup: ब्रेकअपनंतर मुली उचलतात ही पाच धक्कादायक पावले; तुमच्या भविष्यासाठी जाणून घेणे आवश्यक..
Call recording: कॉल रेकॉर्डिंग कोणी करत असेल, तर या ट्रिक्स वापरून येते ओळखता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.