धक्कादायक! पुन्हा एकदा कोरोना महामारी येणार, धक्कादायक माहिती समोर; WHO ने दिला सतर्कतेचा इशारा..

2019 मध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. जगभरात लाखोंच्या संख्येने कोरोनाने बळी घेतले. जग आता कुठे कोरोणा महामारीतून बाहेर आले होते. तेवढ्यात पुन्हा एकदा कोरोणा त्याचे पाय पसरताना दिसतोय. आज जरी कोरोनाचे रुग्ण कमी असले, तरीदेखील कोरोना विषाणूचा धोका अजूनही पुर्णपणे नाहीसा झाला नाही. जगभरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. गेल्या काही काळात देखील कोरोनाची आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली पाहायला मिळाली होती.

 

गेल्या सहा आठवड्यांमध्ये युरोपमध्ये कोरोना संसर्गाचे होण्याचे प्रमाण तीन पटीनं वाढलेले पाहायला मिळत आहे. 19 जुलै रोजी ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. त्या नुसार हे प्रमाण जगभरातील कोरोना संसर्गाच्या 50 टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्यादेखील दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे आता ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. परंतु यामध्ये एक दिलायादाक गोष्ट म्हणजे अतिदक्षता विभागात (ICU) भरती होणारी रुग्ण संख्या व इतर आजार असणारी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा: Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

युरोपातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेच्या चिंतेत भर पडली आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेला पुन्हा एकदा कोरोना महामारीची डोकेदुखी पुढे येणार का? हा प्रश्न सतावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज यांनी युरोपमधील पुन्हा एकदा वाढत चालेल्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. हंस क्लूज यांनी म्हटलं आहे की, कोरोना विनाशकारी घातक आजार आहे. या आजाराकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याच्या काळात सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. जर आपण गेल्या दीड महिन्यांचा विचार केला तर युरोपमधील कोरोना रुग्णांचे प्रमाण तीन पटीनं वाढले आहे.

Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

युरोपचे संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी युरोपातील नागरिकांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी कोरोना आजाराकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे ही कोरोनाची नवी लाट आली आहे. त्यामुळे नेहमी होणारे संक्रमण दीर्घकाळ कोरोनाचं कारण बनू शकते. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील WHO ने वर्तवली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान असेल. प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर यांचा वापर करावा तरच परिस्थती आटोक्यात येईल असे आवाहन तेथील लोकांना करण्यात आले आहे. वाढत चाललेला कोरोना सर्वांसाठीच धोक्याची बाब आहे.

 

ठाण्यात कोरोनाची चौथी लाट: ठाण्यात सध्या कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त हे ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा अजून काय होणार? याची चिंता वाढली आहे. ठाणे जिल्ह्यात 23 मे पासून नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 23 मे ला जिल्ह्यामध्ये 21 कोरोनाबधित रुग्ण संख्या 172 सक्रिय रुग्ण होते. परंतु हीच रुग्ण संख्या आता 198 कोरोणा बाधित आणि 992 सक्रिय रुग्ण इथपर्यंत येऊन पोहचली आहे. ही आकडेवारी नक्कीच चिंतेची बाब आहे.

 

ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग देखील खडाडून जागे झाले आहे. ठाणे महानगरपालिकेकडून लसिकरणाची मोहीम पुन्हा एकदा नव्या जोमाने हाती घेण्यात आली आहे. महानगर पालिकेकडे कोविडच्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आता नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटाइजरचा वापर करावा असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे शल्यचिकिस्तक डॉ. कैलाश पवार यांनी नागरिकांना केले आहे. ठाणेकरांसाठी ठाण्यातील सिव्हील शासकीय रुग्णालया बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.

हेही वाचा: Flipkart Big Saving Days Sale: आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल! स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्के डिस्काउंट.. 

Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स.. 

Depression: मुले आत्महत्या का करतात? धक्कादायक कारणं आली समोर, तुमच्या मुलांमध्ये तर नाहीत ना ही लक्षणे.. 

Marriage tips: लग्नाच्या पहिल्या रात्री या पाच चूका केल्यास सेक्स लाईफ सुरू होण्यापूर्वीच संपेल.. 

Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.