Depression: मुले आत्महत्या का करतात? धक्कादायक कारणं आली समोर, तुमच्या मुलांमध्ये तर नाहीत ना ‘ही’ लक्षणे..

Depression: आजचं युग हे धावतं युग म्हटलं जातं. लोकांना घड्याळाच्या काट्यांप्रमाणे पळायला लागत आहे. जो घड्याळा बरोबर चालत नाही, तो फसला. प्रत्येक गोष्टी या ठराविक वेळेतच झाल्या पाहिजेत, अशी धारणा आता होत चालली आहे. त्यात गैर आहे असेही काही नाही. अगदी उद्योगपती असेल किंवा मग नोकरदार असेल, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रात धावपळ करावीच लागते. व्यवसायात जो व्यावसायिक उत्पादन किंवा सेवा तत्परतेने देईल, त्याचा व्यवसाय मोठा होत जातो. तर नोकरीत जो वेळेत मालकाची किंवा कंपनीची कामे करून देईल, त्याची नोकरी पक्की किंवा त्याला बढती मिळते. या धावपळीत काही लोकांना खूप ताण देखील आल्याचे पाहायला मिळते. पण सगळेच ताण हे धोकादायक असतात असे नाही. त्यामुळे माणसाची प्रगती देखील होत असते.

आजकाल बऱ्याच किशोरवयीन, तरूण मुलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी किरकोळ कारणावरून आत्महत्या केलेलं आपण पाहिले असेल. आजकाल मुलं आई ओरडते, बाबा ओरडतात ह्या साध्या साध्या गोष्टींवरून देखील आत्महत्या करताना पाहायला मिळतात. फेसबुकला लाईक मिळत नाहीत, घरचे गेम खेळू देत नाहीत, म्हणूनही आत्महत्या करताना पाहायला मिळतात. तरूण मुले प्रेमभंग झाला म्हणून, आत्महत्या केलेली आढळतात. बरेच तरुण एखाद्या मुलीने नकार दिला म्हणून आत्महत्येच्या आहारी जातात. काही लोक झटपट यश मिळवण्याचा नादात भलतच काही करून जातात आणि आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलतात.

बऱ्याच तरूण मुलींनी संसार करत असताना पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पाहायला मिळतात. खर बघायला गेले तर, हे काही नवीन नाही. आयुष्यात प्रत्येकालाच चांगला जोडीदार मिळतो, असे देखील नाही. काहींना खूप समजूतदार पती किंवा पत्नी जोडीदार म्हणून मिळत असते. जर तुम्ही वास्तवात जाऊन विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, प्रत्येक कुटुंबात काही ना काही अडचणी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. ते लोक त्या गोष्टींना निर्भयपणे सामोरे जात असतात. मग तुम्हाला काय अडचण आहे?

जर तुमच्या संसारात काही अडचणी असतील, तर तुम्हाला ते नाजूकपणे सोडवाव्याच लागतील. जर तुम्ही एक स्त्री असाल, तुम्हाला पतीकडून त्रास होत असेल, तर लगेच तुमच्या आईवडिलांना सांगण्या अगोदर तुमच्या सासू सासऱ्यांशी बोला. तुमची नणंद असेल तर तिची मदत घ्या. यातून काही मार्ग निघत नसेल, तर मग तुमच्या माहेरच्या लोकांशी बोलू शकता. परंतु यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतीच्या नात्यात अजूनच तणाव वाढेल असे काही करू नका.

बऱ्याचदा स्त्रिया देखील नवऱ्याची पिळवणूक केलेली पाहायला मिळते. मोसीन नावाचे गृहस्थ सांगतात, त्यांची पत्नी सुशिक्षित आहे. मोसीन यांचे देखील चांगले शिक्षण झालेले आहे. दोघेही अगोदर नोकरी करत होते. एकाच ठिकाणी नोकरी करत असताना, त्यांच्या बॉसच्या माध्यमातून त्यांचे लग्न झाले. सुरुवातीच्या काळात सगळं काही व्यवस्थित चालत होते. परंतु मुले झाली आणि मग सासरवाडीच्या लोकांनी संसारात लक्ष घालून त्रास द्यायला चालू केले. कालांतराने मोसीन यांची नोकरी गेली. ते सध्या व्यवसाय करतात.

सध्या त्यांची पत्नी चांगल्या पदावर असून चांगला आहे पगारही आहे. मोसीन (नाव बदलले आहे) यांचा व्यवसाय त्या मानाने फारसा काही चालत नाही. परंतु त्यांना विश्वास आहे, एक दिवस यात यश येईल. परंतु त्यांची पत्नी त्यांना सध्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप त्रास देत असते. त्यांची मुले सध्या शिकत आहेत. मुलांच्या मानसिकतेवर काही परिणाम होऊ नये, म्हणून मी त्यावर जास्त लक्ष देत नाही. परंतु मी सतत तणावात असतो. माझे मन दुःखी असते. मला कधी-कधी आत्महत्या करावीशी वाटते, असे ते म्हणतायत, मग आम्ही त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १५ ते २४ वयोगटातील तरूण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली स्पर्धा, तणावपूर्ण जीवनशैली, सोशल मीडिया (Social Media), पालकांमधील आणि मुलांच्यातील अपुरा संवाद, संयम नसणे, हट्टीपणा यामुळे बरेच तरूण आत्महत्या करताना पाहायला मिळतात. मुलांची मानसिकता व्यवस्थित नसेल, तर हे त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित करणं गरजेचे आहे.

सोशल मीडियाचा वापर: आजकाल तरुण आणि तरुणी तासंतास सोशल मीडियावर वेळ वाया घालवत असतात. ज्याला अजून मिशी फुटली नाही, ते खेळाच्या उड्या मारायच्या वयात मोबाईल नावाचं खेळणं घेऊन तासंतास वेळ वाया घालवत आहे. कोरोणा काळात बऱ्याच मुलांच्या पालकांनी पाल्यांना नवीन मोबाईल घेऊन दिले. ते त्याचा कसा वापर करत आहेत, हे देखील तुम्ही जवळून पाहणं गरजचे आहे. आपल्या पाल्यांना यातून बाहेर काढा.

शिक्षणातील अपयश: बऱ्याचदा मार्क्स कमी मिळाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, या कारणांनी बऱ्याच मुलांनी आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, त्या ठिकाणी दोन शक्यता असणार आहेत. यश आणि अपयश या दोन्हीं एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे एकदा अपयश आले, म्हणून तुम्ही संपून जाणार नाही. पुन्हा नव्याने सुरुवात करा. पालक म्हणून तुम्ही त्यांना आधार द्या.

पालक आणि मुलांमधील संवाद: बऱ्याचदा शहरात रहात असलेल्या कुटुंबात पालक आणि मुलांच्यात संवादाची मोठा अभाव पाहायला मिळतो. बऱ्याचदा आई आणि वडील दोघेही नोकरी करत असतील, तर मग बोलायलाच नको. दोघेही नोकरी करत असल्याने सतत ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. मग मुल एकटी पडतात. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, अलीकडच्या काळात तुमचा आणि तुमच्या पाल्याचा संवाद होणे खूप गरजेचे झाले आहे. मुलांना चांगली चांगली पुस्तकं आणून द्या. त्यांना पुस्तक वाचायला भाग पाडा. त्यांचे मित्रपरिवार कसा आहे, याची चौकशी करा.

प्रेमभंग: बऱ्याचवेळा मुलीने नकार दिला म्हणून देखील बऱ्याच तरुणांनी आत्महत्या केली आहे. बऱ्याचदा काही तरूण-तरूणी एकमेकाच्या प्रेमात पडतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम केल्यानंतर, काही कारणांमुळे त्यांना वेगळं होण्याची वेळ येते. याशिवाय प्रेमभंग झाला तरी देखील तरूण किंवा तरुणी डिप्रेशनमध्ये जातात. आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशावेळी थोडा संयम बाळगा. लगेच कुठलेही टोकाचे पाऊल उचलून चुकीचं काही करू नका. काही गोष्टी विसरून देखील जावं लागतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सर्वांना मिळाली असती, तर मग जगण्यात तरी मजा आली असती का? त्यामुळे जेव्हा जेव्हा अपयश येईल, तेव्हा-तेव्हा नकारात्मक न होता, नव्या जोमाने कामाला लागा.

आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या कुटुंबियांचा विचार करणं आवश्यक आहे. तुमच्या आई वडिलांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, याचा विचार करा. तळहाताच्या फोडासारखं जपत तुम्हाला आईवडिलांना लहानाचं मोठं केलेलं असतं. तुम्ही यांचा विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही विवाहित असाल, तर प्रौढ तुमच्या पत्नीचा, मुलांचा विचार करा. तुमची मनसिकता खूपच बिघडली असेल, तर एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन सल्ला घ्या. जर तुमचा मित्र अशा काही परिस्थितीला तोंड देत असेल, तर त्याला देखील तुम्ही समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला योग्य तो सल्ला द्या. गरज असेल, तर त्याच्या घरी कळवा, जेणेकरून त्याला त्या मानसिक परिस्थितीतून बाहेर काढणे शक्य होईल.

हे देखील वाचा Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Whatsapp Unblock: WhatsApp ने आणले नवीन फिचर्स! ब्लॉक केल्यानंतरही आता करता येणार मेसेज; जाणून घ्या प्रोसेस

Married Life Problem: हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.