Eknath Shinde:अखेर उद्धव ठाकरेंनी मानली हार; महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे पर्वाची सुरुवात..

0

Eknath Shinde: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर, आपल्या समर्थक आमदारांना बरोबर बंड पुकारलं, आणि रातोरात सुरत गाठले. याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदारांना घेऊन गेल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याशी आमची चर्चा सुरू असून, ते लवकरच शिवसेनेत परततील, असं बोललं गेलं होतं. मात्र आता शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांकडून अधिक पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत असून, आता शिवसेनेने देखील एकनाथ शिंदे यांच्यापुढे हार पत्करली असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेला खिंडार पाडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 35 ते 40 आमदार फोडल्याचे बोलले जात आहे स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील आमच्याकडे 45 आमदारांचा पाठबळ असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. याबरोबरच एकनाथ शिंदे आम्ही भाजपमध्ये जाणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेतच राहणार असून, खरी शिवसेना ही माझ्याकडे असल्याचं म्हणत, एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. पहाटे सुरत मधून एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटी या ठिकाणी हलवण्यात देखील आलं आहे.

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार गुवाहाटीमध्ये पोहचल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आमच्याकडे 45 आमदारांचा पाठबळ असल्याचं म्हटलं. या बरोबरच आणखीन काही आमदार आमच्या सोबत येत असल्याचे देखील म्हटल्याने, पुन्हा एकदा खळबळ उडाली. यानंतर काही वेळाने यामिनी जाधव या देखील गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या अधिक आमदारांचे पाठबळ मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर, शिवसेनेने देखील आता हार मानल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल, हरकत नाही, सत्ता परत मिळेल. मात्र पक्षाची प्रतिष्ठान सर्वात महत्वाची आहे. असं मोठं विधान केले. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल करून देखील, एक धक्कादायक ट्विट केल्याने, याला अधिक बळ मिळाले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करताना म्हटले आहे, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने” संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विधानावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या पुढे आता हार मानल्याचे पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या किती आमदारांचे पाठबळ आहे अद्याप अधिकृतरित्या समजू शकलेलं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे जर शिवसेनेमधील 37 आमदारांचा पाठबळ असेल, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. आणि एकनाथ शिंदे यांच्या 37 आमदारांना स्वतंत्र गट म्हणून, मान्यता मिळेल. हा गट देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकणार आहे. यामाध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आला असून, जर असं झालं तर शिवसेना सध्याच्या घडीला तरी खिळखिळी झाल्याचे पाहायला मिळेल.

हे देखील वाचाLifestyle: या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता या सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

Married Life Problem: हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.