Love birds: फोटो पाहून प्रेमात तर पडला असालच, पण कहाणी वाचून आयुष्य म्हणजे काय हेही समजेल..

0

Love birds: प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम कधीही कोणावरही केव्हाही होऊ शकतं. प्रेम झाल्यानंतर जग खूप सुंदर वाटू लागतं. पण कधीकधी इतरांचं प्रेम पाहून आपणही प्रेमाच्या प्रेमात पडतो. सोशल मीडियावर याच संदर्भातला एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो इतका सुंदर आहे, की हा फोटो पाहिल्या-पाहिल्याच अनेकजण या फोटोच्या प्रेमात पडलेत. दिल्लीमध्ये एक जोडपे एका बाकावर बसून चहा पीत असल्याचा हा फोटो आहे. हा फोटो जितका सुंदर आहे, त्याच्याहून अधिक सुंदर या दोघांची प्रेम कहाणी आहे. या दोघांची प्रेम कहाणी वाचल्यानंतर प्रेमावरून विश्वास उडलेल्या अनेकांना नव्याने प्रेम होण्याची जास्त शक्यता आहे.

@thedelhiwalla या नावाच्या इंस्टाग्राम अकांऊट वरून मयंक ऑस्टेन सुफीनीं या दोघांची सुंदर कहानी शेअर केली आहे. दिल्लीमधील एका बाकावर बसलेल्या तरुणाचे नाव अफझल आहे. तर त्याच्यासोबत त्याची पत्नी सबिना आहे. दोघेही या बाकावर बसून एकाच ग्लासमध्ये चहा पीत आहेत. दोघांचीही कपडे खूप साधी असल्याचे पाहायला मिळत आहेत. दोघांचा चेहरा पाहिला, तर या जगात या दोघांपेक्षा सुंदर आणि सुखी कोणीही नसल्याचा भास होतो. दोघांच्या या फोटोकडे पाहिल्यानंतर पाहताक्षणी कोणीही प्रेमात पडू शकतं.

एकाच कपात पीत आहेत चहा

मयंकने या दोघांची कहाणी त्याच्या पोस्ट मधून सादर केली आहे. यात त्याने लिहिलं आहे, अफझल म्हणतो, एकाच कपात चहा प्यायला आम्हाला आवडतं. चहा पीत असताना येणारी फिलींग मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अफझलची पत्नी सबिना म्हणते, आम्हा दोघांनाही एकाच कपात चहा पिला नाही तर चहा पिल्यासारखं वाटत नाही. फक्त चहाच नाही तर, आम्ही दोघे जेवणही एकाच ताटात करतो. एकवीस वर्षाच्या अफझल आणि एकोणीस वर्षाच्या सबीना दोघांचे एका वर्षापूर्वी लग्न झाले असून, दोघांनीही प्रेम विवाह केला आहे. या प्रेम विवाहाला दोन्हीं घरच्यांचा विरोध होता.

कसं झालं प्रेम

21 वर्षीय अफझल तीनशे रुपये रोजंदारीप्रमाणे मजुरी करतो. लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत असल्याने एकमेकांकडे नेहमी पाहत असायचे. एकमेकांना दररोज पाहत असल्याने, हळू-हळू एकमेकांच्या अनेक गोष्टी आवडू लागल्या. अफझलला तिची ड्रेसिंग स्टाइल आवडत होती, तर तिला अफझलची हेअर स्टाईल फार आवडायची. हेअर स्टाईल बरोबरच त्याची बोलण्याची पद्धत मला खूप आवडते. असे देखील सबीना म्हणते. अफजल सबिना विषयी बोलताना म्हणतो, तिच्याविषयी मी कुठून सुरुवात करू हेच मला कळत नाही. तिचा स्वभाव खूप चांगला आहे.

अशी सुरू झाली आयुष्याची सुरुवात

लहानपणापासूनच दोघेही एकमेकांना ओळखत असल्याने, तसेच दोघेही घराजवळ असल्याने घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. मात्र घरच्यांचा विरोध झुगारून आम्ही लग्न केले. आमच्या घरच्यांच्या घराजवळच एक घर आम्ही भाड्याने घेतले. अफझल काम उरकून रोज संध्याकाळी घरी येतो. आणि स्वयंपाकात मला मदत करतो. माझे आयुष्य सुखात आणि आनंदात जाण्यासाठी दिवसभर कष्ट करून संध्याकाळी मलाही मदत करतो. आमच्या दोघांमध्ये कधीकधी भांडणही होतं, मात्र आम्ही लगेच सर्व विसरून जातो. लग्नानंतर तो अधिक जबाबदार झाला असून, त्याला आणखी मेहनत करून जास्त पैसे कमवायचे आहेत.

दोघांनीही या पद्धतीने केले लग्न

सबिना आणि अफझल या दोघांनी एका बागेमध्ये लग्न केलं लग्नासाठी नातेवाईक देखील उपस्थित होते. या दोघांचे लग्न काझी यांनी लावले. लग्नात आलेल्या नातेवाईकांसाठी, मित्र कंपनीसाठी रसगुल्ला तसेच तसेच पेप्सी देण्यात आली होती. दोघांच्याही या सुंदर कहाणीवर अनेकांनी सुंदर अशा कॉमेंट्स देखील केल्या आहेत. अनेक जण या कहाणीच्या प्रेमात पडले आहेत. तर अनेकांनी हा फोटो पाहूनच हे दोघे आयुष्यात किती सुखी असतील, याचा अंदाज येतो. पैसा हे सुखाचे कारण होऊ शकत नाही, पैसा फक्त गरज भागवू शकतो. आयुष्य म्हणजे काय असा कोणाला प्रश्न पडला, तर या दोघांकडे पहा अनेक प्रश्नांची उत्तर मिळून जातील. अशा अनेक सुंदर कमेंट यूजर्सकडून केल्या गेल्या आहेत.

हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Sarkari Yojana: या शेतकऱ्यांना आता दरमहा मिळणार तीन हजार; मायबाप सरकारचा मोठा निर्णय! असा करा अर्ज..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Home Remedies: हाघरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.