Home Remedies: ‘हा’ घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी ‘चामखीळ’ पडेल गळून..

0

Home Remedies: माणसाला नेहमी आपले शरीर आणि सौंदर्य तंदुरुस्त असावं, असं वाटत असतं. आपले शरीर तंदुरुस्त राहवं, आणि सौंदर्य खुलावं यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. मात्र अनेकांच्या शरीरावर ‘चामखीळ’ अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. चामखीळ (Warts) उद्भवण्याची अनेक कारणे आहेत. मात्र त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे, अलीकडच्या काळात आपण अधिक जास्त तेलकट खातो. शिवाय तेल देखील उत्तम दर्जाचे नसल्याने, चामखीळ आपल्या मानेवर, हातावर, चेहऱ्यावर देखील येत असते. आज आपण या लेखात घरगुती पद्धत वापरून, ‘चामखीळ’ मुळासकट कशी नष्ट करायची? हे पाहणार आहोत.(Home Remedies To Get Rid Of Warts)

जर तुमच्या शरीरावर अनेक चामखीळा असतील, आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आम्ही या लेखातून घरगुती उपाय वापरून शरीरावर असणाऱ्या चामखीळा मुळासकट कशा नष्ट करायच्या? या संदर्भात माहिती देत आहोत. आपल्या शरीरावर, चेहऱ्यावर चामखीळ असल्याने, अनेकदा आपला कॉन्फिडन्स डाऊन होत असतो. शिवाय अनेकजण यांचा न्यूनगंड देखील बाळगत असतात. मात्र आता तुम्हाला याची कसलीही चिंता करण्याची गरज नाही. घरगुती उपाय वापरून आता तुम्ही चामखीळ मुळासकट नष्ट करू शकता. (Home Remedies To Get Rid Of Warts)

तसं पाहायला गेलं, तर चामखीळ शरीरावर येणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र आपल्या शरीरावर जर चाळीस-पन्नास चामखीळा असतील, तर मात्र आपल्याला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अनेक जण चामखीळ दूर करण्यासाठी अनेक उपाय योजना देखील करतात. मात्र अनेकांना त्यात यश येत नाही. शिवाय त्याचे साईड इफेक्ट देखील पाहायला मिळतात. मात्र आम्ही तुम्हाला घरगुती असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी अजिबात हा नि का र क नाहीत. तसेच या घरगुती उपायाने तुम्हाला अजिबात त्रास देखील जाणवणार नाही.

आल्याचा रस काढून..

शरीरावरील ‘चामखीळ’ घालवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे. छोटासा टुकडा घेतल्यानंतर, तुम्हाला तो तुकडा मिक्सरवर बारीक करून त्याची पेस्ट करून पाणी टाकून त्याचा रस एका वाटीमध्ये काढायचा आहे. आल्याचा रस काढल्यानंतर, ज्या वाटीत आल्याचा रस आहे, त्या वाटीत तुम्हाला एक लिंबू पिळायचं आहे. आता वाटीमध्ये लिंबू पिळून झाल्यानंतर, त्या वाटीत तुम्हाला थोडसं कोलगेट टाकावं लागणार आहे.

आता तुम्हाला लिंबाचा, आल्याचा, आणि कोलगेटचे मिश्रण एका वाटीमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कुठल्याही इतर कंपनीची टूथपेस्ट वापरायची नाही, तुम्ही फक्त आणि फक्त कोलगेट कंपनीचीच टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे. मग ती कोलगेट लाल किंवा पांढऱ्या कुठल्याही रंगाची असली तरी हरकत नाही. आता तुम्हाला या मिश्रणामध्ये एक चमचा घरगुती खाण्याचा सोडा टाकायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित करून घेतल्यानंतर, तुमचं काम पूर्ण झालं आहे. आता तुमच्या शरीरावरील चामखीळ नष्ट करण्यासाठी तुम्ही तयार केलेली पेस्ट चामखिळीवर लावून, ही पेस्ट तुम्ही चिकटटेपच्या सहाय्याने आवळून बांधू शकता. ही पेस्ट तुम्हाला रात्रभर ठेवायची आहे.

जर तुम्हाला नवीन चामखीळ आली असेल, तर एका रात्रीत पडून जाईल. मात्र जर तुमची चामखीळ जुनी असेल, तर तुम्हाला हा प्रयोग साधारण एक आठवडा करायचा आहे. एका आठवड्यानंतर, तुमच्या शरीरावरील चामखीळ नष्ट होत चाललेली तुम्हाला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, हा प्रयोग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. या व्यतिरिक्त आणखी काही घरगुती उपाय करून शरीरावरील चामखीळ आपण मुळासकट नष्ट करू शकतो.

सफरचंदाच्या मदतीने घालवता येईल चामखीळ

जर तुम्ही सफरचंदाचे ‘व्हिनेगर’ चामखिळीला लावले तरी देखील तुमच्या शरीरावरील चामखीळ मुळासकट नष्ट होऊ शकते. सफरचंदाचा व्हिनेगर तुम्हाला दिवसातून चार वेळा लावावा लागणार आहे. हा प्रयोग तुम्हाला दोन आठवडे करावा लागणार आहे. त्यानंतर हळूहळू तुमच्या शरीरावरील चामखीळ नष्ट होत चाललेली तुम्हाला पाहायला मिळेल. हा प्रयोग नियमित केल्याने हळूहळू चामखीळ नष्ट होईल. कधी-कधी या ठिकाणी जळजळ देखील होऊ शकते. तुम्ही याठिकाणी कोरफडीचे जेल लावू लावा. म्हणजे जळजळ थांबेल.

लसूण लावूनही चामखीळ नष्ट करता येते

जसे की तुम्हाला माहिती आहे, लसणाचे खूप फायदे आहेत. लसणामुळे शरीरावरील चामखीळ देखील नष्ट होऊ शकते, हे माहिती होतं का? शरीरावरील चामखीळ नष्ट करण्यासाठी तुम्हाला लसणाची पेस्ट बनवावी लागेल. बनवलेली पेस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी चामखीळ आहे, त्या ठिकाणी नियमित काही दिवस लावावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या शरीरावर असणारी चामखीळ हळूहळू नष्ट होत जाईल.

लिंबाचा आणि बटाट्याचा रस

जर तुम्ही तुमच्या शरीरावर असणार्‍या चामखिळीवर लिंबाचा आणि बटाट्याचा रस लावला, तर काही दिवसानंतर तुमच्या शरीरावर असणारी चामखीळ हळूहळू नष्ट होताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला हा प्रयोग नियमित काही दिवस करावा लागणार आहे.

(सूचना : या लेखात तुम्ही वाचलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असल्याने महाराष्ट्र लोकशाही याची हमी देत नाही)

हे देखील वाचा Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर.. 

SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

Pradhan Mantri Ujjwala Yojana: या योजनेअंतर्गत मिळतोय मोफत गॅस सिलिंडर;असा करा अर्ज आणि घ्या योजनेचा लाभ..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.