Chandramukhi: बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संबंधांची आज नव्याने चर्चा का होतेय? तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण..
Chandramukhi: ‘प्रसाद ओक’ (Prasad oak) दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या चित्रपटाची कथा ही एका राजकारणी आणि लावणी सम्राज्ञी भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची मुख्य भूमिका आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर यांनी साकारली आहे. आदिनाथ कोठारे यांना एक मुरब्बी राजकारणी तर अमृता खानविलकर (amruta khanvilkar) यांना लावणीसम्राज्ञी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असली तरी, या कथेचा संबंध दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि नृत्यांगना ‘बरखा पाटील’ (Barkha patil) यांच्याशी जोडला जात आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, गोपीनाथ मुंडे आणि बरखा पाटील हे काय प्रकरण आहे? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत..
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे हे नाव खूप मोठं आहे. एका गरीब कुटुंबात जन्म ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचा गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास अफलातून आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात ‘नाथरा’ या गावात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. पुढे राजकारणात अफलातून कामगिरी करत, ‘गोपीनाथ मुंडे’ हे नाव त्यांनी देशाला माहिती करून दिलं.
गोष्ट १९९५ सालची आहे. त्यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार अस्तित्वात होतं. शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, तर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार पहिल्यांदाच आलं असल्याने, राजकारणाची मोठी लाट सुरू होती. निवडणुकीअगोदर राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत होती. सहाजिकच गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांच्यावर टीका करताना गोपीनाथ मुंडे यांनी वैयक्तिक हल्ले देखील केले.
त्याचाच राग मनात धरून शरद पवार यांनी अण्णा हजारे यांना गोपीनाथ मुंडे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास भाग पाडले, असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रातील सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी काही कागदपत्रे सादर करत गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यातीलच एक प्रकरण ‘बरखा पाटील आणि गोपीनाथ मुंडे’ यांच्या संदर्भातलं होतं. लावणी नृत्यांगना बरखा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने मुंबईत फ्लॅट असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे नृत्यांगना बरखा यांना प्रतिक नावाचा एक मुलगा होता, त्याच्या नावापुढे देखील गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावलं जात होतं. गोपीनाथ मुंडे ‘बरखा फ्लॅट’वर दिवसभर विश्रांतीसाठी जात असल्याचं देखील सांगण्यात आलं.
गोपीनाथ मुंडे आणि बरखा हे प्रकरण सार्वजनिक होण्यापाठीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं देखील त्यावेळी बोलण्यात आलं. गोपीनाथ मुंडे यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर राजकारणात एकच वादळ निर्माण झालं. गोपीनाथ मुंडे यांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं. एवढंच नाही तर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने देखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. हे प्रकरण भोवणार हे लक्षात घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी नंतर, बाळासाहेब ठाकरे यांचा आसरा घेतला.
काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे?
हे प्रकरण आपल्याला अधिक अडचणीत आणणार असं दिसल्याने, गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आसरा घेतला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील घाईघाईने शिवाजी पार्कवर एक मोठा मेळावा आयोजित केला. सहाजिकच या मेळाव्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आलं. या मेळाव्यात भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांनी बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नात्यावर मनमोकळी चर्चा केली. भर सभेत बोलताना बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहात म्हणाले “प्यार किया तो डरना क्या” बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील वृत्तपत्रांमध्ये बरखा हे प्रकरण छापून आलं.
गोपीनाथ मुंडे आणि बरखा या प्रकरणा संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा दिल्याने हे प्रकरण निवळायला सुरुवात झाली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने बरखा यांचा फ्लॅट आहे, हे बाहेर कसं आलं? तर याचीदेखील एक रंजक स्टोरी आहे. आपण याविषयी देखील जाणून घेऊया..
असा उघडकीस आला प्लॅट
जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहत, “प्यार किया तो डरना क्या” असं म्हटलं, आणि हे प्रकरण थंडावलं. मात्र प्रश्न हा उपस्थित झाला, हे प्रकरण बाहेर कसं आलं? मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने बरखा यांचा फ्लॅट आहे, ते बाहेर येण्याचं कारण म्हणजे, त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात महानगरपालिकेच्या हद्दीत कोणाच्या नावावर किती आणि कोणकोणते फ्लॅट आहे, यासंदर्भातला सर्वे होता. हा सर्वे करताना कर्मचाऱ्यांसोबत एक पत्रकार देखील असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्वे सुरू असताना, एका फ्लॅटच्या बाहेर दरवाज्यावर बरखा मुंडे नावाने फलक लावण्यात आल्याचं निदर्शनास आले. वॉचमनला या संदर्भात विचारले असता, हा फ्लॅट गोपीनाथ मुंडे यांचा असून, साहेब याठिकाणी रोज फ्लॅटवर विश्रांतीसाठी येत असल्याचं सांगण्यात आलं. आणि तेव्हापासून बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांचं प्रकरण संपूर्ण देशाला पाहायला मिळालं.
बरखा पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांची ओळख कशी झाली?
त्याकाळी बरखा पाटील हे नाव महाराष्ट्रात लोकनृत्य नर्तकांमध्ये प्रसिद्ध नाव होते. बरखा मूळच्या मराठवाडयाच्या होत्या. मात्र पुण्यात त्या एका गावात स्थायिक झाल्या होत्या. बरखाला एक मुलगाही होता. एका कार्यक्रमसंदर्भात गोपीनाथ मुंडे यांची ‘नृत्यांगना बरखा’ यांनी भेट घेतली. या दोघांची भेट झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी बरखाला मुंबईच्या आलिशान परिसरात फ्लॅट विकत घेऊन, दिला असल्याचं सांगण्यात येतं.
असं निवळलं प्रकरण
बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत गोपीनाथ मुंडे यांना “प्यार किया तो डरना क्या” असं म्हटल्याने हे प्रकरण निवळायला लागलं होतं. मात्र यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी आपले मित्र आणि ज्येष्ठ संपादक ‘सुरेश द्वादशीवार’ यांना यासंदर्भात सांगितले. आमच्या खेडेगावात लग्नामध्ये नृत्यांगनांची गाणी वगैरे होत असतात. त्यात विशेष असं काही नाही. तुमच्याकडचे असले नियम आम्हाला नका लावू . अशी विनवणी त्यांनी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांना केली.
ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. गरीब कुटुंबातून बहुजन समाजातूनवर आलेल्या होतकरू माणसाचे कशाला खच्चीकरण करताय, असं म्हटलं. पुढे गोपीनाथ मुंडे आणि अण्णा हजारे यांची भेट झाल्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आलं.
संदर्भ-दैनिक भास्कर, सकाळ
हे देखील वाचा: KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..
Smam Scheme: स्माम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे घेण्यासाठी मिळतेय तब्बल 80 टक्के अनुदान; असा घ्या लाभ..
Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम