Lifestyle: माझं तुझ्यावर प्रेम राहिलं नाही म्हणत माणूस एकमेकांचा तिरस्कार केव्हा करू लागतो? वाचा सविस्तर..

0

Lifestyle: कोणतंही नातं चिरकाळ टिकवायचा असेल तर  नात्यात प्रेम असणं फार गरजेचं आहे. खासकरून पती-पत्नीचं नातं पुढे न्यायचं असेल तर प्रेमा शिवाय पर्याय नाही. जिथे जास्त प्रेम असतं तिथं जोडपं एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ एकत्र घालवत असतात. ज्या ठिकाणी प्रेम नाही तिथे मात्र आपण एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करतो.

आणि हेच कारण पुढे दोघे वेगळे होण्यास पुरेसं असतं. त्यामुळे अनेक जण सांगतात प्रेम करणं अवघड नाही, पण ते चिरकाळ टिकून ठेवणं खूप फार कठीण आहे. आपण बऱ्याचदा पाहतो, सुरुवातीचा काळ हा खूप आनंदाचा असतो. मात्र हाच आनंद कायम राहत नाही. यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार असता. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

नात्यात हळूहळू कडवाहट का निर्माण होते? याची काही कारणे आहेत, आपण आज याच महत्त्वाच्या तीन कारणांविषयी जाणून घेणार आहोत. सुरूवातीला कमालीचा आनंद असणाऱ्या नात्यात हळूहळू कडूपणा का येत जातो, आणि अखेर आपण माझं तुझ्यावर प्रेम नाही इथपर्यंत येऊन पोहोचतो. मात्र हे होण्यास काही कारणे आहेत, आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

एकमेकांना टाळण्यापासून होते सुरुवात

ज्यावेळेस तुमचा साथीदार तुमच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो, त्यावेळेस समजून जा कुठेतरी गडबड आहे. तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे  तो बाहेर कोणाकडे तरी आकर्षित होत आहेत. किंवा आता तुमच्यात त्याला आनंद मिळत नाही. आणि म्हणून यासाठी तो विविध कारणे तुम्हाला सांगत असतो. जसं की, मित्रांमध्ये कुठेतरी बाहेर असल्याचं कारण देईल, ऑफिसचं काहीतरी काम असल्याचं सांगेल. अनेक कारणे सांगून तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न होत असेल, तर तुमच्यावरचं त्याचं प्रेम कमी तर झालं आहेच, पण बाहेर तो कोणाकडे तरी आकर्षित देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भांडताना एकमेकांना कडवट शब्दाचा वापर

तुमच्याकडे सतत दुर्लक्ष केल्याने कधीकधी तुम्हाला देखील त्याचा खूप मोठा त्रास होतो. आणि यादरम्यान जोडीदाराशी भांडण देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, तुमच्या दोघांचे भांडण होताना तुम्ही दोघेही एकमेकांना कडवट शब्दांचा वापर करत असाल, तर समजून जा तुमच्या दोघांमध्ये खूप मतभेद आहेत. भांडताना तुम्ही एकमेकांची बदनामी किंवा कुटुंबाला देखील वाईट बोलत असाल, तर तुमचं नातं शेवटच्या टप्प्यावर देखील येऊ शकतं. भांडणात तुमच्या जोडीदाराची बदनामी केल्याने, किंवा एकमेकांच्या कुटुंबाला वाईट बोलल्याने, आणखीनच कटुता निर्माण होऊ शकते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणं फार आवश्यक आहे.

भांडण सुरू असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. एकदा तोंडून गेलेले शब्द पुन्हा कधीही माघारी येत नाहीत. त्यामुळे बोलताना तुम्ही फार काळजीपूर्वक बोलणं गरजेचे आहे. भांडण सुरू असताना नेहमी शांत असणे केव्हाही उचित ठरेल. तुम्ही अधिक बोलण्याने तुमच्या जोडीदाराच्या मनातून आणखीन उतरत असता. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

एकमेकांसोबत घालवलेले सर्वोत्तम क्षण विसरता

कोणतही नातं टिकवायचं असेल तर, तुम्हाला एकत्र घालवले सर्वोत्तम लक्ष कदापिही विसरून चालणार नाहीत. अनेकांना असं वाटतं आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो, हे पुरेस आहे. मात्र जर तुम्ही एकमेकांना टाईम देत नसाल, किंवा दुसऱ्या कामात व्यस्त राहत असाल, तर प्रत्येक वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईरच असं नाही. प्रत्येक वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. काही झालं तरी तुम्हाला टाईम हा द्यावाच लागणार. तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहीत धरू शकत नाही.

कुठलंही नातं टिकवायचं असेल तर नात्यांमध्ये सर्वोत्कृष्ट क्षण आठवणं, प्रत्येक नात्यामध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही एकमेकांसोबत घालवलेले क्षण आठवत नसाल, किंवा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम्स स्पेंड करत नसाल, तर तुमच्या दोघांमध्ये तणाव वाढण्याची दाट शक्यता असते. या तनावाचे रूपांतर भांडणात देखील होऊ शकते. आणि मग माझं तुझ्यावर प्रेम नाही, असं सांगणारा एक दिवस देखील उजाडू शकतो. म्हणून अनेक वेळा तुमच्या जोडीदारासोबत सर्वोत्तम क्षणांचा आनंद घेत राहा,  तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करत आहात, हे त्याला अनुभवायला देखील लावा. यामुळे तुमच्या नात्यात नेहमी गोडवा राहील.

हे देखील वाचा Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला से क्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

lifestyle: दुधात हा पदार्थ मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात येईल जोश आणि बरंच काही; जाणून घ्या अधिक..

इतर पुरुषासोबत से क्स करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ही धक्कादायक अट..

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.