Maharashtra Kesari 2022: २० वर्षाच्या आर्मी मॅनने ३५ वर्षाच्या विशालचा कसा केला पराभव? विजयानंतर काय म्हणाला पृथ्वीराज पाटील..

0

Maharashtra Kesari 2022: महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटीलने (pruthviraj Patil) विशाल बनकरचा (Vishal bankar) अटीतटीच्या लढतीत ५-४ असा पराभव करत यंदाच्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. अवघ्या वीस वर्षाच्या पृथ्वीराज पाटीलने ३५ वर्षाच्या विशाल बनकरवर विजय मिळवल्याने, पृथ्वीराज पाटीलचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सेमीफायनलच्या सामन्यात पुण्याच्या हर्षद कोकाटेवर पृथ्वीराज पाटील एकहाती विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश होता. तर दुसरीकडे विशाल बनकरने रोमहर्षक लढतीत वाशिमच्या सिकंदर शेखवर विजय मिळवत अंतीम फेरी गाठली होती.

यंदाच्या महाराष्ट्र केसरीची गदा कोण फटकावणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनुसार, सातारा जिल्हा तालीम संघाकडून आयोजित केलेल्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन सातारा जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आलं होतं. पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत चार गुणांनी पिछाडीवर असणाऱ्या पृथ्वीराज पाटीलने शेवटच्या क्षणी आपले डावपेच टाकत, विशाल बनकरचा ५-४ असा पराभव केला.

विजयानंतर काय म्हणाला पृथ्वीराज पाटील

लहानपणापासूनच पैलवानकीचे धडे, डावपेच घरातूनच मिळाल्यामुळे, कुस्ती खेळताना आत्मविश्वासाची कमी कधीच जाणवली नाही. काही झालं तरी महाराष्ट्र केसरीची गदा ही जिंकायचीच हा माझा पण होता. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, महाराष्ट्र केसरीची गदा मिळणारच असा गाढ विश्वास होता. कुस्ती फक्त ताकदीवर नाही, तर टेक्निकवर जिंकली जाते, असं मला माझ्या प्रशिक्षकांनी अनेकवेळा सांगितले होते. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खेळाचा अंदाज घेऊन अंतिम क्षणात आपल्या रणनिती नुसार डावपेच टाकायचे, हे मी कुस्ती सुरू होण्यापूर्वीच ठरवलं होतं. कुस्ती सुरू होण्यापूर्वी मी ज्या पद्धतीने ठरवलं होतं, कुस्ती त्याच पद्धतीने होत गेली.

प्रतिस्पर्धी खेळाडूने सुरुवातीला चार गुणांची आघाडी घेतला, तरीदेखील माझ्या मनात किंचितही भीती निर्माण झाली नाही. कारण मला माझ्या खेळावर पूर्ण विश्वास होता. आणि याच्याच जोरावर ४-० ने पिछाडीवर असतानाही मी अखेरच्या टप्प्यात ५-४ ने विजय मिळवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज पाटील म्हणाला, आता माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपकडे लक्ष असणार आहे. पृथ्वीराज पाटील कोल्हापूरकरांचं आभार मानताना म्हणाला, मी तुमचं स्वप्न साकार केलं आहे. मी गदा घेऊन लवकरच कोल्हापुरात येतोय. तर दुसरीकडे पृथ्वीराजचे कोच म्हणाले, पृथ्वीराजने अंतिम सामन्यात देखील त्याचा नैसर्गिक खेळ केला. कोल्हापूरकरांची महाराष्ट्र केसरी होण्याची तब्बल 21 वर्षाची प्रतीक्षा त्याने संपवली यांचा अभिमान आहे.

पृथ्वीराज पाटीलचा परिचय

पृथ्वीराज पाटील, हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा आहे. पृथ्वीराज पाटीलने बारावीपर्यंत आपले शालेय शिक्षण संजीवनीदेवी गायकवाड विद्यालयातून घेतले. घरातूनच पैलवानकीचा वारसा मिळालेल्या पृथ्वीराजने मोतीबाग तालमीमधून कुस्तीला सुरूवात केली. पुढे पृथ्वीराजला वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील, तसेच धनाजी पाटील अशा मातब्बर खेळाडूकडून कुस्तीचे धडे मिळाले. विशेष,म्हणजे, पृथ्वीराज पाटील हा आर्मीत देशसेवा करतो.

विशाल बनकरचा परिचय

या वर्षीही महाराष्ट्र केसरीने थोडक्यात हुलकावणी दिलेल्या विशाल बनकर हा पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे. विशाल बनकर हा महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या असून, १९८७ ला विशाल बनकरचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मांडवे गावात जन्म झाला. विशाल गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात श्री शाहू विजयी गंगावेस तालमीतमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ९७ किलो वजन गटातमध्ये विशालला २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार, रंजीतसिंह मोहिते-पाटील यांनी विशाल बनकर याला अंतिम लढतीपूर्वी विजयाच्या शुभेच्छा देताना, तीन लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’प्रसिद्ध कीर्तनकराची  से क्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी.. 

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.