IPL 2022: चेन्नई आणि मुंबई विजयाचं खातं उघडणार? काय सांगतोय रिपोर्ट वाचा सविस्तर..

0

IPL 2022: आयपीएल२०२२ च्या हंगामातला सतरावा आणि अठरावा सामना आज खेळविण्यात येणार असून, चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स हे दोन्हीं संघ विजयाचं खातं उघडणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरवर राज्य करणाऱ्या या दोन्हीं संघांना अद्याप या हंगामात तीन सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. आज मुंबईच्या डी-वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद (CSKvSRH)  यांच्यात दुपारी साडेतीन वाजता पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. तर संध्याकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन्स (MIvRCB) या दोघांचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानावर सामना रंगणार आहे.

या हंगामात लखनऊ सुपरजाइंट्स आणि गुजरात टायटन हे दोन नवीन संघ सहभागी झाल्याने, ही स्पर्धा अधिक रोमांचक होणार असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले हे दोन नवीन संघ कशी कामगिरी करतात? याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं, मात्र अनेक दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत, या दोन्हीं संघांनी या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या संघांनी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या असल्यातरी या दोन्हीं संघांना या हंगामात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.

सुरुवातीच्या तिन्हीं सामन्यांमध्ये हे दोन्हीं संघ पराभूत झाले असल्याने, आज होणाऱ्या सामन्यांमध्ये या संघांना आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा असणार आहे. तर दुसरीकडे सनराईजर्स हैदराबाद संघाला देखील आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा असणार आहे. मात्र हा संघ कागदावर खूपच दुबळा वाटत असल्याने, या हंगामात सनरायझर्स हैदराबाद हा विजयाचा दावेदार मानला जात नाही. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग या संघात आज लढत असल्याने, या दोघांपैकी एका संघाचे विजयाचे खाते उघडणार आहे, हे स्पष्ट आहे. मात्र चेन्नई सुपर किंग संघ आज होणाऱ्या सामन्यांत विजयाचा दावेदार मानला जात आहे.

गतविजेता चेन्नई सुपर किंग संघ या स्पर्धेत देखील फारसा तुल्यबळ वाटत नाही. मात्र या संघाची जमेची बाजू म्हणजे, या संघाकडे महेंद्रसिंग धोनी सारखं नेतृत्व असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार जरी रवींद्र जडेजाला करण्यात आला असलं तरी, अजूनही महेंद्रसिंग धोनीच संघाला लिड करताना पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग संघाच्या सलामीवीरांना साजेशी खेळी करता आली नसल्याने, ऋतुराज गायकवाडकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सलामिवीराची जबाबदारी मिळालेला रॉबिन उतप्पा देखील जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळत असून, त्याच्याकडून देखील मोठ्या खेळाची चेन्नई सुपर किंग संघाला अपेक्षा असणार आहे.

सोबतच ऑल राऊंडर मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, या खेळाडूंवर चेन्नई सुपर किंग संघाची मदार असणार आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचा विचार करायचा झाला तर, या संघाकडे देखील फारसे तारांकित खेळाडू नसल्याने, या संघासमोर देखील प्लेइंग इलेव्हनची चिंता आहे. मात्र चेन्नई सुपर किंग संघाप्रमाणे या संघाकडे देखील केन विल्यमसन सारखे जबरदस्त नेतृत्वगुण कौशल्य आहे. आणि या संघाची देखील ही जमेची बाजू आहे. चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दुपारी खेळवण्यात येणार असल्याने, या सामन्यात टॉसचं फारसं महत्त्व राहणार नाही. दोन्हीं संघाच्या ताकदीचा विचार केला तर, चेन्नई सुपर किंग सनरायझर्स संघापेक्षा थोडासा उजवा वाटतोय.

दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर या दोन बलाढ्य संघाची लढत पुण्याच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात पराभव पत्करला असला तरी, रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ कागदावर बलाढ्य वाटतोय. सुर्यकुमार आल्याने या संघाची मधली फळी आणखी मजबूत झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संघाकडे गोलंदाज देखील मजबूत असल्याचे दिसून येतं. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, कायरॉन पोलार्ड यासारखे तारांकित फलंदाज आहेत.

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडे देखील अनेक तारांकित खेळाडू आहेत. मात्र तुलनेने मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी कागदावर तरी अधिक मजबूत वाटत आहे. पुण्याच्या हाय स्कोरइन ग्राउंडवर टॉसचं खूप मोठं महत्त्व असणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत बहुतांश वेळा टॉस जिंकणारा संघच विजेता ठरला आहे. संध्याकाळच्या सामन्यात टॉसचं अधिक महत्त्व असल्याने, जो संघ टॉस जिंकेल, कदाचित तोच सामनाही जिंकेल. बेंगलोर संघाची मदार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली,दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, हसरंगा, या खेळाडूंवर असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये खेळवण्यात येणारा सामना रोमांचक होण्याची शक्यता असून, या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकण्याची शक्यता अधिक आहे.

हे देखील वाचा IPL 2022: हैदराबाद समोर राजस्थान रॉयल्सचं तकडं आव्हान; या कारणांमुळे रजवाडे हैदराबादची करणार बिर्याणी..

Viral video; लँडिंग होताना विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; व्हिडिओ पाहून होईल काळजाचं पाणी..

Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

Viral video: लेकराला वाचवण्यासाठी आईने दिले बलिदान; आईचं प्रेम दर्शवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पहाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.