IPL 2022: हैदराबाद समोर राजस्थान रॉयल्सचं तकडं आव्हान; ‘या’ कारणांमुळे रजवाडे हैदराबादची करणार बिर्याणी..

0

IPL 2022: आयपीएल 2022 च्या हंगामातला पाचवा सामना आज गेहुजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हैदराबाद आणि राजस्थान यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाचे पारडे जड मानले जात असले तरी, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने हा सामना कोण जिंकेल, याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

आयपीएल २०२२ या स्पर्धेत एकूण दहा संघ असल्याने, ही स्पर्धा अधिक रोमांचक असल्याचे बोलले जात आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन झाल्याने, अनेक संघांचे स्टार खेळाडू इतर संघात गेल्याने, आता ही स्पर्धा अधिक रोमांचक होत असल्याचं पहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघातच्या ताकदीचा विचार केला तर, राजस्थान रॉयल संघाकडे अनेक स्टार खेळाडू असल्याने राजस्थान संघाचे पारडे जड मानले जात आहे. तुलनेने सनरायझर्स हैदराबाद संघाचे अनेक खेळाडू इतरत्र गेल्यामुळे हा संघ कागदावर कमकुवत वाटतोय.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016ला झालेल्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने विजेतेपद पटकावले. मात्र त्यानंतर या संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर आणि दिग्गज लेखक स्पिनर राशिद खान हे दोघेही सनरायझर्स हैदराबादकडे या हंगामात खेळताना पाहायला मिळणार नसल्याने, हा संघ अधिक कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वेळेस झालेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला केवळ 14 सामन्यात केवळ तीन सामने जिंकता आले होते. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाची देखील अवस्था काहीशी अशीच होती.

गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने 14 सामन्यात पाच विजय मिळवले होते. मात्र गेल्या हंगामापेक्षा यावर्षी राजस्थान रॉयल्स संघाचा संघ अधिक बलशाली दिसत आहे. राजस्थान रॉयल संघात संजू सॅमसन, जोस बटलर ,जिम्मी नीशम, ट्रेन बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन आश्विन, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पड्डीकल, करून नायर, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, शिमरॉन हेटमायर, असे तगडे स्टार खेळाडू असल्याने या आयपीएलच्या हंगामात राजस्थान रॉयल संघ इतर संघाच्या तुलनेत अधिक बलशाली वाटतोय.

राजस्थान रॉयल्स हा संघ अधिक बलशाली वाटत असला, तरी देखील मैदानावर या संघाला चांगला परफॉर्मन्स करावा लागणार आहे. भारताच्या अनेक प्रतिभावान खेळाडूंपैकी संजू सॅमसन हा देखील एक प्रतिभावान खेळाडू समजला जातो. मात्र त्याच्या खेळात सातत्य नसल्याने तो अद्यापही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडू शकला नाही. रोहित शर्मा नंतर संजू सॅमसनकडे कमालीचं टॅलेंट असल्याचं बोललं जातं. मात्र या टॅलेंटचं रूपांतर अद्यापही परफॉर्मन्समध्ये झाले नसल्याने, संजू सॅमसनची फारशी ओळख निर्माण झाली नाही. राजस्थान रॉयल संघाकडे सुरुवातीचे, त्याचबरोबर मधलीफळी आणि गोलंदाज देखील जबरदस्त असल्यामुळे, या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मात्र आताच या स्पर्धेला सुरुवात झाली असून, हा संघ या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात कशी कामगिरी करतोय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचा विचार करायचा झाला तर या संघात फारसे स्टार फलंदाज गोलंदाज नसल्याने, गेल्या वर्षीच्या हंगामाप्रमाणे यावर्षी देखील या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी झगडावे लागणार असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. या संघाची जमेची बाजू म्हणजे या संघाची धुरा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे असणार आहे. विल्यमसन बरोबर विजयाची मदार भुवनेश्वर कुमार, निकलस पुरन, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर राहुल त्रिपाठी या खेळाडूंवर असणार आहे. प्रेक्षकांना आजचा सामना हॉटस्टार आणि स्टार फोर्ट या वाहिनीवर ७:३० वाजता पाहता येणार आहे.

हे देखील वाचा. या कारणामुळे महेंद्रसिंग धोनीने दिला चेन्नई संघाच्या कॅप्टन पदाचा राजीनामा; धोनीचा हा शेवटचा हंगाम, वाचा सविस्तर..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर..

Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ‘ही’ आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.