Army Requirement 2022: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मेघा भरती; ‘या’ पदांसाठी ‘असा’ करा अर्ज..

0

Army requirement 2022: भारतीय सैन्य भरती 2022 ची वाट पाहणाऱ्या आणि या क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय चांगली बातमी आली आहे. ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, मध्य प्रदेश जबलपूर यांनी भारतीय सैन्यात ग्रुप सी या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर 10वी पास झाला असाल, तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा? तसेच या परीक्षा संदर्भातली अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊया.

भारतीय सैन्य भरती 2022 अंतर्गत ग्रुप सी पदांसाठी भरती होणार असून, यामध्ये टेलर, बार्बर, रेंज चोकीदार आणि सफाईवाला अशा पदांचा समावेश आहे. भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी तुम्ही पात्र असाल तर प्रकाशित झालेल्या अधिसूचनेत पासून म्हणजेच २६ मार्च 2022 ते 26 एप्रिल 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करु शकणार आहे. आता आपण या पदांचा सविस्तर तपशील जाणून घेऊया,..

भारतीय सैन्य गट सी भर्ती 2022:

रिक्त जागा तपशील: भारतीय सैन्य गट सी या पदांकरिता एकूण नऊ जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामध्ये एक जागा टेलरसाठी, एक नाव्ही, रेंज चोकीदार एक, सफाईवाला २ पदे अशी पदांची विभागणी करण्यात आली आहे.

         काय आहे पात्रता

सैन्य भरती 2022 साठी शैक्षणिक असा विचार झाला तर दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच भारतीय स्वयंपाक माहीत असणे आवश्यक आहे. दर्जी– सरकार मान्यताप्राप्त संस्थेमधील शिंपी म्हणून ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे

न्हावी- न्हावी व्यापारात प्रवीणता असणाऱ्या मान्यताप्राप्त मंडळातून समकक्ष परीक्षा पास असणारं प्रमाणपत्र. रेंज चौकीदार– या पदासाठी एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सोबतच दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.

सफाईवाला – या पदासाठी देखील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच जबाबदारीची जाणीव असणं, आणि यापूर्वी सफारीकाम केल्याचा एक वर्षाचा अनुभव असणं देखील आवश्यक आहे.

   पगार किती?

भारतीय सैन्य दलातील क श्रेणी या पदांची भरती होणार असल्याने, सुरुवातीला पगार कमीच असणार आहे. जाणून घेऊया सविस्तर..

स्वयंपाय करणाऱ्यांसाठी 19900 हजार, टेलरसाठी 18000 हजार, न्हावी 18000 हजार, रेंज चोकीदार 18000 हजार, सफाईवाला -18000 हजार याप्रमाणे पगार दिला जाणार आहे.

              वयोमर्यादा

भारतीय लष्कर गट क पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असणं आवश्यक आहे. असेच OBC साठी 28 वर्षे, SC आणि ST साठी 30 वर्षे असणार आहे. संपूर्ण तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे.

              अर्ज कसा करायचा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलवर indianarmy.nic.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर, भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट ओपन होईल. भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर What’s New विभागातील ‘Advertisement FOR CIVIL VACANCISES’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Advertisement FOR CIVIL VACANCISES या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अधिसूचना उघडलेली असेल. आता तुम्ही खालील दिलेला अर्ज तपासून, डाउनलोड करायचा आहे. अर्ज डाउनलोड झाल्यानंतर, हा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरून संबंधित कागदपत्रसहित कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर (एमपी) पिन – 482001या पत्त्यावर पाठवायचा आहे.

हे देखील वाचा. PM Kisan: पीएम किसान योजनेत बदल करण्यात आलेले हे दोन नियम जाणून घ्या, अन्यथा हप्ते होतील बंद..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘असा’ करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला अन् तुम्हीच पहा व्हायरल व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.