Bear: ‘या’ कारणामुळे बहाद्दराने पिकाची राखण करण्यासाठी चक्क ५०० रुपये रोजंदारीने ‘अस्वल’च ठेवलं कामाला, प्रकरण जाणून..

0

Bear: शेती करणं कोणाचेही काम नाही. शेती करणे म्हणजे स्वतःचा जीव मुठीत धरूनच शेती करावी लागते. शेतकऱ्यांइतकी संकटे कोणत्याही व्यवसायात नाहीत. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पीक पेरणी पासून ते पीक काढून बाजारपेठांत जाईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पीक बहारदार आले तरी, कधी अवकाळी पावसाचे संकट, तर कधी पक्षी, पिकांची नासाडी करणारे विविध प्राणी या सगळ्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते . यासाठी आपण पाहिले असेल, शेतकरी आपलं डोकं वापरून आपल्या शेतात बूजगावणं तयार करतो. याला घाबरून अनेक प्राणी धूम ठोकतात. मात्र प्राणी देखील आता हुशार झालेत, त्यात रानडुक्कर, माकडं, हरीण हे प्राणी असतील तर बोलायलाच नको. ते शेतकऱ्याच्या जुगाडाला घाबरतील तर नवलच. मात्र या प्राण्यांना घाबरवण्याचा जुगाड देखील एका शेतकऱ्याने केला असून, आता याची देशभर जोरदार चर्चा रंगली आहे.

तुम्ही आतापर्यंत बुजगावण्या पलीकडे शेतकऱ्यांचा जुगाड पाहिला नसेल, मात्र एका शेतकऱ्याने रानडुक्करं, माकडं, हरणं यांना घाबरवण्याचा आणि ताणून लावण्याचा जो जुगाड केला आहे, तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या बहाद्दर शेतकऱ्याने आपल्या शेतातील या प्राण्यांपासून होणारे नुकसान थांबवण्यासाठी चक्क ५०० रुपयाच्या रोजंदारीवर एक अस्वल (Bear In Farm) कामाला ठेवले. आहे का नाही आश्‍चर्याचा धक्का बसणार बातमी. यापूर्वी आपण शेतात अनेक शेतमजूर काम करताना पाहिले असतील. मात्र शेतातील पिकांचे प्राण्यापासून नुकसान होऊ नये, यासाठी कधी अस्वल कामाला ठेवलेलं कधीही ऐकलं नसेल आणि तेही पाचशे रुपये रोजंदारीने. आपल्या पिकाची निगा राखण्यासाठी पाचशे रुपये रोजंदारी ने शेतकऱ्याने अस्वस्थामा ठेवला नेल्या घटनेची चर्चा देशभर रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आपल्या शेतात रानडुक्करं आणि माकडं हातातोंडाशी आलेल्या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने, शेतकऱ्याने अस्वल कामाला ठेवले. रानडुक्कर, माकडं, हरीणं असे अनेक वन्यप्राणीआपल्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने,  शेतकऱ्याने ही अजब युक्ती शोधून काढली. आपला आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काढलेल्या युक्ती ना आता देशभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या शेतकऱ्याला सलाम ठोकला आहे ‌‌.

जसं की आपण पाहतो, अनेक शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी अनेकांकडून कर्जाने, उसने पैसे घेतात. घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त शेतीवरच अवलंबून राहवं लागतं. पीक बहारदार आणायचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढायचं आणि मग उसने असेच कर्ज घेतलेले अनेकांचे पैसे पडायचे उरलेल्या पैशातून आपली काम करायची शेतीची मशागत करायची असा शेतकऱ्याचे अर्थचक्र असते. मात्र हातातोंडाशी आलेलं एक वन्यप्राणी हिरावून घेत असतील तर शेतकऱ्यांना काहीतरी उपाय योजना करावीच लागते. हातातोंडाशी आलेलं पिक जर अवकाळी पाऊस, गारपिट, इलेक्ट्रिक फौल्ट, आणि पाण्याची कमतरता, यापुढे शेतकरी काहीही करू शकत नाही. मात्र या व्यतिरिक्त तो कशावरही इलाज करू शकतो, यातून या शेतकऱ्यांने दाखवून दिल्याचं पाहायला मिळत आहे. आहे.

काय आहे नक्की प्रकरण

आपल्या शेजारील तेलंगणा राज्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील होणारे नुकसान थांबवण्यासाठी स्वतः आपल्या शेतात अस्वलाच्या वेशात फिरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल दहा हजार रुपये खर्च करून अस्वलाचा पोशाख देखील शिवून घेतला. ‘भास्कर रेड्डी’ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात अस्वलाचा वेश परिधान करून शेतात फिरल्यामुळे, रानडुक्कर, माकडे यांच्यामध्ये अस्वलाची दहशत निर्माण केली. त्यामुळे त्यांना आपल्या शेतीचे नुकसान थांबवण्यात यश आले.

 

सुरूवातीला आपल्या मुलाला घेऊन, दररोज आपल्या शेतात अस्वलाच्या वेशात फिरायचे. आपली कल्पना योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतावर एका मजुराला ५०० रुपये रोजंदारीवर कामाला ठेवले. त्यांनी अस्वलाचा पोशाख हैद्राबाद येथील एका प्रसिद्ध कपड्याच्या दुकानातून विकत घेतला. या बहाद्दर शेतकऱ्याने, शेतकरी देखील आता कुठे कमी नसल्याचे जगाला दाखवून दिले आहे. सध्या सर्वत्र या शेतकऱ्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या: Gudipadwa 2022: ही आहे गुढीपाडवा उभारण्याची योग्य पद्धत; गुढीपाडव्याविषयी जाणून घ्या अधिक.. 

Haunted Mobile Number: हा मोबाईल क्रमांक घेणाऱ्या प्रत्येकाचा झालाय मृत्य; हे आहे रहस्य..

धक्कदायक: मोबाईल क्रमांक घेणाऱ्या प्रत्येकाचा झालाय मृत्य; हे आहे रहस्य..

Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला अन् तुम्हीच पहा व्हायरल व्हिडिओ.. 

Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.