Haunted Mobile Number: हा मोबाईल क्रमांक घेणाऱ्या प्रत्येकाचा झालाय मृत्य; हे आहे रहस्य.. ‘हा’ मोबाईल क्रमांक घेणाऱ्या प्रत्येकाचा झालाय मृत्य; हे आहे रहस्य..

0

आपण अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील ज्यामुळे  आपल्या मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. काही ठिकाणांबाबत देखील गावाकडे दंतकथा सांगितल्या जातात. ज्या ठिकाणी गेल्यानंतर मग बऱ्याच लोकांना स्वाभाविकपणे भिती वाटते. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही घटना आहे मोबाईल नंबर बाबत. असा मोबाईल नंबर ज्याने कुणी हा मोबाईल नंबर घेतला आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असे वृत्त इंडीयन एक्स्प्रेस या दैनिकात प्रकाशित करण्यात आले आहे. (Haunted Mobile Number)

वरील वृत्तपत्राच्या बातमीनुसार हा मोबाईल क्रमांक एवढा भयंकर आहे की ज्याने कुणी हा मोबाईल क्रमांक घेतला आहे. त्या सबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एक वर्ष, दोन वर्ष नसून तब्बल जवळपास वीस वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. सध्या हे प्रकरण खूपच चर्चेत आले आहे. आतापर्यंत हा मोबाईल क्रमांक तिघांना मिळाला असून धक्कादायक बाब म्हणजे या तिघांना देखील अत्यंत वाईट पद्धतीने मृत्यूला कवटाळले आहे. या तिघांच्या मृत्यूची कहाणी एवढी भयंकर आहे की, एखाद्याचा थरकाप उडेल.

सबंधित मोबाईल क्रमांक बल्गेरिया येथील आहे. हा मोबाईल क्रमांक मोबिटेल कंपनीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्याकडे आला होता. २००० साली ब्लादिमीर ग्रोस्नोव्ह मोबिटेल कंपनीचे सीईओ यांनी घेतला होता. हा क्रमांक 0888888888 त्यांनी स्वतःसाठी घेतला होता. 2000 साली त्यांनी हा मोबाईल क्रमांक घेतला. त्याच्या नंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण हे कॅन्सर हे असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते.

परंतु कॅन्सरमुळे नव्हे तर त्यांचा मृत्यू हा या मोबाईल क्रमांकामुळे झाला असल्याचे बोलले जाते. ग्रोस्नोव्ह यांच्यानंतर एका कुख्यात गुंडाने हा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर हा ड्रग्स डीलर असणारा  गुंड हा  मोबाईल क्रमांक वापरायचा. परंतु हा क्रमांक त्याला मिळाल्यावर त्याचा काही काळातच मृत्यू झाल्याचे पाहायला मिळते. मृत्यू म्हणणे त्याचा खून करण्यात आला होता. त्यांनतर बल्गेरिया येथील एका व्यावसायिकाने हा मोबाईल क्रमांक घेतला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर त्या व्यावसायिकाचा देखील खून करण्यात आला होता. त्यांनतर हा मोबाईल क्रमांक कायमचा बंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: Viral video: काळजाचा ठोका चुकवणारी मुंगसाची आणि सापाची ही लढत एकदा पहाच.. 

Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ.. 

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत.. 

Gas cylinder: सर्वात मोठी ब्रेकिंग! भाजपचा ऐतिहासिक निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.