Viral video: काळजाचा ठोका चुकवणारी मुंगसाची आणि सापाची ‘ही’ लढत एकदा पहाच..
Viral video: कुठल्याही प्रकारची घटना कुठेही घडली असली तरी, अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या तावडीतून वाचणं जवळजवळ अशक्य आहे. कुठलाही व्हिडिओ असला तरी, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतो. खासकरून प्राण्यासंदर्भाले व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, शिवाय या व्हिडिओंना कमालीचे व्ह्यूज देखील मिळतात. अनेकांना प्राणी जंगलात कसे राहतात, हे जाणून घेण्यात अधिक रस असल्याचे पाहायला मिळते. असाच एक सापाची (snake) आणि मुंगसाची जोरदार लढत सुरू असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, असून हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचे पाहायला मिळत आहे.
जसं की आपल्याला माहीत आहे, साप आणि मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. दोघांनी एकमेकांना पाहिलं तरी दोघांची देखील तळपायाची आग मस्तकात जाते. आणि कशाची पर्वा न करता दोघेही एकमेकांना भिडतात. सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्षात देखील आपण मुंगूस आणि सापाची लढत अनेक वेळा पाहिली असेल. मुंगुस सापाला अनेकवेळा चारीमुंड्या चीत करतं, अस आपण नेहमी ऐकतो. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुंगुस सापालाच भारी पडण्याचं पहिला मिळत असून, मुंगसाने हार मानल्याने दिसत आहे.
आपण लहानपणापासून ऐकतो आलोय, मुंगूस सापाला नेहमी भारी पडतं, सापाचे लचके तोडत मुंगुस सापाला खाऊन देखील टाकतं. मुंगसाला साप दिसला की मुंगसाचं पोट भरलं असं म्हटलं जातं. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओत सापच मुंगसावर भारी पडल्याचं, पाहायला मिळत आहे. मुंगूस आपल्या रस्त्याने जात असताना त्याला मध्येच एक साप आढळतो. आता या सापाला खाऊन टाकायचं असा विचार मुंगसाच्या मनात येतो, मुंगूस सापावर हल्ला देखील करतो. मात्र साप देखील आपला भलामोठा फणा काढून मुंगसावर हल्ला करतो.
सापाने केलेला हल्ला मुंगूस वाचवण्यात यशस्वी होतं, मात्र मुंगूस थोडंसं घाबरल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतं. सापाने दंश केल्यानंतर मुंगूस सापाच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे, देखील या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सापाच्या पाठीमागे जाऊन त्याचे लचके काढायचा मुंगसाचा प्रयत्न असल्याचं, या व्हिडिओत जाणवत आहे. मात्र तेवढ्यात हा व्हिडिओ संपल्याने या दोघांच्या लढाईत नक्की काय झालं, हे गुलदस्त्यातच राहतं. मात्र या व्हिडीओला कमालीचे लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट अशा कमेंट्स केल्या आहेत.
काय म्हणाले नेटकरी
अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करताना म्हटले आहे, या व्हिडीओत मुंगसावर साप भारी पडला. असं वाटत असलं तरी, असं अजिबात नाही. या लढाईचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला नसल्याने, पुढे काय झालं? हे आपल्याला माहिती नाही. परंतु माझ्या अनुभवानुसार मुंगसाने या सापाचे तुकडे तुकडे केले असतील यात अजिबात शंका नाही. असं एका युजर्सने म्हटलं आहे. तर दुसर्या एका युजर्सनी म्हटलं आहे, सापाने दंश केला, तेव्हा माझा काळजाचा ठोका चुकला होता. मुंगसाने तो वाचवला हे बरं झालं.
हे देखील वाचा Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर..
Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम