Gas cylinder: सर्वात मोठी ब्रेकिंग! भाजपचा ऐतिहासिक निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार आता मोफत ‘गॅस’ सिलेंडर..

0

Gas cylinder: गॅस दरवाढ (gas prices) इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करून भारतीय जनता पार्टी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आली. साडेचारशे रुपयांच्या आसपास मिळणारा गॅस (gas) आता साडेनऊशे रुपयाला मिळू लागल्याने, सर्वसामान्य जनता या महागाईने त्रस्त असल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गॅसच्या किंमतीत वाढ होत असल्याने, सरकारवर विरोधकांकडून देखील जोरदार टीका केली जाते. मात्र त्याचा कोणताही परिणाम सरकारवर झाल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र आता भारतीय जनता पार्टीने वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर (gas cylinder) देण्याचा महतत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दिवसेंदिवस महागाईने जनता त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना देखील, नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागल्याने, अनेक राजकीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे महागाई बेरोजगारी आणि शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊन देखील, पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. याचे विश्लेषण केलं जाऊ शकते, मात्र देशासाठी हे खूप घातक असल्याचं बोललं गेलं. ज्वलंत मुद्दाला बाजूला सारून लोकांनी मतदान केल्याने, अनेकांनी चिंता व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात इंधनाच्या किंमतीमध्ये किंचितही वाढ झाली नव्हती, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर दिवसेंदिवस इंधन दरवाढ होताना पहायला मिळत असल्याने, विरोधक आक्रमक झाले आहेत.

एकीकडे इंधन दरवाढ दिवसेंदिवस होत असतानाच, आता गोवा भाजपाने गोवाकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँग्रेसचं खूप मोठं आव्हान असल्याचं बोललं जात होतं. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसून, या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असं अनेक विश्लेषकांकडून बोललं गेलं होतं. मात्र गोव्यात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकहाती सत्ता मिळवत अनेकांना आश्चर्यचकित केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod savant)  यांच्या नेृत्वाखालील पार पडलेल्या मंत्रीमंडळातील पहिल्याच बैठकीत गोवाकरांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गोवा सरकारने म्हणजेच भाजपाने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात गोवाकरांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली आहे. निवडणुकीपूर्वी गोवाकरांसाठी दरवर्षी तीन सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, त्याच घोषनेची वचनपूर्ती मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत प्रमोद सावंत यांनी केल्याने, सर्वसामान्य गोवाकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करताना दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करताना म्हंटले, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, पहिल्या बैठकीत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आम्ही दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे गोवाकरांसाठी दरवर्षी तीन मोफत सिलेंडर देणार आहोत. या निर्णयाची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षापासून केली जाईल. या संदर्भातला आराखडा तयार करण्याचा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे”

या महत्वपूर्ण निर्णयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (goa cm Pramod savant) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, लोहखनिजाचे उत्खनन सुरू करणे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणं, याला आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, प्रमोद सावंत यांना विरोधकांनी आकस्मिक मुख्यमंत्री” म्हणून हिणवले होते. मात्र त्यांनी आता पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर, 2019 मध्ये प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला होता. भाजपाने ही विधानसभा निवडणुक देखील प्रमोद सावंत यांच्या नेृत्वाखालील लढवली. फक्त लढवलीच नाही तर, चाळीस जागांपैकी तब्बल निम्म्या जागा जिंकून, सत्ता स्थापन देखील केली.

हे देखील वाचा Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक...

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार...

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! हा जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत..

Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.