Pune Blast : पुण्यात कात्रज नंतर चाकण मध्ये मोठी दुर्घटना, ‘या’ कारणामुळे मोठा ब्लास्ट

0

पुणे प्रतिनिधी,  पुण्यातील कात्रज येथील स्फोटानंतर आता पुण्यातील चाकण (Pune Chakan Blast) येथे अजून एक स्फोट (Blast In Industry) घडल्याची माहिती नुकतीच महाराष्ट्र लोकशाही न्युजच्या हाती आली आहे. चाकण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) एका कंपनीमध्ये काम सुरु असताना हा स्फोट घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीतील विद्युत बॉक्सचा अचानक मोठा स्फोट झाला. आळंदीफाटा चाकण येथील शोकिंन कैलास वर्क वर्कशॉप कंपनीमध्ये हा स्फोट झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेमध्ये कंपनीतील तीन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आज दुपारी देखील कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले असताना सदर घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट घडल्याची घटना आज दुपारी पुणे येथे घडली होती.

गॅस सिलिंडरच्या एका पाठोपाठ झालेल्या स्फोटांनी कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली होती. धडकी भरवणारे स्फोटाचे आवाज या व्हिडीओमध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळतील. या गॅस सिलिंडर स्फोटाच्या आवाजांमुळे कात्रज भागामध्ये खळबळ माजली होती. अद्याप कात्रज मध्ये घडलेली घटना नक्की कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण मिळाले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने हजर राहून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत.

हेही वाचा: Gopichand padalkar: धक्कादायक खुलासा! नागल फाट्यावर गोपीचंद पडळकर हातभट्टी विकतात; तुम्हीच वाचा.. 

Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ही आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि.. 

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर; 

दोन घटस्फोट, २१ दिवसांत पंधरा जणांसोबत लफडं नंतर प्रेमावर पुस्तक; महिलेने स्वतःच सांगितले सगळेच अनुभव..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.