Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…
Aadhar card update: आधार कार्ड प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. आधार कार्ड शिवाय तुम्ही सध्याच्या काळात जगूच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे तुम्ही मान्यही कराल. कुठलीही सरकारी योजना असेल, कुठलीही कागदपत्रे काढायची असल्यास, तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड द्यावच लागतं. आधार कार्ड तुमची सध्या ओळख बनलंय, आणि आधार कार्डशिवाय तुमचं कुठलेही काम होणार नाही. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणन आवश्यक आहेच, सोबत ते अचूक असणं देखील महत्त्वाचं आहे.
जर तुमच्या आधार कार्डवर तुमच्या नावात काही बदल झालेला असेल, जन्मतारीख चुकीची असेल, किंवा इतर आणखीन काही असेल, तर यासंदर्भातली दुरुस्ती करण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या आधार कार्डचे सगळे अपडेट स्वतः तुमच्या मोबाईल वर करू शकता. यापूर्वी तुम्हाला आधार कार्ड विषयी काही माहिती द्यायची झाल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जात होता. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जास्त घेतल्याचे, अनुभव आले असतील.
आधार कार्ड विषयी कोणतीही अपडेट करायची असेल, तर तुम्हाला आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर आधार कार्डची कुठल्याही प्रकारची अपडेट, अगदी तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, आणि पत्नीचं आधार कार्डवर पती म्हणून तुमचं नाव लावायचं आहे, तरी देखील हे काम तुम्ही घरीबसल्या सहज करु शकता. आधार कार्ड अपडेट कसं करायचं? आधार कार्डवर नाव दुरुस्ती कशी करायची? या विषयीची सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला तुमच्या शब्दात सांगणार आहोत.
UIDAI या सरकारी अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला आधारकार्डमध्ये सुधारणा, तुमच्या पत्नीच्या नावापुढे तुमचं नाव, अशा अनेक प्रकारच्या अपडेट्स तुम्ही या वेबसाईटवर जाऊन सहज करू शकता. या वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या आधार केंद्रला भेट देऊन, ती करू शकता. मात्र त्याठिकाणी तुम्हाला जास्त कर आकारण्यात येऊ शकतो. शिवाय तुमचा अधिक वेळ देखील जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता. याविषयीची सगळी माहिती तुम्हाला आम्ही अगदी सोप्या भाषेत सांगत आहोत.
असं करा अपडेट
आधार कार्ड संदर्भातली कोणतीही अपडेट करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला uidai.gov.in असं सर्च करावे लागणार आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन झालेला असेल, त्या पेजवर माय आधार विभागात तुम्हाला ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आणखी एक पेज ओपन झालेलं दिसेल. त्यात तुम्हाला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावर एक ओटीपी आलेला असेल. आलेला ओटीपी तुम्ही तुमच्या समोर असणाऱ्या रकान्यात समाविष्ट करायचा आहे. आणि अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथपर्यंत सगळे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काय बदल करायचे आहेत. तो ऑप्शन निवडायचा आहे. हे काम करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे. ती म्हणजे, यासाठी लागणारी कागदपत्रे देखील अपडेट करणं गरजेचे आहे. तुम्हाला पॅन, पासपोर्ट इत्यादी ओळखीच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत सबमिट करणे आवश्यक असणार आहे. तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला, पेमेंट करण्यासाठी कन्फर्म करावं लागणार आहे.
तुम्ही केलेले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) व्युत्पन्न होईल. याचा अर्थ तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुल झाली असा होतो. यानंतर तुम्ही तुमची पोचपावती डाउनलोड देखील करू शकता. यानंतर काही दिवसांत तुम्हाला तुमचा आधार कार्ड दिलेल्या पत्त्यावर घरी मिळणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन देखील प्रक्रिया आहे. मात्र ती थोडी त्रासदायक आणि तुमचा वेळ वाया जाणारी असल्याने, तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. मात्र याविषयी देखील आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
ऑफलाइन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधावा लागणार आहे.
ही आहेत कागदपत्रे
लग्नानंतर जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावापुढे पती म्हणून, तुमचं नाव लावायचं असेल तर, तुम्हाला अधिकृत सरकारी एजन्सीद्वारे जारी केलेले विवाह प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या यात तुम्हाला पती आणि पत्नी दोघांचा पत्ता असलेलेच प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..
कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर..
Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या फोनने बाजारात केलाय कहर..
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम