Anil Deshmukh: फडणवीसांच्या षडयंत्रामुळे अनिल देशमुखांचा गेला बळी; शंभर कोटींच्या आरोपातून देशमुख यांना क्लीन चिट

0

Anil Deshmukh money laundering case: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे Sachin Waze,  आणि परमबीर सिंग(parmbir shing)  यांनी आम्हाला 100 कोटी वसुली करण्यास सांगितले असल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच हाहाकार माजल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका करत अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला. प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून काढून टाकण्यात आले. अनिल देशमुख यांना आता या रोपांपासून क्लीन चिट मिळाली असून, अनिल देशमुख यांना फडणवीस यांनी षडयंत्र करून जेलमध्ये टाकल्याचं आता स्पष्ट होत आहे.

शंभर कोटी वसुली प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची (chandiwal committee) स्थापना केली. आता या आयोगाचा तपास पूर्ण झाला असून, त्यांनी आपला अहवाल सादर केला आहे. सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळत नसल्याचे, स्पष्ट केले आहे. आणि म्हणून आता अनिल देशमुखांना २३ तारखेला क्लिन चिट मिळणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्या राज्यात भाजपची (bjp)सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणा सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा, आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतो. मात्र तरीदेखील या यंत्रणा कारवाई करताना पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपासून तर या यंत्रणांनी खासकरून महाराष्ट्रात धडाकाच लावला आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीच्याकडून विरोधकांच्या ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, खरोखर त्याच मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करताना पाहायला मिळते. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतरच, अनिल देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केल्यानंतर, राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना केली. आता या आयोगाचा तपास पूर्ण झाला असून, चांदिवाल आयोग आपला अंतिम निकाल २३ मार्चला देणार आहे. अॅड‌. शिशिर हिरे यांनी आयोगाकडून या प्रकरणाचा युक्तीवाद केला आहे.

चांदीवाल आयोगाने आपला अहवाल सादर करताना म्हंटले आहे, परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले, मात्र या गंभीर घटनेची नोंद ही स्टेशन डायरीत केली नाही. कुठलाही गंभीर गुन्हा दाखल करताना, स्टेशन डायरी हे पोलिसांसाठी खूप महत्वाचे साधन मानले जाते. मात्र या दोघांनी या डायरीचा वापर केला नाही. तसेच वाझे यांनी १०० कोटी वसुलीसंदर्भात कधीही वरिष्ठांकडे कुठल्याच प्रकारची लेखी तक्रार केली नाही, असा युक्तिवाद चांदिवाल आयोगाचे वकील हिरे यांनी केला.

परमबीर सिंग यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी कधीच १०० कोटी वसुलीबाबत पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली नाही. तसेच अटक होण्यापूर्वी परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुली प्रकरण सुरु होते, या घटनेचा कुठेही, एफआयआरही नोंदवलेला नाही. असाही युक्तिवाद चांसिवाल आयोगाकडून करण्यात आला. त्यामुळे आता या आरोपातून अनिल देशमुख यांना येत्या २३ मार्चला क्लिनचीट मिळणार असल्याचे, बोललं जात आहे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले गेलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सरकारी दरबारी कुठेही नोंद केली नाही. यामुळे त्यांनी केलेले आरोप वैध असल्याचं म्हणता येत नाही. असंही अहवालात म्हंटले आहे. आणि आता त्यामुळे अनिल देशमुख यांना या आरोपातून क्लिनचिट मिळण्याची शक्यता आहे. चांदिवाल आयोग २३ मार्चला आपला या संदर्भात केलेल्या चौकशीचा अंतिम निर्णय देणार आहे.

चांदिवाल आयोगाने देशमुख हे या प्रकरणात दोषी आढळत नसल्याचे म्हटल्याने, आता या प्रकरणात अनिल देशमुख यांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस यांनी अटक करायला लावली. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणविस यांनी अनिल देशमुखांचा बळी घेतला. सत्ता स्थापन करू न शकल्याने, विरोधकांवर खोटे आरोप करायचे. आणि सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा, हेच यातून दिसून येत असल्याच्या चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ..

पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना…

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त…

इरफान पठानच्या पत्नीचा मनमोहक चेहरा आला समोर; सुंदरता पाहून चाहते झाले घायाळ..

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.