‘या’ पद्धतीने मार्चमध्ये केवळ दोनच भाज्या करा, आणि लाखों रुपये कमवा

0

बहुतांशी भारतीयांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, अलीकडच्या काळात शेतीकडे अनेकजण वळल्याचे पाहायला मिळते, खास करून तरुण वर्गाने देखील शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे, चित्र आता पाहायला मिळू लागले आहे. बाजारात कुठल्या पिकाची मागणी आहे, याचा अंदाज घेतला, आणि शेती आधुनिक पद्धतीने केली तर, शेतीत भरघोस उत्पन्न देखील मिळत असल्याचं आता अनेकांच्या आता लक्षात आलं आहे. आज आम्ही मार्चमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या दोन भाज्याविषयी बोलणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला येत्या काही दिवसांत ह्या दोन भाज्या भरघोस उत्पन्न मिळवून देण्याचं काम करतील.

आधुनिकते बरोबरच बाजाराच्या मागणीनुसार शेती केल्यास, शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाणार नाही, आणि त्याला भरघोस उत्पन्न मिळेल ही गोष्ट लक्षात घेऊनच, आता शेतकरी देखील शेतीकडे वळला आहे.  याबरोबरच शेतकऱ्याला आता आपला माल आपणच विकला तर, आपल्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकतं, ही गोष्ट देखील शेतकऱ्याच्या लक्षात आली आहे. आता आम्ही तुम्हाला, मार्चमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या दोन भाज्यांविषयी माहिती देणार आहोत.

                             काकडी

उन्हाळा सुरू झाला की काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. काकडी हे शरीराला थंड करण्यासचं काम करते. रोजच्या जेवणामध्ये काकडी हा प्रकार हमखास असतोच असतो. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे शरीराला अनेक आजार उद्भवला सुरुवात होते. उन्हाळ्यात भुकेपेक्षा माणसाला पाण्याची आवश्यकता जास्त असते, आणि काकडी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्याचे काम करते. उन्हाळ्यात पचनक्रियाचे अनेक आजार उद्भवताना पहिला मिळते. आणि त्यामुळे मूळव्याधाचा त्रास देखील जाणवतो. अशात काकडी खूप प्रभावी ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

                 काकडी लावण्याची पद्धत

काकडीची लागवड करताना विशेष अशी काही काळजी घेण्याची आवश्यकता नसते मात्र, रानाची योग्य मशागत होणं फार महत्त्वाचा आहे. ज्या रानात आपण काकडीची लागण करणार आहोत, त्या रानात साधरण दोन महिने अगोदर, लेंडी खत किंवा कोंबडी खत टाकून घेणं गरजेचं आहे. एक हेक्‍टर क्षेत्राला साधारण दोन ते अडीच किलो काकडीचे ‘बी’ पेरणं  गरजेचं आहे. काकडीची लागवड करताना सऱ्या पाडायच्या आहेत. या सऱ्यांचे अंतर हे एक मीटर असणे गरजेचे आहे. काकडीची लागवड करताना, दोन्हीं रोपांमधले अंतर हे 775 सेमी असणं आवश्यक आहे.

                               भेंडी

कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून, अलिकडच्या काळात भेंडीने उभारी घेतल्याचे पाहायला मिळतं. शेतकरी देखील या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पाहायला मिळते. उन्हाळ्यामध्ये इतर हंगामापेक्षा भेंडीला अधिक मागणी असल्याचं समोर आलं आहे. आणि म्हणून मार्चमध्ये भेंडीची लागवड केल्यानंतर तुम्हाला भेंडी लाखो रुपये मिळवून देऊ शकते. विशेष म्हणजे भेंडीची मार्चमध्ये लागवड केल्यानंतर, पिकं देखील जोमात येतं. आणि अवकाळी पावसाचा देखील फटका सहसा बसत नाही.

                   भेंडी पेरण्याची पद्धत

काकडीच्या तुलनेत भेंडीची लागवड करताना थोडीशी खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते, भिंडीच्या बिया पेरण्या अगोदर साधारण दिड ते दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत.  त्यानंतर पाण्यातून काढून तुम्ही सुकण्यासाठी योग्य ठिकामी ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर भेंडीच्या बिया पेरण्यापूर्वी कुठल्याही दोन ग्रॅम बुरशीनाशकामध्ये मिसळाव्यात. भेंडी लागवड करताना दोन्हीं बीयांमधले अंतर हे साधारण २५ ते ३० सेंटीमीटर असणं गरजेचं आहे.

                     भेंडीच्या शेतीत खत

भेंडी लागवड करताना देखील लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत करणे खूप गरजेचे आहे. भेंडी लागवड करण्याच्या अगोदर साधारण दोन महिने, कोंबडी खत किंवा लेंडी खत मिसळून घेणे आवश्यक आहे. काकडीचा तुलनेत भेंडीला अधिक रोग असल्याने, भेंडीची जास्त निगा राखणे महत्त्वाचं ठरतं.

हे देखील वाचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल..

‘या’ चूकीच्या ठिकाणी ‘तुळस’ ठेवल्यास घरात कटकट आणि अशांती पसरते; याविषयी जाणून घ्या सविस्तर....

Maharashtra Budget 2022:अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार..

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; ‘या’ कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किंमती गगनाला भिडणार…

‘या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्तर…

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान वाचून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.