रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण..
युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Rasiya) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वीच अनेक तज्ञांनी युद्ध झालं तर याचा खूप मोठा फटका संपूर्ण जगाला सोसावा लागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता एकूण तेरा दिवस झाले, तरी हे युद्ध सुरुच असल्याने, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं कंबर मोडून पडणार असल्याचं बोललं जातंय. मात्र इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त फटका भारताला बसणार असल्याचे समोर आलं आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर आपण पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. मात्र हे दर काहीच वाढले नसून, येणाऱ्या महिन्यांत खाद्य तेलाचे दर गगनाला भिडणार असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलंय. सूर्यफूल तेल (sunflower oil) भारतात मोठ्या प्रमाणात युक्रेनवरुन आयात केलं जातं. भारत देश संपूर्णतः आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलावर अवलंबून आहे. मात्र आता युद्ध सुरू असल्याने युक्रेनचं संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाल्याने, भारतात सूर्यफूल तेलाचा तुटवडा निर्माण होणार, किंबहुना झाला आहे.
आपला भारत जवळपास 80 टक्के सूर्यफूल तेल हे युक्रेन देशातूनच आयात करत असतो. युक्रेन नंतर आयात करण्याचा यादीत रशियाचा नंबर लागतो. दोन्हीं देशातून भारतात सूर्यफूल जवळपास शंभर टक्के आयात केले जातं. त्यामुळे आता निश्चितच रशिया आणि यूक्रेन युद्धाचा परिणाम हा आपल्याला भोगावा लागणार आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंतच कच्च्या तेलाने जवळपास १०२ डॉलर प्रति बॅरलचआ टप्पा ओलांडला आहे.
भारतात पाच राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र निवडणुकांच्या काळात इंधनाचे दर वाढले नाही. यावरून सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती वाढूनही, भारतात त्या स्थिर ठेवण्यात आल्या. यावरून सरकारला ट्रोल केलं केलं. निवडणूक संपताच इंधन दरवाढ झाल्याने, आता येणाऱ्या काही दिवसांत याचा भडका उडणार, असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या या युद्धामुळे फक्त इंधन दरवाढच नाही, तर खाद्यतेलाच्या किमती देखील गगनाला भिडणार आहेत. जर तुम्ही सूर्यफुलाचे तेल वापरत असाल, तर तुमच्याही लक्षातही आलं असेल, सूर्यफुलाच्या पाच लिटर तेलामागे तब्बल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांत तुम्ही विचारही करू शकणार नाही, एवढ्या या तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं, स्पष्ट आहे.
आपल्या देशात प्रत्येक वर्षी २१० ते २२० लाख टन खाद्यतेलाचा वापर होत असतो. त्यामध्ये सूर्यफूल तेल हे ३० लाख टनापेक्षा जास्त लागते. पाम, सोया,मोहरी तेलानंतर सूर्यफूल तेलाचा नंबर लागतो. आपल्याकडे केवळ ५० हजाराच्या आसपास तेलाचे उत्पादन होत असते. आणि आपल्याला सूर्यफूल तेलाची गरज असते, २३ते २६ लाख टनाची. आणि या मागणीची आयात आपण रशिया आणि युक्रेनवरून करत असतो. आता सहाजिकच यामुळे सूर्यफूल तेलाच्या किंमती गगनाला भिडणार असल्याचं तुमच्या लक्षात आलं असेलच.
युक्रेन आणि रशिया व्यतिरिक्त अर्जेंटिनातूनही थोड्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र रशियाने त्यांचे सैन्य सीमांवर तैनात केल्यामुळे युक्रेनच्या शेतीमाल विस्कळीत झाला आहे. रशिया युक्रेनचे जीवनमान कसे विस्कळीत झाले आहे, हे आपण पाहातच आहोत. दोन्हीं देशात धोका निर्माण झाल्याने, शेतीमालासह इतर वस्तूंला देखील यामुळे इजा झाली आहे.
युद्धामुळे जिवाला घाबरून व्यापार देखील शांत आहे. ते देखील कुठे हालचाल करताना दिसत नसल्याचं समोर आलं आहे. समुद्र प्रदेशातील बंदरे रशियाने व्यापारासाठी खुली ठेवली असली तरी, युद्धामुळे धोका निर्माण झाल्याने, रिस्क घ्यायला कोणीही तयार नसल्याने, वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे. आणि म्हणून साहजिकच, याचा परिणाम सूर्यफूल तसेच इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
वरील संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर, प्रत्येकाच्या मनात आता खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडणार असल्याने, मनात अस्वस्थता निर्माण झाली असेल. मात्र याला काही पर्याय नाही. जर तुम्ही खाद्यतेलाचे खासकरून, सूर्यफूल तेलाचे शौकीन असाल तर, किमती आणखीन वाढायच्या आतच येणारे काही महिने, किंबहुना वर्षाचा विचार करूनच खरेदी करणं उचित ठरणार आहे.
हे देखील वाचा.पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल...
Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा
‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..
केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर…
राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज..
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम