१० कोटींहून अधिक रक्कम मिळालेल्या आठ खेळाडूंमध्ये पाच बॉलर; वाचा आजच्या दिवसाचा लिलाव

0

आयपीएल २०२२ साठी मेगा ऑक्शन सुरू असून, आत्तापर्यंत एकूण ४१ खेळाडूंवर बोली लागली असून, यात सर्वाधिक बोली ईशान किशनवर लागली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये ईशान किशनला खरेदी करण्यासाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळाले. मात्र यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. ईशान किशन, युवराज सिंग नंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तब्बल पंधरा कोटी 25 लाख रुपये देत मुंबईने खरेदी केले.

एकीकडे विकेट किपर फलंदाजाला 15 कोटी 25 लाख रुपये देऊन मुंबई इंडियन्स खरेदी केलं असलं तरी, या लिलावात अनेक संघाची पसंती ही फास्ट गोलंदाज असल्याचे दिसून आले. या लिलावात गोलंदाजांचा बोलबाला राहील्याने पाहायला मिळाले. या लिलावात एकूण पाच गोलंदाजांची बोली ही दहा कोटींहून अधिक लागली. ज्या आठ खेळाडूंची बोली दहा कोटींच्यावर गेली, त्यात एकूण पाच गोलंदाजांचा समावेश आहे.

टी ट्वेन्टी क्रिकेट म्हटले की, फलंदाजांना अधिक महत्त्व दिल्याचं पाहायला मिळतं‌. मात्र या लिलावाचा विचार केला तर फलंदाजांऐवजी गोलंदाजांना अधिक महत्त्व आल्याचं पाहायला मिळालं. आयपीएल २०२२ घ्या लिलावात अनेक संघाने आपले पैसे इन्व्हेस्ट करताना गोलंदाजांवर केल्याचे दिसून आलं. या लिलावात जलदगती गोलंदाजांवर सगळ्याच संघाचे मालक मेहरबान असल्याचं पाहायला मिळालं. जलदगती गोलंदाजाच्या तुलनेत स्पिन गोलंदाजांना फारच कमी बोली लागल्याचेही दिसून आले.

आत्तापर्यंत बोली लागलेले खेळाडू

शिखर धवन ८.२५ कोटी ( पंजाब किंक्स) आर अश्विन ५ कोटी(राजस्थान रॉयल्स) पॅट कमिन्स 7.25 कोटी,(कोलकाता नाईट रायडर्स) कागिसो रबाडा ९.२५ कोटी ( पंजाब किंग्स) ट्रेंट बोल्ट 8 कोटी (राजस्थान रॉयल्स) श्रेयस अय्यर १२.२५ ( केकेआर) मोहम्मद शमी 6.25 कोटी (गुजरात) फाफ डु प्लेसिस 7 कोटी (आरसीबी) क्विंटन डीकॉक 6.75 कोटी (लखनऊ) डेव्हिड वॉर्नर 6.25 कोटी( दिल्ली)

मनीष पांडे 4.6 कोटी (लखनऊ) शिमरॉन हेटमायर 8.5 कोटी (राजस्थान) रॉबिन उथप्पा २ कोटी (चेन्नई सुपर किंग्) जेसन रॉय 2 कोटी, (गुजरात) देवदत्त पडिक्कल 7.75 कोटी (राजस्थान रॉयल्स) ड्वेन ब्राव्हो 4.4 कोटी ( चेन्नई सुपर किंग्) नितीश राणा 8 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स) जेसन होल्डर 8.75 कोटी (लखनऊ) हर्षल पटेल 10.75 कोटी (आरसीबी) दीपक हुडा 5.75 कोटी (लखनऊ) वानिंदू हसरंगा 10.75 कोटी (आरसीबी) वॉशिंग्टन सुंदर 8.75 कोटी( हैदराबाद) कृणाल पंड्या 8.25 कोटी (लखनऊ)

मिचेल मार्श 6.5 कोटी (दिल्ली कॅपीटल) अंबाती रायुडू 6.75 कोटी (चेन्नई सुपर किंग्) इशान किशन 15.25 कोटी (मुंबई इंडियन्स) जॉनी बेअरस्टो 6.75 कोटी( पंजाब किंक्स) दिनेश कार्तिक 5.5 कोटी(आरसीबी), निकोलस पूरन 10.75 कोटी(हैदराबाद), नटराजन 4कोटी (हैदराबाद), दीपक चहर 14 कोटी (चेन्नई), प्रसिद्ध कृष्णा 10 कोटी (राजस्थान रॉयल्स), लॉकी फर्ग्युसन 10 कोटी,( गुजरात)

जोश हेझलवुड 7.75 कोटी (आरसीबी) मार्क वुड 7.5 कोटी( लखनऊ) भुवनेश्वर कुमार 4.2 कोटी (हैदराबाद) शार्दुल ठाकूर 10.75 कोटी ( दिल्ली कॅपीटल) मुस्तफिजुर रहमान 2 कोटी( दिल्ली कॅपीटलस) कुलदीप यादव 2 कोटी (दिल्ली कॅपीटलस) राहुल चहर 5.25 कोटी( पंजाब) युझवेंद्र चहल 6.5 कोटी ( राजस्थान)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.