मराठ्यांनी लाखोच्या संख्येने 58 मूक मोर्चे काढले, पण तुमच्यासारखा कोणाला त्रास होऊ दिला नाही
महविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्ला चढवणारे नितेश राणे यांनी अमरावतीत झालेल्या हिंसाचार विषयी देखील भाष्य केले आहे. या हिंसाचाराला राज्य सरकारला जबाबरार धरत नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले आहेत. या हिंसाचाराला मागे रजा अकादमी असल्याचा आरोप देखील नितेश राणे यांनी करत, ही संघटना बंद करा. नाहीतर या संघटनेला संपवायचं आम्हाला माहिती आहे अशा असल्याचा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांनी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने काढलेले 58 मूक मोर्चाविषयी देखील भाष्य करत याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
त्रिपुरामध्ये अल्पसंख्यांकावर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून काल अनेक मुस्लिम संघटनांनी राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढले, निवेदने दिली. मात्र काही भागात मोर्चाचे हिंसाचारात देखील रूपांतर झाल्याचे पाहायला मिळाले. काल झालेल्या घटनेमुळे आज भारतीय जनता पार्टी कडून अमरावतीमध्ये बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या बंद दरम्यान चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी दुकानांवर दगडफेक जाळपोळ करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधक या घटनेला एकमेकांना जबाबदार धरत असल्याचे चित्र देखील महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी देखील भाष्य करत, या घटनेला भाजपला जबाबदार धरले. ज्यावेळी भाजपाचे सर्व अस्त्र संपतात, त्यावेळी भाजप दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करत. असा आरोप संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर केला. संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हटले, अशा दंगली स्वतः घडवायच्या आणि राज्य सरकार राज्य करण्यास असमर्थ असल्याचा दाखवायचं. आता यापुढे हे चालणार नाही. लोकं तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत. असे देखील संजय राऊत म्हणाले.
याविषयी आपली भूमिका मांडली असली तरी दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मात्र राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नितेश राणे यांनी या घटनेविषयी बोलताना म्हटले, या घटनेमागे रजा आकादमीचा असल्याचा हात असून आरोप नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवरून केला होता. नितेश राणे या पुढे म्हणाले, या संघटनेवर बंदी घाला नाही तर रजा अकादमीला संपवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले..
कालच्या पेक्षा मोठे..
पण कोणाला ही त्रास झाला नाही..
त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात..
औरंगजेबचे नाही !!!— nitesh rane (@NiteshNRane) November 13, 2021
त्याचबरोबर नितेश राणे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, आम्ही राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तब्बल 58 मूक मोर्चे लाखोच्या संख्येने काढले. मात्र कुठेही या मोर्चाला गालबोट लागलं नाही,कोणालाही त्रास झाला नाही. मात्र शांततेत मोर्चे काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी असावे लागतात. औरंगजेबाचे नाही. असा घणाघात देखील नितेश राणे यांशी महाविकास आघाडीवर केला. नितेश राणे महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार हल्ला चढवला होता.
हेही वाचा: आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, सर्वसामान्य लोकांना देखील बसणार फटका
अजित पवार संतापले, मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात; त्याला त्रास नको म्हणून ऐकून घेतोय..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम