Amravati Violence: अमरावती हिंसाचारातील दोषींवर आता कडक कारवाई होणार, विरोधी पक्षाला दिलीप वळसे पाटील म्हणाले..
मुंबई| त्रिपुरामधील कथित (Tripura) घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. (Amaravati Violence) या मोर्चांना अमरावती, मालेगाव या ठिकाणी हिंसक वळण लागलेल पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आज अमरावतीमध्ये बंदचा नारा दिला होता. या अमरावती बंदला देखील हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे.
अमरावतीमध्ये काही जमावाकडून दगडफेक आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. कालच अमरावतीत हिंसाचार पाहायला मिळतो न तोच आज देखील तसाच प्रकार पाहायला मिळाला. अमरावतीमध्ये शांतता व सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
भाजपकडून आज अमरावतीमध्ये अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागायला नको होते. हा बंद शांततेत होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु, दुर्दैवाने बंदमध्ये चुकीच्या घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं खूप नुकसान झालं आहे. अमरावतीतील हिंसक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पुढे बोलत असताना गृहमंत्री म्हणाले, आम्ही विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत सुद्धा याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, आपल्याला आपलं राज्य महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात शांतता राहील यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती केल्याचे देखील ते म्हणाले. अमरावतीसह महाराष्ट्रात शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्रात आज सर्व भागामध्ये शांतता आहे. अमरावती शहरात एक घटना घडली आहे आणि लवकरच अमरावतीतील तणाव परिस्थिती आटोक्यात येईल. समाजामध्ये द्वेष आणि हिंसाचाराला चालना देणाऱ्यांवर आणि हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
IndvsNZ:धक्कादायक..! भारतीय संघात पडले दोन गट; जाणून घ्या रोहितच्या गटात कोणी आणि विराटच्या गटात कोण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम