AUSvPAK: खायचं भारताचं आणि गायचं पाकिस्तानचं; पाकिस्तानला सपोर्ट केल्याने सानिया झाली ट्रोल व्हिडिओ व्हायरल

T20 World Cup: दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची खूपच निराशाजनक कामगिरी राहिली. भारताचा या विश्वचषकातला पहिलाच सामना स्थान संघाविरुद्ध खेळण्यात आला होता. या दोन्ही संघामध्ये बाय लेटर सिरीज गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नसल्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे कमालीचे लक्ष लागून राहिले होतं. मात्र पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानने चारीमुंड्या चीत करत ऐतिहासीक विजयाची नोंद केली.

पाकिस्तान कडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, यापेक्षाही वाईट घटना या दिवशी भारत देशात घटल्याचं पाहिला मिळालं. एकीकडे भारत पराभूत झाला आणि भारताच्या काही भागात याचा जल्लोष देखील साजरा करण्यात आला. या जल्लोषात अनेकांवर देशद्रोहाचा खटला देखील दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटला अद्याप खेळ भावनेनं अजूनही भारतीयांकडून पाहिला जात नसल्याचं समोर येताना पाहायला मिळते.

पाकिस्तान विरुद्ध भारताचा पराभव झाला (Pakistan beat India) याचा जल्लोष करूनही समर्थनार्थ गोष्ट नाहीच. मात्र पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे (Pakistan cricket team) कौतुक केले तरी देखील भारतीयांना टीकेला सामोरं जावं लागतं याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. पाकिस्तान आपला दुश्मन आहे,ही गोष्ट जरी खरी असली तरी, खेळांमध्ये राजकारण करणं म्हणजे आपल्या संकुचित विचारांचे प्रमाण आहे हे स्पष्ट होतं.

पाकिस्तान संघ या विश्वचषकामध्ये इतर संघाच्या तुलनेत उत्तम क्रिकेट खेळला आहे, हे जरी मान्य असलं तरी देखील भारतामध्ये पाकिस्तान संघाचे कौतुक मोकळ्या मनाने कोणीही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे ही परिस्थिती असली तरीदेखील पाकिस्तानची सून आणि भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा काल पाकिस्तान क्रिकेट संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळाली. आणि पुन्हा नवा वादंग सुरू झाला‌.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काल झालेल्या (Australia beat Pakistan) सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या विकेट जात असताना सानिया मिर्झा जल्लोष करताना, टाळ्या वाजवताना पाहिला मिळाली. सानिया मिर्झाने केलेल्या या कृत्यामुळे तिला चांगलेच ट्रोल देखील करण्यात आले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तिला गद्दार असल्याचं म्हटलं, तर काहींनी तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील केली. खायचं भारताचं आणि गायचं पाकिस्तानचं हे चालणार नाही, असे खडेबोल देखील काही युजर्सनी सानियाला सुनावले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.