अजित पवार संतापले, मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात; त्याला त्रास नको म्हणून ऐकून घेतोय..
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला रोहित पवार यांचे काका व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार भाषण करत असताना उपस्थितांमधून काही लोक विविध मागण्या आणि सूचना करत होते. मग अजित पवार यांची स्टाईल तर आपल्या सर्वांना माहितीच आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जे काही मनात असेल ते पटकन बोलून टाकतात. शेवटी अजित पवार यांनी चालू भाषणामध्ये मागण्या व सूचना करणाऱ्या लोकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. काका अजित पवार यांनी विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहित पवार यांचे चांगलेच कौतुक केलेलं पाहायला मिळालं. अजित पवारांनी रोहित पवारांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.
आपल्या भाषणात अजित पवार रोहित पवार यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत असताना उपस्थितित लोकांपैकी काही जण त्यांना मागण्या व सूचना करत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव या संदर्भात काही मुद्दे ते लोक मांडत होते. एक दोन वेळा अजित पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु तरीदेखील लोक मागण्या आणि सूचना करतच होते. मग अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यावर चांगलेच संतापले होते.
तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात. येथे मधे मधे बोलायची सवय आहे. उगीच रोहितला त्रास व्हायला नको म्हणून ऐकून घेतो. नाही तर माझा हिसका दाखवला असता. ऐकून घेतोय तर मधे मधेच बोलतात, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या भाषणावेळी मध्ये मध्ये बोलनाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले.
हेही वाचा: धक्कादायक: महाराष्ट्रातील दंगल व हिंसाचारामागे भाजपचाच हात, रझा अकादमी सोबत असे आहे भाजपचे कनेक्शन
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम