धक्कादायक: महाराष्ट्रातील ‘दं’गल व हिंसाचारामागे भाजपचाच हात, रझा अकादमी सोबत असे आहे भाजपचे कनेक्शन

0

कथित त्रिपुरा घटनेमुळे महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. परंतु या बंदला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. काल अमरावतीत जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आज भाजपने अमरावती बंदची हाल दिली होती. मात्र या बंदला देखील हिंसक वळण लागले. परंतु सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की सदर कथित घटना त्रिपुरा येथे झाली आहे त्यामुळे याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे कारण काय?

यामध्ये संजय राऊत यांनी याबाबत आता खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले त्रिपुरातील पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटण्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचाच हात आहे असा गंभीर आरोप भाजपवर संजय राऊत यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वाढलेल्या प्रचंड महागाईच्या विरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अस्थिरतेचे कारण काय? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे अशा अफवा पसरवल्या जात आहेत, यामागे कुठला पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. असे संजय राऊत औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

रझा अकादमी संघटनेला बऱ्याच वर्षांपासून भाजपच प्रोत्साहन देत आहे. आज राज्यात चालू असलेल्या हिंसाचार आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी संघटना हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे भाजपच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण महाराष्ट्रात आले आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे महाराष्ट्रात पडण्याचे काय कारण, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. आज अमरावतीतदेखील जोरदार आंदोलन पेटलं आहे. काल काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.

भाजपकडून आज अमरावतीमध्ये अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागायला नको होते. हा बंद शांततेत होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु, दुर्दैवाने बंदमध्ये चुकीच्या घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं खूप नुकसान झालं आहे. अमरावतीतील हिंसक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा: Amravati Violence: अमरावती हिंसाचारातील दोषींवर आता कडक कारवाई होणार, विरोधी पक्षाला दिलीप वळसे पाटील म्हणाले.. 

AUSvPAK: खायचं भारताचं आणि गायचं पाकिस्तानचं; पाकिस्तानला सपोर्ट केल्याने सानिया झाली ट्रोल व्हिडिओ व्हायरल 

T20 World Cup: हसन अलीच्या एका चुकीमुळे पाकिस्तानने गमावला टी-ट्वेन्टी विश्वचषक; चाहत्यांनी शिव्या तर घातल्याच पण कॅप्टनही म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.