आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, सर्वसामान्य लोकांना देखील बसणार फटका

0

त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी काही मुस्लिम संघटनांनी अमरावतीत मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले होते. परंतु  या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळालं. आंदोलकांकडून दगडफेक व दुकानांची तोडफोड करण्यात आली. याच्याच निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज अमरावती बंदची हाक देण्यात आली होती.

भाजपसह अन्य संघटनांनी शेकडो नागरिकांसह रस्त्यावर येऊन आज शनिवारी निषेध केला. अमरावती शहरातील राजकमल चौकात भारतीय जनता पक्षाच्या व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व  कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला. त्याठिकाणी निदर्शने करण्यात आली. परंतु पुढे या आंदोलनकर्त्यांनी शहरातील राजकमल चौक, नमुना जवाहर गेट या भागात घुसण्याचा प्रयत्न केला.

राजकमल चौक, नमुना जवाहर गेट हे संवेदनशील ठिकाणे आहेत. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज व  पाण्याचा मारा देखील केला. अमरावतीत पोलिसांनी एवढा बंदोबस्त करून देखील जमावाने बंददरम्यान झालेल्या तोडफोड व हिंसाचारामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अनिश्चित काळासाठी संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अमरावती शहरात संचारबंदीसह तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा देखील निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. ही इंटरनेट सेवा अमरावती शहरात बंद असणार आहे. परंतु ही इंटरनेट सेवा कधीपासून बंद होणार आहे याच्याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे सुट्टीवर असेलल्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या  शनिवारी रात्रीपर्यंत अमरावतीत परतण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: अजित पवार संतापले, मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात; त्याला त्रास नको म्हणून ऐकून घेतोय.. 

Amravati Violence: अमरावती हिंसाचारातील दोषींवर आता कडक कारवाई होणार, विरोधी पक्षाला दिलीप वळसे पाटील म्हणाले.. 

AUSvPAK: खायचं भारताचं आणि गायचं पाकिस्तानचं; पाकिस्तानला सपोर्ट केल्याने सानिया झाली ट्रोल व्हिडिओ व्हायरल 

T20 World Cup: हसन अलीच्या एका चुकीमुळे पाकिस्तानने गमावला टी-ट्वेन्टी विश्वचषक; चाहत्यांनी शिव्या तर घातल्याच पण कॅप्टनही म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.