आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवस, असा आहे त्यांचा संघर्षमय राजकीय प्रवास..

0

आज, 9 नोव्हेंबर म्हणजे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा 47 वा वाढदिवस. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुणेकरांना एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमांतून त्यांनी पुणेकरांना खास आवाहन केलं आहे. मला माझ्या वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नको आहेत. पुणे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कृपया आपण रक्तदान करुन मला शुभेच्छा द्याव्यात, असं जाहीर आव्हान पुणेकरांना केले आहे.

असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा संघर्षमय राजकीय प्रवास: मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील कोथरुडचे रहिवाशी आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर ते वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील झाले होते. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडत चालला होता. ते एक उत्तम कुस्तीपटू देखील आहेत. कुस्तीच्या आवडीमुळे ते कोल्हापूरच्या तालमीत दाखल झाले. आज आपण त्यांचा कुस्तीचा आखाडा ते राजकीय आखाडा असा प्रवास पाहणार आहोत.

मुरलीधर मोहोळ यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1974 या दिवशी झाला. त्याचे वडील किसनराव मोहोळ हे मुळशी तालुक्यातील मुठा गावातून नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कोथरूडमध्ये स्थायिक झाले. किसनराव मोहोळ यांनी मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यातील दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुस्तीसाठी कोल्हापूरला पाठवले. तेथेच त्यांनी कला शाखेतून पदवी घेतली. त्यांनी पदवीनंतर राजकारणात प्रवेश केला. सुमारे 1993 मध्ये पुण्याच्या राजकीय आराखड्यात सक्रिय सहभाग घेतला.

सुरुवातीला मुरलीधर मोहोळ यांनी भाजपमध्ये वॉर्ड लेवलवरती काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर पुढे त्या काळच्या शिवाजीनगर मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस अशा जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या होत्या. मोहोळ हे गोपीनाथ मुंढे यांचे कट्टर समर्थक होते. तर पुणे शहरात माजी खासदार अनिल शिरोळे समर्थक म्हणून प्रसिद्ध होते.

2002 साली त्यांना महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. पुढे 2006 साली पतंगराव कदम यांचे बंधू सुबराव कदम यांच्या मृत्यूमुळे महानगरपालिकेची पोटनिवडणूक जाहीर झाली. काळेवाडी प्रभागाच्या या निवडणुकीत दिवंगत सुबराव कदम यांच्या पत्नी सुशिला कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती.तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतवण्यात आले होते.

कदम यांचे शिक्षण संस्थांमुळे पारडे जड होते. परंतु तरीदेखील मोहोळ यांनी त्यांना कडवी झुंज देत विजय मिळवला. मोहोळ नगरसेवक झाले. 2007 साली त्यांना महानगरपालिका सर्वसाधारण निवडणुकीत त्याच प्रभागात पुन्हा एकदा मोहोळ यांना जनतेने नगरसेवक म्हणून काम करण्यास संधी दिली.

याच निवडणुकीत गिरीश बापट यांनी अनिल शिरोळेंचे तिकिट कापले होते. बापट त्यावेळचे भाजपा पुणे शहर अध्यक्ष होते. अनिल शिरोळे यांचा पत्ता कट केल्यामुळे बापट यांचा निषेध करत मोहोळ आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवार पेठेतील पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे मुरलीधर मोहोळ अजूनच चर्चेत आले. त्यामुळेच भाजपने त्यांना 2009 च्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले.

या निवडणुकीत मात्र मुरलीधर मोहोळ यांचा मनसेचे रमेश वांजळे यांनी पराभव केला होता. 2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांना उमेदवारी मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल अशी आशा मोहोळ यांना होती. त्यांनी तशी तयारीही केली होती.

परंतु त्यावेळी मात्र पक्षाने मेधा कुलकर्णीं यांना उमेदवारी जाहीर केली व त्यामुळे मग मोहोळांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथेही त्यांना यश आले नाही. मोहोळ यांना शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट न मिळण्यामध्ये त्यांचे एकेकाळचे राजकीय गुरू अनिल शिरोळे हे होते असे अशी चर्चा आहे.

2017 च्या सर्वसाधारण निवडणुकीत मोहोळ तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडून गेले. या निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता आली आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मोहोळ यांची वर्णी लागली. हे पद सांभाळत असताना त्यांनी वरिष्ठ नेत्यांची मने जिंकली. मोहोळ यांची 2019 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी चंद्रकांत पाटील यांच्यामुळे हुकली अशी चर्चा आहे.

परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांतच त्यांची पुण्याचे महापौर म्हणून निवड झाली. आपल्याला मिळालेल्या संधीचा ते पुरपुर फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. कोरोणा काळातील त्यांच्या कामगिरीचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले होते. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल यात काही शंकाच नाही. महाराष्ट्र लोकशाही परिवाराकडून
मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा: Supriya Sule:माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही,घरात घुसून ठोकून काढेन; यशवंतरावांचे विचार वेशीला टांगत सुप्रिया सुळेंचं वादग्रस्त विधान 

Kapil Sharma: याकारणामुळे कपिल शर्माने आत्महत्याचा प्रयत्न केलता, वेळेत पोहचून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने वाचवले होते प्राण 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात हिंदुस्तानी भाऊ नवाब मलिक यांच्या विरोधात, कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत 

WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.