Today’s Onion Rate: ‘या’ कारणामुळे कांद्याचा दर पडणार, कांद्याचे दर येणार आटोक्यात; पहा आजचा दर
Todyas Onion Rate:कांद्याच्या दरात वारंवार चढ उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी आलेली आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या(Today’s Onion Rate) दराने ५० शी ओलांडकेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे बाजारात खराब कांद्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे चांगल्या कांद्याला मोठी मागणी आहे. दिवाळीनंतर कांदा बाजारात नवीन कांदा येत असतो. त्यामुळे कांद्याचे दर आवाक्यात रहात असतात. अनेक शेतकरी सध्या कांदा साठवणूक करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली होती त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळवता आला आहे. परंतु आता मात्र कांद्याचे दर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्र सरकारने कांदा विक्रीला काढल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढणार आहे आणि त्यामुळेच कांद्याच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांद्याच्या दरात ५ ते १२ रुपये एवढी घट होऊ शकते. केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील १.११ लाख टन कांदा केंद्र सरकारने विक्रीला काढला असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.
दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये हा साठवणूक केलेला कांद्या साठा विक्रीस पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या स्थानिक बाजारपेठांमध्येही सध्या बी ग्रेड कांद्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे दिसून येत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे की, “बफर स्टॉकद्वारे कांद्याच्या किमतींवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. कांद्याचा दर कमी करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रयत्नांचा परिणाम आता दिसून येत आहेत.
कांद्याचा भाव आता गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे कारण किचन स्टेपलची सरासरी अखिल भारतीय किरकोळ किंमत 40.13 रुपये प्रति किलो आहे, तर घाऊक बाजारात ती 31.15 रुपये प्रति किलो आहे, असे त्यात म्हटले आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधून जवळपास 1,11,376.17 टन कांदा देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला होता. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बफर स्टॉक मधील कांदा बाजारात येणार असल्यामुळे किरकोळ किमती 5-12 रुपये प्रति किलोने कमी होण्यास राहण्यास मदत होईल.
दिल्लीत किरकोळ कांद्याचे भाव 3 नोव्हेंबरला 44 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत, जे 20 ऑक्टोबरच्या 49 रुपयांवर होते. मुंबईत, 14 ऑक्टोबरला कांद्याचे भाव 50 रुपये प्रति किलोच्या उच्चांकावरून 45 रुपयांपर्यंत घसरले आहेत. कोलकात्यामध्ये, 17 ऑक्टोबरला कांद्याची किरकोळ विक्री 57 रुपये प्रति किलोवरून 45 रुपयांवर आली, तर चेन्नईमध्ये 13 ऑक्टोबर रोजी 42 रुपये प्रति किलोवरून 37 रुपयांपर्यंत घसरली, असे आकडेवारीवरून दिसून येते.
हेही वाचा: टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
“दिवाळीमध्ये महाराष्ट्रात वळवाचा पाऊस:
सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील काही भागामध्ये 3 ते 6 नोव्हेंबर या दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अजूनच गोड होण्याची शक्यता आहे. कारण या भागातील शेतकरी पावसाची वाट पहात आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा खूप तुरळक पावसाची नोंद झाली आहे.
त्याचसोबत जळगाव, जालना, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे. मात्र, कांदा, डाळिंब, द्राक्ष उत्पादक असणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान राहील. परंतु, लासलगाव व येवला परिसरात तुरळक पाऊस वगळता इतर कुठेही पाऊस पडणार नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस पडून कांद्याचे नुकसान होईल अशी भिती शेतकऱ्यांना आहे. या भीतीच्या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञांनी दिलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील बागायती क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
हेही वाचा:खोकला की साडेतीन लाखाला ठोकला, खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत: इंदुरीकर महाराज
शाहरुख डोंगराएवढा, तो समाजासाठी काय काय करतो हे तुम्हाला सांगितलं तर डोळे पांढरे होतील!
Indurikar Maharaj: पंचाहत्तर टक्के लोकं कोरोनाने नाही भितीने गेली आणि ती त्यांच्या घरच्यांनीच घालवली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम