Indurikar Maharaj: पंचाहत्तर टक्के लोकं कोरोनाने नाही भितीने गेली आणि ती त्यांच्या घरच्यांनीच घालवली

0

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा खूप मोठा फटका भारताला बसला. ऑक्सीजन सिलेंडर व्हेंटिलेटर सेवा या सगळ्यांचा पुरेशा होत नसलेल्या पुरवठ्यामुळे, अनेकांचे जीव गेल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले. एवढेच नाही तर कोरोना झालेल्या माणसाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याच्या घरातूनच त्याला सहानुभूती मिळत नसल्याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यात घोटी या ठिकाणी गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त घोटी कृषी उत्पन बाजार समितीत झालेल्या किर्तनात इंदुरीकर महाराज यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

नाशिक जिल्ह्यात घोटी या ठिकाणी गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त घोटी कृषी उत्पन बाजार समितीत इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी अनेक महत्वाच्या विषयांवर आपले प्रबोधन केले. यामध्ये त्यांनी कोरोना काळात लोकांना किती त्रास सहन करावा लागला याविषयी देखील भाष्य केलं.

कोरूना झालेल्या व्यक्तीला ‘यम’ त्रास देणार नाही, एवढा त्रास त्याच्या घरच्यांनीही दिल्याचं देखील इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात सांगितलं. सर्वांना सांगावे लागत होते, कोरोणा व्यक्तीच्या संपर्कात गेल्यावर को रोना होत नाही, त्यांना मदत करा. मात्र कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हतं, ही मोठी खंत देखील इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली. ७५ टक्के लोकं कोरोनाने नाही भितीने गेली, आणि ती घरच्यांनी घालवली. असे देखील इंदुरीकर महाराज म्हणाले.

हे सांगत असताना त्यांनी मी कोरोणाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, काही होतच नाही तर कोरोणाची लस घ्यायची कशाला? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांच्या मनात भीती असल्यामुळे कोरोनाने लोकं मरत आहेत, मन धिट ठेवा, काही होत नाही. असंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महा विकास आघाडीचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच इंदुरीकर महाराजांनी केलेले हे विधान आता चर्चेत असून आहे.

कोरोणाची लस मी घेतली नाही, आणि घेणारही नाही, इंदुरीकर महाराजांच्या या वाक्यावर थोडा वाद झाल्याचे पहिला मिळाले. इंदुरीकर यांच्या या वाक्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी इंदुरीकर महाराज यांना कोरोना लसीचे महत्त्व पटवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदुरीकर महाराज आणि माझे चांगले संबंध आहेत. ते समाजाचे उत्तम प्रबोधन करतात, ते माझं नक्की ऐकतील असंही राजेश टोपे म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.