खोकला की साडेतीन लाखाला ठोकला, खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत: इंदुरीकर महाराज
महाराष्ट्राच्या भूमीला संताची परंपरा लाभलेली बरीच वर्ष झाली आहेत. आजही कीर्तनसोहळ्यकडे लोक तेवढ्याच श्रद्धने बघतात. त्यामूळे कीर्तनकारांना देखील तेवढेच महत्त्व आहे .आपल्या कीर्तनाच्या वेगळ्या आणि अनोख्या अंदाजामुळे नेहमी चर्चेत असणारे समाज प्रबोधनकार आणि उत्तम कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
याला कारण म्हणजे ईगतपुरी तालुक्यात घोटीमध्ये सोमवारी त्यांचा झालेला किर्तनाचा सोहळा. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कोरोणाच्या परिस्थीत झालेला भ्रष्टाचार या मुदद्यावर देखील त्यांनी अस्पष्ट शब्दात मत मांडले. महाराज म्हणाले आपण नशिबवान आहोत , कोरोणाच्या या दुसऱ्या लाटेतून देखील वाचलो आहोत. त्यामुळे हा आपला पुनर्जन्म आहे.
दिड वर्षातून आपण हसलो. देवाने 2020 साली जीआर काढला, खोकला की साडेतीन लाखाला ठोकला. यामुळे तर काही जण खोकला दाबून मेले पण खोकले नाही, कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांनी देखील बऱ्याच रुग्णाची लुटालूट केली आहे त्यामूळे त्यांच्यावर निशाणा साधत इंदुरीकरमहाराज म्हणाले ,हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमराजाने लाच घेतली असती तर या नालायकांनी खालून वर चेक पाठवला असता आणि म्हतारा खाली आणला असता.
सहकार महर्षी लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंती निमित्ताने घोटी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. कीर्तनात त्यांनी कोरोनावरून डॉक्टरांची तर खिल्ली उडवली आहेच परंतु त्याचबरोबर त्यांनी सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. महिलांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या किर्तनासाठी पाचशेहून अधिक लोक उपस्थित होते.
कोरोनाकाळात 40 टक्के कीर्तनकार केवळ सराव नसल्यामुळे हरिपाठ विसरले. उत्पन्नाच नसल्यावर हरिपाठ तरी काय करणार आहे. कोरोनाच्या भितीपाई जवळपास 40 टक्के माळकर्यांनी माळा काढल्या आहेत. अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही असे सांगितल्यावर कित्येक जणांनी अंडी खाण्याकडेच भर दिला. माळ काढायची इच्छा नसताना पण पत्नी म्हणाली की माळ काढा तुम्हच काही बरं वाईट झाल्यावर आम्ही कोणाकडे पाहून जगायच.
कोणाच ऐकल की काढा पिल्यावर कोरोना होत नाही. तेवढच ऐकून माणस चहा, दूध सोडून काढा प्यायला लागली मंडळी आणि नुसती आगच होयला लागली. वारकरीमंडळीनी एकत्र यायला हवे आहे. लॉकडाऊनचा त्रास हा वारकरी लोकांना फार झाला आहे. दिड वर्ष कसे दिवस काढले ज्याचे त्यालच माहित आहे. तमाशा, जागरण गोंधळ करणारे आणि सांप्रदायिक मंडळींनी खुप दुःख सोसले. बाकी कोणालाही त्रास झाला नाही.
गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात दागिने उरले नाही. आळंदीमध्ये हजार मुलांना कंपनीत कामाला जायला लागले . परिस्थितिमुळे पोट भरायला काही मार्ग नव्हते . दोन दिवसांवर सण आला प्रत्येकाला अनुदान दिले आहे. पण ज्यांनी ज्यांनी धर्म टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांची मात्र पार वाट लाववून टाकली आहे.
सगळ्या लोकांनी जर झाडे लावली असती तर ऑक्सिजनपाई बरीच माणसे मरली नसती. पण असे खरे बोलायचे कोणी नाही का? नाहीतर ऑक्सिजन फक्त श्रीमंतांना मिळाला. गरीब माणस खाटांवरती कोमड्यांगत तडफडून मेली. कोरोनाच्या माणसाला यम पण येवढा ताप देणार नाही येवढा ताप घरच्याच माणसांनी दिला. 75 टक्के माणसे केवळ टेन्शनने मेली आणि त्यांच्या घरच्यांनी घालवली.
इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याला स्वतः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. इंदुरीकर महाराजाबद्दल बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले ते आमच्या तालुक्यातील आहेत. आणि त्यांच व्यक्तिमत्वच असं आहे की ते साधेसुधे प्रबोधन करत नाहीत त्यांचे प्रबोधन खसकून असते. समाजामध्ये जे चुकीचे घडत आहे त्याच्यावर ते नेमकेपणाने बोलतात. त्यामूळे समाजामध्ये परिवर्तन होण्यास नक्की मदत होते.
येवढे बोलून बाळासाहेब थोरात कार्यक्रमातून निघून गेले आणि त्यानंतर मात्र इंदुरीकर महाराजानी कीर्तनास यांच्याच अंदाजात सुरुवात केली. त्यांनी मोबाईल क्लीप मुळे झालेला त्रासाचा देखील उल्लेख केला. त्यांनी सर्व वारकऱ्यांना आवाहन करत एका झेंड्याखाली या असे सांगीतले.
हेही वाचा – टाटा समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल
टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
Video: माझ्या मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलादेखील घेतलं असतं, मी प्रत्येक नदी फिरले: अमृता फडणवीस
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम