‘शाहरुख डोंगराएवढा, तो समाजासाठी काय काय करतो हे तुम्हाला सांगितलं तर डोळे पांढरे होतील!’
मुंबई| छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘मुलगी झाली हो’ मध्ये विलास पाटील या लोकप्रिय पात्राची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांची नुकत्याच आपल्या मुलाच्या कारनाम्यामुळे अडचणीत आलेल्या शाहरुख खान याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टमधून किरण माने यांनी शाहरुख खानने आजवर समाजासाठी केलेल्या कामापैकी थोड्याश्या कामाचा तपशील द्यायचा प्रयत्न केला आहे. शाहरुख खानने केलेली कामं सांगितली तर त्याचा रागराग करणाऱ्यांचे देखील डोळे पांढरे होतील असं त्यांनी म्हटले आहे.
‘आपण कुणालापण डोक्यावर घेत नाही भावांनो! हा किरण माने सातारी मातीतला आहे. मी उगीच कुणाचं कौतुक करणाऱ्यातला नाही. समोर माणूसच डोंगराएवढा आहे. त्याची का स्तूती करणार नाही सांगा? असा प्रश्नच किरण माने यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणतात शाहरुख खान समाजासाठी काय काय करतो हे जर सांगितलं तर त्याची निंदा करणाऱ्यांचे देखील डोळे पांढरे होतील.
संपूर्ण पिक्चर सांगत नाही तर, फक्त ‘ट्रेलर’ सांगतो. तुम्ही ऐकाच – ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं. त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी शस्त्रक्रिया करणं. अँसिड हल्ला झालेल्यांवर मानसिक उपचार करणे आणि त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्या लोकांना स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं.’ हे या माणसानं केलं आहे. अशी स्तुतीसुमने किरण माने यांनी शाहरुखसाठी उधळली आहेत.
‘अशी बरीच कामं तो गेली कित्येक वर्ष करत आहे. खायचं काम नाय भावांनो. आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी इस्पितळात शाहरुखने लहान मुलांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, त्यासाठी तो नेहमी खूप मोठी आर्थिक मदत करत असतो. २०१२ साली शाहरुखने देशभरातली एकूण १२ खेडेगांवं दत्तक घेतली होती. त्या गावात स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शाहरुखने केलं. आजसुद्धा त्या गावांमध्ये नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत शाहरुख करताना पाहायला मिळतो’ असे किरण माने म्हणाले.
पुढे बोलताना असताना किरण माने म्हणाले, ‘२००८ मध्ये बिहार येथे मोठा पूर आला होता. त्यावेळी पूरग्रस्तांना मदतीसाठी त्याने जगभर लाइव्ह कॉन्सर्ट करून ३० लाख रूपये जमा करुन दिले होते. २०१५ मधील चेन्नई येथील पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये, २०१३ मधील उत्तराखंड पूरग्रस्तांना त्याने ३३ लाख रूपये तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या ‘त्सुनामी रिलिफ फंड’ ला शाहरुखने २५ लाख रूपये दिले होते. एक पत्रकार शाहरुखची मुलाखत घेऊन पुन्हा माघारी जात असताना त्या पत्रकाराचा अपघात झाला होता. तो पत्रकार खूप गंभीर जखमी झाला होता. तो पत्रकार संपूर्णपणे बरा होईपर्यंतचा त्या पत्रकाराचा सगळा खर्च शाहरुख खानने उचलला होता. त्या पत्रकाराचा खर्च दर दिवशी २ लाख रूपये होता.’
खोकला की साडेतीन लाखाला ठोकला, खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत: इंदुरीकर महाराज
आज आपल्या भावाचा वाढदिवस, सलमानच्या शुभेच्छा सोशल मीडियावर घालतायत धुमाकूळ
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम