आज आपल्या भावाचा वाढदिवस…सलमानच्या शुभेच्छा सोशल मीडियावर घालतायत धुमाकूळ

0

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा आज 56 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानला जगभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शाहरुख खानचा मित्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने दिलेल्या अनोख्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. सलमान खान याने शाहरुख खानला वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावरही रंगल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांचा विचार केला तर, शाहरुख खानसाठी हा अत्यंत कठीण काळ होता. कार्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरुख खानला आपल्या चित्रपटाचे शूटिंग देखील बंद करावं लागलं होतं. आर्यन खान तब्बल २२ दिवसाहून अधिक काळ न्यायालयीन कस्टडीत राहिला. दोन तारखेला कारवाई केल्यानंतर आर्यन खानला २६ तारखेला जामीन मिळाला होता. हा मधला काळ शाहरुख आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूपच संघर्षाचा राहिला.

 

शाहरुखचा मुलगा आर्यन खान कस्टडीमध्ये होता तेव्हा, सलमान खानने मन्नतवर जाऊन शाहरुख खानची भेट घेतली होती. हा अडचणीच्या काळात अनेकांना मदत करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अडचणीच्या काळात तो अनेकांच्या मदतीला धावून जातो, अशी त्याची रिपिटेशन आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर, कशाचाही विचार न करता, सर्वप्रथम सलमान खान शाहरुख खानला सपोर्ट करणारा पहिला अभिनेता होता.

शाहरुख खान याचा आज 56वा वाढदिवस असून, या वाढदिवसाला सलमान खानने देखील अनोख्या पद्धतीने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा, शोशल मिडीयावर रंगत असून, अनेक चाहत्यांनी सलमानने दिलेल्या शुभेच्छांचेही कौतुक केले आहे. तसं पाहायला गेलं तर सलमान सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसतो. मात्र तो आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवासाच्या शुभेच्या द्यायला कसा विसरेल.

सलमानने शाहरुख सोबतचा एका कार्यक्रमातला फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून, त्याला भन्नाट असं ‘कॅप्शन’ दिलेलं आहे. सलमानने शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा देताना, म्हंटले आहे, “आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या भावा” अशा अनोख्या अंदाजात सलमानने शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने केलेल्या ट्विटला काही वेळातच लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.